Advertisement
उद्योग कथा

नवउद्योजकांचा आधारस्तंभ देआसरा

देशातील वाढत्या बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन डॉ. आनंद देशपांडे यांनी देआसरा या संस्थेची स्थापना केली. देआसरा ही संस्था समाजातील नवउद्योजकांना आर्थिक साहाय्य, व्यवस्थापन, प्रशिक्षण, मार्गदर्शन अशा विविध बाबींसाठी मदत करते. २०२० पर्यंत कमीत कमी १ लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने २५,००० उद्योगांना त्यांचे व्यवसाय सुरू करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि वाढविण्यासाठी सक्षम करण्याचे देआसरा फाऊंडेशनचे ध्येय आहे. संस्थेचे संस्थापक श्री. आनंद देशपांडे यांच्या मते एक चांगले जीवन शिकणे, कमावणे आणि समाजाला त्यातला काही भाग परत करणे यावर विभागलेले असायला हवे. याच उद्देशातून डॉ. देशपांडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांच्या कौटुंबिक निधीतून देआसरा फाऊंडेशनची स्थापना केली.

देआसराच्या कार्यकारी टीममध्ये बँक व सरकारी वित्तीय विभागांमध्ये काम केलेले व समृद्ध अनुभव असलेले निवृत्त अधिकारी कार्यरत आहेत. व्यवसाय स्थापना व वृद्धीसाठी लागणारी कायदेशीर माहिती, परवाने, कर्जासाठी लागणारी कागदपत्रे व इतर सेवा-साधने यांबद्दल देआसरा मार्गदर्शन करते. त्यासाठी निरनिराळ्या व्यवसायांवर आधारित मार्गदर्शिकाही तयार केली आहे. याशिवाय व्यवसायाचे विपणन, प्रसार व उत्पादनांसाठी बाजार व व्यासपीठ उभे कसे करायचे याबद्दलही देआसरा नवउद्योजकांना माहिती देते.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

याबद्दल सांगताना देआसराच्या मुख्य कार्यकारी अधिकरी प्रज्ञा गोडबोले यांनी सांगितले की, आम्ही उद्योजकांना एक समर्पित व्यवसाय सुविधा उपलब्ध करून देतो ज्याला उद्योगमित्र म्हटले जाते, जो आपल्या उद्योजकांना व्यवसायासाठी मार्गदर्शन करतो आणि निरंतर यशस्वितेची खात्री देतो. देआसरामध्ये आम्ही संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत ज्यामुळे व्यवसाय-मालकांसाठी/ उद्योजकांसाठी  सक्षम व्यासपीठ तयार होत आहे. यात आमच्या व्यवसाय मार्गदर्शिकेचाही समावेश आहे जी आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. देआसरा उद्योजकांना सहजपणे ग्राहकांशी जोडण्यासाठी, त्यांचे उत्पादन / सेवा बाजारात आणणे, व्यवहार करणे आणि दैनंदिन व्यवसाय कार्यप्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते. या उद्योजकांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी देआसरा फाऊंडेशन विविध बँकांशी संलग्न आहे ज्यामुळे आजपर्यंत १४ कोटींपेक्षा जास्त रकमेची कर्जे या उद्योजकांना यशस्वीपणे वितरित करण्यात आली आहेत.

गेल्या काही महिन्यांत देआसरा फाऊंडेशनद्वारा राज्यभरात विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, नियोजन अशा विविध बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले होते. राज्यभरातून या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या कार्यशाळेद्वारे नवउद्योजकांना प्रेरणा मिळून भविष्यात अनेक यशस्वी उद्योजक घडतील, असा आशावाद फाऊंडेशनद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.

Smart Udyojak Subscription

 

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: