मी सुनील रमेश अक्रेकर. या माझ्या दोन कंपन्या आहेत. मी स्वतः मच्छीमार कोळी असून गेली बारा ते तेरा वर्ष मासेविक्री तसेच माशांचे मूल्यवर्धित पदार्थ रेडी-टू-इट यांचा व्यवसाय करतो. माझी कंपनी माशांपासून जवळजवळ १२०-१२५ मूल्यवर्धित पदार्थ तयार करते.
फिश वडे, पॅटीस, रोल, कबाब, फिश टिक्का, बर्गर, फिश फिंगर, फिश लॉलीपॉप, फिशचा चिवडा, माशांचे लोणचे, पापड व अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करतात. पालघर येथे आमचे स्वतःचे प्रोसेसिंग युनिट असून या युनिटमध्ये व्हेज मोमोज, स्प्रिंग रोल, कबाब, समोसे, त्याचप्रमाणे चिकन रोल, कबाब, समोसे मोमोज व इतर मूल्यवर्धित पदार्थ तयार होतात.
पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही मच्छीमार समाजासाठी महत्त्वपूर्ण ‘महाराष्ट्रातील पहिला फिश क्लस्टर प्रोजेक्ट’ राबवीत आहोत. या क्लस्टरसाठी महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला जवळजवळ दहा करोड रुपये अनुदान मिळत आहे.
पालघर जिल्ह्याला नवीन दिशा देणारा हा क्लस्टर प्रोजेक्ट आहे. यामुळे जवळजवळ हजार ते पंधराशे लोकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत तर १०० ते २०० उद्योजकांना त्यांच उद्योग उभारण्यास मदत होत आहे. जवळजवळ आम्ही १०० ते २०० करोड रुपयाचे व्यवसाय करण्याचे लक्ष पुढील वर्षभरामध्ये ठेवीत आहोत.
पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही माशांचे मूल्यवर्धित पदार्थ यांचे ट्रेनिंग देत असून त्याचबरोबर सरकारी शासकीय योजनांची माहिती नवउद्योजकांना देण्याचे काम करीत आहोत. नवीन उद्योगांना उभारणीसाठी आम्ही कन्सल्टन्सी करीत असून संपूर्णतः व्यवसाय उभारण्यासाठी मदत करीत आहोत.
भविष्यामध्ये मराठी व्यवसायिकांनी व्यवसायातून समृद्धीकडे जाण्यासाठी व्यवसाय करणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लवकरच स्वतःची फ्रेंचायसी नेटवर्क चालू करीत आहोत. आमच्या फ्रेंचाईजी शॉपची किंमत फक्त पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत आहे. सुरुवातीचे साधे फ्रॅंचाईजी मॉडेल फक्त दोन लाख पन्नास हजार रुपयांपासून सुरू होते.
फ्रेंचाईजी शॉपसाठी लागणारी सर्व साधनसामुखी सॉफ्टवेअर व लागणारे इतर सर्व गोष्टी आम्ही स्वत: पूर्वीच आहोत. त्यासाठी कोणतेही वेगळे भांडवल घेत नाही, तसेच आम्ही फ्रेंचायसी होल्डर हाच स्वतः डिस्ट्रीब्यूटर असून त्यांच्या मार्केटिंगची जबाबदारी ही आम्ही घेत आहोत.
आमच्या फ्रेंचायसी शॉपचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये माशांच्या सर्व प्रकारचे मूल्यवतीत पदार्थ मिळणार आहेत. त्याचप्रमाणे सुके मासे समुद्रातील ताजे मासे नीट अँड क्लीन केलेले मासे तसेच माशांचे मूल्यवर्धित पदार्थ मसाले, वेज व नॉनव्हेज चिकन चे मूल्यवर्धित पदार्थ सर्व एकाच शॉपमध्ये उपलब्ध होणार आहेत.
व्यवसायाचे नाव : Fresh Traditional Fish Private Ltd. आणि KoliWada.Com
व्यवसाय कशाचा आहे?
Supply of Fresh Raw Fish and Manufactures of Top Quality Fish Processing Frozen Sea Food
संपर्क : 8698039011 / 9309909659
Fssai License Number : 11523023000250
GST Number : 27AAECF0085F1ZU
Website: www.freshtraditionalfish.com
Office Address : House No. 1074, Murbe, Palghar Maharashtra 401501
Mob. 9309909659 / 8698039011
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.