उद्योजकाचे नाव : स्वप्नेश राजेंद्र किनरे
व्यवसायाचे नाव : किनरे सर्व्हिसेस
व्यवसायाची स्थापना : २४ जानेवारी २०२३
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)मला लहानपणापासूनच व्यवसायाची आवड होती. कॉलेज संपल्यावर सगळेच कोणती नोकरी करायची या विचारात असताना मी मात्र कोणता व्यवसाय सुरू करता येईल या विचारात होतो.
मी राहतो त्या आजूबाजूच्या परिसरात सर्व कार्ड्सची कामे (Aadhaar, Pan, Voter, Etc.) एकाच ठिकाणी होतील असे ठिकाण नव्हते, तसेच लोकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते, कामे लगेच होत नव्हती. मग मी विचार केला की आपण ही समस्या दूर करूया. तेव्हा मी माझे ‘ग्राहक सेवा केंद्र’ (Maha E Seva Kendra) सुरू केले.
याचबरोबर मला शाळेपासूनच Trading & Investment चीसुद्धा खूप आवड होती. म्हणून मग मी, या व्यवसायाबरोबरच फावल्या वेळात Trading & Investment सुद्धा करतो. आज माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक वर्ष झाले आहे. सर्वांचा खुपच उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे सगळं करण्यामध्ये मला माझ्या कुटुंबाची खूप साथ मिळाली. त्यांनी माझ्यावर कधीच दबाव दिला नाही की नोकरी कर. मला व्यवसाय करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं. आजच्या ह्या स्पर्धात्मक युगात, जिथे नोकरी मिळणे कठीण झाले आहे, तिथे मी माझा स्वतःचा व्यवसाय करतो आहे ह्याचा मला अभिमान आहे.
आमची कंपनी खालील सेवा देते :
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, आभा कार्ड, आयुषमान कार्ड, ई-श्रम कार्ड, पासपोर्ट, आयकर रिटर्न भरणे, राजपत्र व इतर सेवा
संपर्क क्रमांक : 7756993483 / 9011897644
पत्ता : सदसहयोग हौसिंग सोसायटी, मु. पो. वरसे, तालुका – रोहा, जिल्हा – रायगड – 402116
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.