Advertisement
उद्योगवार्ता

सुरेश प्रभू यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान व्यापार आणि वाणिज्यिक संबंधाबाबत द्विपक्षीय चर्चा

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

केंद्रीय, वाणिज्य आणि उद्योग, नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी १० ते १२ जून दरम्यान अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट ई लायथायझर, वाणिज्य मंत्री विल्बर एल रॉस आणि कृषी मंत्री सोनी पर्ड्यु यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्यिक संबंध या चर्चेच्या केंद्र स्थानी होते. त्याचबरोबर दोन्ही बाजुंच्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्याचे मार्ग शोधण्यावर भर देण्यात आला. ही चर्चा सकारात्मक, फलदायी ठरावी यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी लवकरच बैठक घेणार आहेत.


WhatsApp द्वारे ‘स्मार्ट उद्योजक’ वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : https://bit.ly/2IPPA5w


अमेरिका-भारत व्यापार परिषद आणि अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाने आयोजित केलेल्या व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींच्या बैठकीला आणि इतर संबंधितांच्या बैठकीला संबोधित केले. अमेरिकेत निर्मिती केलेली नागरी हवाई वाहतुकीसाठीची, भारतीय कंपन्यांकडून झालेली खरेदी, ऊर्जा क्षेत्रातले वाढते सहकार्य विषद करुन वाढत्या व्यापाराची माहिती त्यांनी दिली. भारताच्या वेगवान आर्थिक विकासामुळे या आणि इतर क्षेत्रात नव्या बाजाराच्या संधी निर्माण होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.


स्मार्ट उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप न्युजलेटर

उद्योजकता व व्यवसायविषयक बातम्या व उपयुक्त लेख रोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करा व ‘स्मार्ट उद्योजक न्युजलेटर’ असे टाइप करून आपल्या नाव, जिल्हा व तालुक्यासह या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: