मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी या गावचा. बाबा प्राथमिक शिक्षक त्यामुळे घरी शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण. घरची शेती असल्यामुळे शेतकरी कुटूंबात ज्या सर्व गोष्टी असतात त्या आमच्या घरीही होत्या.
माझे इंजिनीरिंगचे शिक्षण सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत झाले. पदवीनंतर लगेचच सातारा येथील एका नामवंत कंपनीत कॅम्पस selection होऊन रुजू झालो. कंपनीमध्ये असताना उच्च पदस्थ व्यक्ती सोबत काम करत असताना एकंदरीत व्यवसाबद्दल सकारात्मक विचार झाले.
इथेच आपण स्वतः व्यवसाय करायचा निश्चित केला होता. नंतर बाबांच्या इच्छेनुसार नोकरी सोडून स्पर्धापरीक्षा अभ्यास सुरू केला. स्पर्धा परीक्षेतील अनिश्चित जागा, वाढती स्पर्धा हा विचार करून पर्यायी व्यवस्था म्हणून सुरुवातीला गावात दळप-कांडप व्यवसाय सुरू केला.
गावची लोकसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षित व्यवसाय होत नव्हता. मग उत्पन्नाचे इतर पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात असल्यामुळे पशुखाद्याला चांगली मागणी असते हे लक्षात आलं. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात ‘गोकुळ दूध संस्था’ चांगलं काम करत आहे. त्यामुळे भागातील दुग्ध व्यवसाय चांगलाच प्रगतिशील आहे.
सन २०१८ साली “श्रीराम फीड्स” या नावाने पशुखाद्यनिर्मिती व्यवसाय सुरू केला. ‘सह्याद्री पशुखाद्य’ या ब्रँड अंतर्गत पशुखाद्य विक्री सुरू केली. जवळच्या मुख्य बाजारपेठेत विक्री दुकान सुरू करून व्यवसाय सुरळीत केला.
आमचा गाव हे डोंगराळ भागात येते. त्यामुळे भात हे प्रमुख पीक शिवाय पशुखाद्यातील प्रमुख घटक हा भातातील उपघटक असतात. याआधी इतर राईस मिलमधून उपघटक विकत घेतले जात. कोरोनानंतर २०२१ साली “सह्याद्री राईस मिल” नावाने भातप्रक्रिया उद्योग सुरू केला.
भागातील शेतकऱ्याकडून चांगल्या दरात भात खरेदी करून मुख्य तांदूळ हा बाजारपेठेत विक्री होतो. शिवाय भातातील शिल्लक उपघटक पशुखाद्यात वापरले जातात. सध्या शेतकऱ्यांना उच्च भाव असणाऱ्या भात पिकाबद्दल लागवडीसाठी मार्गदर्शन केले जाते. नंतर तयार भात योग्य बाजारभावात खरेदी केले जाते.
तयार तांदूळ “शेतकरी ते ग्राहक” तत्त्वावर विक्री केली जाते. सध्या आमच्याकडे इंद्रायणी, शुभांगी, आजरा घनसाळ, रत्नागिरी, कर्जत अशा विविध जातीचे तांदूळ उपलब्ध आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना एकत्रित करून सहकारी तत्त्वावर शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्याचा विचार आहे.
उद्योजकांचे नाव : सुशांत शामराव देसाई
शिक्षण : BE Mechanical
जन्मदिनाक : ७ मे १९९३
जिल्हा : कोल्हापूर
व्यवसायाचे नाव :
- १) श्रीराम फीड्स (२०१८)
- २) सह्याद्री राईस मिल (२०२२)
- ३) श्री महालक्ष्मी महिला गृहउद्योग (२०१७)
- ४) विमा व्यवसाय (जीवन, आरोग्य, जनरल) (२०२४)
व्यवसायाचा पत्ता : टिक्केवाडी, तालुका : भुदरगड, जिल्हा : कोल्हापूर, पिन – ४१६२०९
संपर्क क्रमांक : 8668274594
ई-मेल : sushantsdesai993@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.