स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct

विचार करा, तुम्ही तुमच्या खास मित्रमैत्रिणींसोबत घरी गप्पा मारत बसला आहात. सर्वांना मधेच भूक लागली. तुम्ही मोबाइल काढलात, तुमच्या परिसरातील सर्व हॉटेल्समधील मेन्यू बघून सर्वोत्तम पदार्थ सर्वोत्तम किमतीत बुक केलात आणि थोड्याच वेळात तुम्हाला तुमची गरमागरम ऑर्डर घरपोच मिळाली. किती छान ना! हीच कल्पना नंदन रेड्डी, श्रीहर्ष मजेती आणि राहुल जैमिनी यांनी ‘स्विगी’ रूपात आज प्रत्यक्षात आणली आहे.
स्विगी अॅप डाऊनलोड केल्यावर आपल्या समोर आपल्या परिसरातील सर्व हॉटेल्स, कॅफे इत्यादींची यादी येते. त्यानंतर आपण आपल्याला हव्या त्या हॉटेलमधला हवा तो मेन्यू निवडून स्विगीवर ऑर्डर देऊ शकतो आणि घरबसल्या काही मिनिटांत आपल्या घरी तो मेन्यू स्विगीचा कर्मचारी घेऊन येतो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
राहुल जैमिनी हा एक आय.आय.टी. इंजिनीअर, तर श्रीहर्ष मजेती हा आय.आय.एम. कलकत्ता आणि बिट्स पिल्लानीचा माजी विद्यार्थी आहे. भारतातील हॉटेल इंडस्ट्रीचे स्वरूप बदलण्याचे त्याचे स्वप्न आहे. नंदन रेड्डीने बिट्स पिल्लानीमधून भौतिकशास्त्रात एम.एस्सी. केले, परंतु त्याचा कलसुद्धा फूड इंडस्ट्रीतच आहे.
स्विगीची सुरुवात २०१४ च्या डिसेंबर महिन्यात झाली. सुरुवातीला फक्त बंगळुरूमध्ये स्विगी कार्यरत होते. आज निव्वळ २३ महिन्यांत स्विगी बंगळुरूसह मुंबई, पुणे, दिल्ली, गुडगाव, कलकत्ता, हैदराबाद, आणि चेन्नई अशा आठ शहरांत ग्राहकांना त्यांच्या आवडीचे पदार्थ घरपोच पुरवत आहे.
प्रत्येक यशस्वी स्टार्टअपच्या मागे एक उत्तम कल्पना आणि लोकांना होणार्या त्या कल्पनेचा उपयोग हे असते. लोकांना घरपोच गरमागरम खाणं, तेही त्यांच्या आवडत्या रेस्टाँमधलं पुरवणं, हे स्विगीचं मुख्य उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसह स्विगी आपल्या ग्राहकांची पुरेपूर काळजी घेते.
सुरुवातीला स्वतःच्या खर्चातून नंदन, श्रीहर्ष आणि राहुल यांनी स्विगी सुरू केले आणि आज स्विगी गुंतवणुकीच्या तिसर्या फेरीत आहे. लोकांचा जास्तीत जास्त विश्वास मिळवून मोठे होत जाणे आणि भारतातील खाण्याचे स्वरूप उत्तमोत्तम करून ग्राहक मित्र होणे हे स्विगीचे ध्येय आहे. आज भारतातील उत्तम स्टार्टअप्सच्या यादीत स्विगीचे नाव नोंदवले जात आहे.
– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.