Advertisement
उद्योग कथा

‘स्मार्ट उद्योजक’च्या #SuperWomen 2019

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

वाचा ‘स्मार्ट उद्योजक’मध्ये गेल्या वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या महिला उद्योजकांचे झंझावाती प्रवास!


राहिबाई पोपेरे

या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज देशात हायब्रिड शेती जास्त प्रमाणात वाढलीय. शाश्वत शेती करण्यासाठी जुन्या धान्याची वाणं आज खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा पारंपारिक आणि देशी वाणाचं जतन करणाऱ्या राहिबाई पोपेरे या ‘देशी बियाण्यांची बँक’ चालवतात.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-35D


जयंती कठाळे

‘पूर्णब्रह्म’ची फ्रँचायझी केवळ महिलांना दिली जाते असे नाही, तर जो कुणी फ्रँचायजी घेऊ इच्छितो त्याच्यासोबत एकतरी महिला असायला हवी, अशी आमची अट आहे. याचे कारण स्त्रीकडे उपजतच काही गुण असतात, ज्यामुळे ती अन्न व अन्न प्रक्रिया व्यवसाय क्षेत्रात प्रभावीपणे उभी राहू शकते. जसं की कोणत्याही स्त्रीला, भात शिजला का? हे शिकवावं लागत नाही तर तिला ते तिच्या नजरेनेच कळते. आपल्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एखाद्या गरोदर स्त्रिला किंवा स्तनपान करणार्‍या महिलेला, वयस्कर जोडप्यांना स्त्री ही अगत्याने आणि प्रेमाने खाऊ घालू शकते.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-2Uw


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.डॉ. शिवांगी झरकर

इतर मुलींप्रमाणे तिनेही इन्फोसिससारख्या नामांकित कंपनीमध्ये काम केले आणि पुढे एम.बी.ए-आय टी पूर्ण केले; पण असलेल्या नोकरीमध्ये तिला हवे असलेले समाधान मिळत नव्हते. काही तरी जगावेगळे करावे, स्वत:ची ओळख निर्माण व्हावी, ही मनीषा सतत मनात स्फुरत होती, कारण सर्व करतात त्यात काय मजा. आयुष्यात काही तरी करून गेलो आणि नावरूपे उरलो तर जीवन सार्थकी झाले असे तिला नेहमीच वाटायचे.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-3Jx


सुप्रिया देशपांडे

सुप्रिया देशपांडे यांनी वयाच्या ४८व्या वर्षी ‘होन्याकू रेमिडीज’ या ट्रान्सलेशन ब्युरोची (अनुवाद केंद्र) स्थापना केली आणि स्वतःच्या व इतरांच्या अनुवाद कौशल्याचा अचूक वापर करून गेल्या बारा वर्षांत या ब्यूरोचा कारभार एवढा वाढवला की, आज त्यांची कंपनी जवळपास २ हजारहून अधिक ग्राहकांना (ज्यामध्ये परदेशी ग्राहकांचाही समावेश आहे) जगभरातील पन्नासपेक्षा जास्त भाषांमधील अनुवाद सुविधा पुरवत आहेत. त्यासाठी जवळपास शंभरहून अधिक अनुवादकांचा ताफा जवळपास पाचशे वेगवेगळ्या लॅंग्वेज पेअर्समध्ये त्यांच्यासाठी काम करीत आहे. यामध्ये २३ भारतीय भाषा आणि अन्य परदेशी भाषांचा समावेश आहे.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-3oV


जान्हवी बोर्गे

शिक्षणात एक वर्षाचा ब्रेक घेऊन मीडियाकेअर कंपनीमध्ये ग्राफिक डिजाइनर म्हणून नोकरी केली. काही काळानंतर नोकरीमध्ये लक्ष लागत नसल्यामुळे मी ‘ड्रीम क्रिएशन’ नावाने ग्राफिक डिजाईन सेवा सुरू केली. यामध्ये मी सोशल मीडिया मार्केटिंग तसेच व्हिडिओ एडिटिंग करते.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-2Rh


वरदाई – अप होप पिपल सोल्युशन्स

शहरीकरणाच्या रेट्यामुळे महिलावर्गही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी व्यवसाय यांमध्ये अग्रेसर असल्यामुळे निवासी रहिवाशी संस्थेतील प्रश्न व समस्या यांमुळे महिलांनाच सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या निवासी संस्तेतील समस्या हा सर्व महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या समस्यांचा अभ्यास व त्यावरील उपाय म्हणून ठाण्यातील दोन उच्चविद्याविभूषित महिला व मॅनेजमेंटच्या पदविकाधारक भाग्यश्री महाडिक व मनिषा पवार यांनी ’अप होप पिपल सोल्युशन्स’ प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-2Xw


वर्षाराणी डोंगरे

मी एटीडी व जीडी आर्ट झाल्यानंतर काहीतरी उद्योग करण्याच्या शोधात होते. आणि मला लाकडावर पेंटिंग करण्याची कल्पना सुचली. इंटरनेटवर शोध घेतला त्यातून लाकडामध्ये डिझाईन करण्याचा उद्योग सुचला. सहा महिने त्या संबंधी माहिती घेत फिरले. वेगवेगळे टूल्स व मशिनरी खरेदी करत गेले. त्यातील कारागीर शोधले आणि लाकडातील डिझाईनची उत्पादने सुरू झाली.

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-30U

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: