स्वच्छतेची ऑरगॅनिक उत्पादने निर्माण करणारा ‘स्वीफ्टी’

शेखरच्या आईची त्वचा अत्यंत संवेदनशील आहे. तिला कोणत्याही साबणामुळे त्वचाविकार होतात. भांडी घासल्यानंतर तर बोटांना जखमा होऊन त्यातून रक्त यायचं. शेखर लहान असताना त्याला खूप वाईट वाटायचं की आपण आईची काहीच मदत करू शकत नाही आणि तिच्या हाताला दुखापत झाली तरी सगळी कामे करावीच लागतात.

पुढे इंजिनिअरिंग केल्यानंतर शेखर अपघातानेच रसायनशास्त्राच्या संपर्कात आला. काही रसायने, विशेषतः ऑरगॅनिक रसायने वापरून आईच्या संवेदनशील त्वचेसाठी काहीतरी नक्कीच करता येईल असे त्याला वाटले. बरेच संशोधन करून शेखरने भांडी घासण्याचे लिक्वीड बनवले आणि ते आईला वापरण्यास दिले.

आईचे कष्ट मोठ्या प्रमाणात कमी झाले आणि महत्त्वाचे म्हणजे तिच्या त्वचेला कुठलाही त्रास झाला नाही. आई खुश झाली. मग आईने ते लिक्वीड तिच्यासारखया बऱ्याच महिलांना दिले. त्यांनाही त्याचा चांगलाच अनुभव आला. मग शेखरने ठरवले की आपण अशीच आणखी काही उत्पादने तयार करून भारतातल्या प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवावीत.

शेखरच्या या प्रयत्नांना सपनाने खंबीर साथ दिली आणि त्यांनी या उत्पादनांचे नाव ठेवले ‘स्वीफ्टी’. हे नाव ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही उत्पादने पर्यावरण आणि त्वचेवर सॉफ्ट असली, तरी ज्यासाठी ती तयार करण्यात आली आहेत ते काम अतिशय चोख आणि कमी श्रमात पार पाडतात.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

ऑरगॅनिक केमिस्ट्रीवर आधारित ही उत्पादने मुख्यतः ५० टक्के पाणी वाचवणाच्या दृष्टीने बनवण्यात आली आहेत. याशिवाय अत्यंत प्रभावी आणि कार्यक्षम अशा ‘नेक्स्ट जेनरेशन केमिस्ट्री’चा उपयोग करून अत्यंत जलदरीतीने काम करणाऱ्या आमच्या उत्पादनांना स्वीफ्टी (अत्यंत जलद) हे अत्यंत समर्पक नाव दिले.

‘स्वीफ्टी’चे वेगळेपण

स्वीफ्टी हायजिन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडने स्वतःसाठी ५ मुख्य मार्गदर्शक तत्त्वे आखून घेतली आहेत. या तत्त्वांनुसारच कंपनीचे काम चालते. ती तत्त्वे म्हणजे…

१. पर्यावरणपूरक उत्पादने जी किमान ५०% पाणी वाचवतील.
२. कुठल्याही विषारी रसायनांपासून मुक्त.
३. अत्यल्प प्रमाणात वापरावे लागणारी स्वच्छतेची उत्पादने.
४. बहुउपयोगी स्वच्छतेची उत्पादने
५. सर्वोत्तम दर्जाची उत्पादने सर्वोत्तम किमतीत


तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा


‘स्वीफ्टी’ची उत्पादने

१. स्वीफ्टी फ्लोअर क्लिनर
२. स्वीफ्टी युटेन्सिल क्लिनर
३. स्वीफ्टी कार शाम्पू
४. स्वीफ्टी ग्लास अँड सरफेस क्लिनर
५. स्वीफ्टी सोफा & कारपेट क्लिनर
६. स्वीफ्टी रस्ट रेमूव्हर
७. स्वीफ्टी इंडस्ट्रिअल हॅन्ड वॉश
८. स्वीफ्टी टॉयलेट क्लिनर

ब्रॅण्डचे नाव : स्वीफ्टी
ब्रॅण्डची स्थापना : ३० मे २०२३
ब्रॅण्ड कशाचा आहे? : स्वच्छतेची उत्पादने
कंपनीचे नाव : स्वीफ्टी हायजिन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीचे डायरेक्टर्स

सपना बापट : तरुण तडफदार आणि प्रभावी व्यक्तिमत्व, उच्चशिक्षित, पर्यावणरणासाठी नेहमी काही तरी करण्याची तयारी याशिवाय उपजतच असलेले नेतृत्वगुण अशा आमच्या कंपनीच्या पूर्णवेळ डायरेक्टर सपना बापट. सपना यांची कारकीर्द नक्कीच प्रत्येक गृहिणीसाठी प्रेरणा देणारी आहे. येत्या दोन वर्षांमध्ये किमान २ हजार गृहिणींना उद्योजिका बनवण्याचे सपना यांचे स्वप्न आहे.

शेखर लोखंडे : रिसर्च अँड मॅनुफॅक्चरिंग प्रमुख. शेखर लोखंडे यांनी विविध क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्या त्या क्षेत्रातील समस्यांचा अभ्यास केला. त्या समस्यांवर योग्य उपाय शोधून काढले आणि तशी उत्पादने तयार केली. यासाठी लागणारे संशोधन त्यांनीच केले आहे. त्यांनी तयार केलेली उत्पादने घरांमध्ये तर वापरता येतातच, पण उद्योग क्षेत्रात त्यांना मोठी मागणी आहे. कंपनीचे R&D आणि उत्पादन विभाग ते समर्थपणे सांभाळतात.

महेश धर्माधिकारी : विपणन शाखेचे पदवीधर असलेले महेश धर्माधिकारी आमच्या कंपनी चे विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग हा विषय शिकवण्याचा अनुभव आहेच, पण त्याचबरोबर त्यांना मार्केटिंग क्षेत्राचा सुमारे २५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे.

Name : Sapana Bapat
Designation : Director
Contact number : 9175896437/8
Email ID : Sapana@theswiftyy.com
Swiftty.sapana@gmail.com


तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा


Factory : Mayem, Bicholim, Goa
Office : B102, Prestige Point, Warje Malwadi, Pune

Website: https://www.theswiftyy.com
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100093615908838
LinkedIn: https://www.linkedin.com/in/sapana-bapat-7a6baa17
Instagram: https://www.instagram.com/swiftyyhygiene/
YouTube: https://www.youtube.com/channel/UCs58n_OhyrlEZ-V9A4qegoQ
Twitter: https://twitter.com/SwiftyyHygiene

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?