UPI वापरा, कोरोनाला थांबवा

आतापर्यंत आपल्याला हे माहीत झालं असलेच कि, कोरोनाचा विषाणू अन्नधान्य आणि पेयांतून पसरू शकत नाही, पण तुम्हाला माहीत आहे का हा विषाणू चलनी नोटा आणि नाण्यांच्या माध्यमातून पसरण्याचा धोका आहे, हे ठाऊक आहे का?

हो, हे खरं आहे!

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ झाल्यापासून भारत सरकारने लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक पाऊलं उचलायला सुरुवात केली. पण घराबाहेर सतत हात धुणे शक्य नसल्यामुळे अखिल भारतीय व्यापारी संघटनेने सरकारला चलनी नोटांमार्फत पसरणाऱ्या रोगांची मोठ्या प्रमाणावरील तपासणीचे आदेश देण्याची विनंती भारत सरकारला केली.

कोरोना विषाणू (COVID-19) काय आहे?

जागितीक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोना विषाणू हा सामान्य सर्दीपासून मध्यम स्वरूपाच्या आणि तीव्र स्वरूपाच्या श्वसनाच्या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा मोठा गट आहे. इतकंच कि नॉवेल कोरोना अर्थात कोविड – १९ हा माणसांमध्ये पूर्वी कधी न आढळलेला विषाणू आहे. नव्यानेच आढळल्याने कोरोना विषाणू कशामुळे होतो, याबद्दल सध्यातरी पुरेशी स्पष्टता आलेली नाही. तूर्तास डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांना इतकंच कळलं आहे कि, सदर विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंका यामार्फत तो पसरतो.

ज्या देशांत हा विषाणू जलदगतीने पसरत आहे, तिथे रोख रकमेची अदलाबदल ही जास्त जोखमीची ठरू शकते, असं इकॉनॉमिक टाइम्सच्या अलीकडच्याच एका लेखात आहे. भारतामध्ये भाजी बाजार, रिक्षा किंवा हॉटेलात लहान-सहान गोष्टीसाठी देताना रोख रक्कम वापरली जाते. पण यामुळे आपणच अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे सरकारने सुद्धा रोख रकमेच्या वापर टाळण्यास सांगितले आहे.

मग आता काय?

जाहिरात

चलनी नोटा या संसर्गजन्य रोगांचे सोपे वाहक असतात. खरंतर २०१६ मध्ये प्रगत संशोधनाच्या आंतरराष्ट्रीय पुस्तकात ५८ टक्क्यांहून अधिक नोटांवर रोगकारक सूक्ष्मजीव आढळून आल्याचे म्हटले आहे. म्हणूनच अशा कठीण काळात पैशाच्या देवाण-घेवाणीसाठी डिजिटल पेमेंट्स हा पर्यायच योग्य ठरतो.

खालील मार्गांनी आपण डिजिटल पेमेंट्सचा लाभ घेऊ शकतो:
१. क्युआर कोड (QR Code):

हल्ली प्रत्येक दुकानात कॅश काउंटरवर QR कोड पाहायला मिळतो. आपल्या दुकानात नसल्यास आपण तो सहज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला गरज आहे ती अशा UPI एपमधून (गुगल पे, फोनपे, भीम, पेटीएम) तुमचा क्युआर कोड डाउनलॊड करून छापून घेण्याची. ग्राहक छोट्यातल्या छोट्या रकमेचे पेमेंट या क्युआर कोडने करू शकतात. चालू इंटरनेट कनेक्शन असल्यास क्युआर कोड स्कॅन करून अगदी काही सेकंदात पेमेंट करता येते.

२. युपीआय UPI

युपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface) हा आज ऑनलाईन पेमेंट करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. या माध्यमातून भारतात दर महिन्याला १ अब्जाहून अधिक व्यवहार नोंदवले जातात. यामध्ये मोबाईलद्वारे ऑनलाईन पेमेंट करता येते. पण त्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलमध्ये असं युपीआय ऍप असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या फोनवर गुगल पे, फोनपे, भीम यूपीआय यापैकी एक वापरू शकता. तसेच आपला यूपीआय आयडी इ-वॉलेट्स आणि ऑनलाईन ऍपमध्ये लिंक करू शकता.

३. कार्डचा वापर:

जर आपल्या व्यवसायात ग्राहकांकडून प्रचंड मोठ्या रक्कमेची देवघेव करण्याची गरज पडत असल्यास कार्डचा वापर हा रोख रकमेला योग्य पर्यायी मार्ग आहे. गेली अनेक वर्षे बऱ्याच व्यवसायांत ऑनलाईन देयकांसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला जात आहे.

४. पेमेंट गेटवे :

मोठ्या रकमेचे देयक स्वीकारण्यासाठी पेमेंट गेटवेचा (जसे इन्स्टामोजो, पेयुमनी) वापरसुद्धा करता येईल. यामध्ये तुम्हाला फक्त ग्राहकांना तुमची पेमेंट लिंक द्यायची आहे, ज्यावर क्लिक करून ग्राहक युपीआय, NEFT/IMPS, ई-वॉलेट किंवा कार्ड यापैकी काहीही वापरून पैसे भरू शकतात. आता NEFT २४ तास चालू असल्यामुळे ग्राहक कुठूनही, कसेही पेमेंट करू शकतात.

५. ई-वॉलेट/ डिजिटल वॉलेट :

वॉलेट्स जसे कि पेटीएम, एअरटेल, झेटा अशा ऍप मध्ये भरून ठेवलेल्या पैशांच्या माध्यमातूनच पैशांची देवाण-घेवाण करता येते.

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आरबीआयने खालील निर्देश दिले आहेत:

● एटीएममधून रोख रक्मम काढताना मशीन वापरण्यापूर्वी आणि वापरानंतर किबोर्ड टिश्युने पुसून घ्या. गर्दी असल्यास एटीएममध्ये जाऊ नका. रोख रक्कम हाताळल्यानंतर शक्य असेल तर हातातला सॅनिटायजर लावा.

● कार्यालयात सॅनिटायजरचा वापर पुरेसा होत असला तरी आजारी कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष द्या आणि शक्य असल्यास घरून काम करण्याची परवानगी द्या.

● तुमची भांडी आणि चमचे स्वच्छ न करता इतरांना देऊ नका.

● इतर व्यक्तींपासून योग्य अंतर बाळगा.

● खोकला किंवा शिंका आल्यास तोंड बंद ठेवा.

● मीटिंगमध्ये, तसेच ग्राहक आणि विक्रेते यांची भेट घेताना हात मिळवणे टाळा.

● जर तुमच्या व्यवसायात वितरण सेवा आवश्यक असेल तर आपल्या वितरकांना मूलभूत स्वच्छतेच्या सवयींबद्दल माहिती द्या.

● पॅकेज उघडल्यावर हात व्यवस्थित स्वच्छ करण्याचा निरोप आपल्या पार्सलवर आपल्या ग्राहकांसाठी देऊ शकता.

● पार्सलची वाहतूक वेगवेगळ्या प्रकारे होते, त्यामुळे कित्येक लोकांच्या हातांमधून ते जाते, त्यामुळे सतर्कता आवश्यक आहे.

घाबरून नका. लक्षात ठेवा,

चेहऱ्याला वारंवार हात लावू नका आणि महत्व्वाचे म्हणजे आजच ऑनलाईन पेमेंट घ्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या आणि इतरांवरचासुद्धा धोका कमी होईल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?