उद्योगसंधी

टॅटू आर्टिस्ट बना आणि महिन्याला हजारो कमवा!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


पूर्वी धार्मिक कारणांमुळे किंवा हौस म्हणून शरीरावर गोंदण काढत, पण आज टॅटू या फॅशन व फॅडने खूप मोठे उद्योगाचे स्वरूप धारण केले आहे व ते वाढतच चालले आहे. आज मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्लीसारख्या ठिकाणी शहरांत शेकडो टॅटू आर्टिस्ट आपला व्यवसाय करीत आहेत. मोठमोठे टॅटू स्टुडिओ निघत आहेत.

मुंबईत वांद्रे, अंधेरी, कुलाब्यासारख्या अत्यंत महागड्या ठिकाणी असे व्यवसाय उभे राहत आहेत. केवळ स्टुडिओच्या जागेचे भाडे महिना ५० हजार ते १ लाख रुपये असते. लहान शहरातसुद्धा हा व्यवसाय वाढत आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

अनेक मोठे देश जे पर्यटन व्यवसायाला चालना देतात ते दुसर्‍या देशातील टॅटू आर्टिस्टना आपल्या देशात बोलवत आहेत. त्यामुळे टॅटू आर्टिस्टना विदेशात जाण्याच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. काहींनी मोठे टॅटू स्टुडिओ सुरू करून ४ ते ५ कर्मचारी नेमले आहेत. टॅटू हा कॉस्मेटिक इंडस्ट्रीतला आता मोठा उद्योग झाला आहे.

एकट्या मुंबईत टॅटू उद्योगाची वार्षिक उलाढाल २० कोटींपेक्षा जास्त आहे. एक ब्लॅक व्हाइट टॅटू काढण्यासाठी प्रति चौरस इंचाला पाचशे रुपये, तर रंगीत टॅटूसाठी आठशे रुपये आकारले जातात. हे दर सर्वसाधारण टॅटू आर्टिस्टचे आहेत.

नावाजलेले टॅटू आर्टिस्ट एका टॅटूला १५ ते २० हजार रुपये घेतात. विदेशातील पर्यटन क्षेत्र उदा. मॉरिशस, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, दुबई, स्वित्झरलँड येथे टॅटू आर्टिस्ट दर तासाला १०० ते १५० डॉलर आकारतात. एक चांगला टॅटू पूर्ण होईपर्यंत ५०० डॉलर बिल होते. एक टॅटू डिझाइनर महिना १० हजार डॉलर कमवतो (६ लाख रुपये). मुंबईत टॅटू डिझायनर्स महिना १ लाखांपर्यंत कमवतात.

या क्षेत्रात बरेच प्रकार आले असून परमनंट टॅटू, टेम्पररी टॅटू, टॅटू रीमूव्हल, टॅटू विथ नॅचरल कलर, कस्टम टॅटू इत्यादी. बॉलीवूड व तरुणाईत आलेले टॅटूचे फॅड आता महागडा व्यवसाय होऊ पाहत आहे. पूर्वी तरुण-तरुणी सोन्याचे दागिने खरेदी करत, आज महागडा मोबाइल, टॅटूवर पन्नास हजारांपर्यंत खर्च करतात.

हा व्यवसाय कलेचा आहे. चांगले डिझाईन काढता येणे व शिकणे हे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांची चित्रकला चांगली आहे ते या उद्योगात सहज येऊ शकतात. इतरांना मात्र चांगला सराव व अभ्यास करावा लागेल. आज या क्षेत्रात कॉम्प्युटर, सॉफ्टवेअरचाही वापर खूप वाढला आहे. लेसर तंत्राचा वापर करून टॅटू डिझाईन होत आहेत.

हा व्यवसाय शिकण्यासाठी तुम्हाला १ ते ३ लाख रुपये खर्च येईल व एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यानंतर तुम्ही स्वत:चा व्यवसाय देशात किंवा विदेशात सुरू करू शकता. देशात तुम्हाला महिना ५० हजार ते १ लाख महिना नफा, तर विदेशात ३ ते ५ लाख रुपये मिळू शकतील.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!