Advertisement
उद्योगसंधी

चहाचे दुकान : अद्वितीय अशी भारतीय उद्योगसंधी

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

जवळजवळ प्रत्येक भारतीय हा दिवसातून किमान दोन वेळा चहा पितोच पितो. त्यामुळे चहा हे एकप्रकारे भारतातील राष्ट्रीय पेयच आहे, असं म्हटलं तर ते अगदीच चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच भारतामध्ये अन्नधान्य क्षेत्रात चहाचे दुकान सुरू करणे यासारखा सोपा व्यवसाय शोधून सापडणार नाही. याबरोबरच चहा बनवायला शिकण्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नसते. आपल्याला आपल्या आई, बहीण, पत्नी यांच्यापैकी कोणाकडूनही चहा बनवायला शिकता येईल.

चहाचे वेगवेगळे प्रकार शिकण्यासाठी आपण युट्युब, गुगल यांसारख्या डिजिटल माध्यमांचा आधार घेऊ शकतो. तेही पैसे खर्च न करता. एकूणच कमीत कमी गुंतवणुकीतसुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकतो आणि उत्तम नफाही मिळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कसा सुरू करायचा हा व्यवसाय.

Advertisement

१. बाजाराचा अभ्यास :

या व्यवसायात दुकानाची जागा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे सर्वप्रथम ज्या शहरात आपण चहाचे दुकान सुरू करणार असू, तेथील गर्दीच्या जागा  धुंडाळणे, हिंडणे उपयोगी ठरेल. जसे की रेल्वे स्थानक, रुग्णालय, मुख्य बाजार, इत्यादी.

हे करत असताना आपण जर त्या ठिकाणच्या जुन्या चहाच्या दुकानांना भेट देऊन दर तासाला, दर प्रहराला चहाची किती विक्री होते याची माहिती गोळा केली तर त्यामुळे प्रत्येक जागेजवळील या व्यवसायाची गरज आणि त्यामधील स्पर्धेची माहिती मिळेल. यामुळे तुमचं या व्यवसायाबद्दलचं सामान्य ज्ञान वाढायलाही मदत होईल.

२. पूर्वतयारी

▪️ सर्वप्रथम कोणकोणती उत्पादने तुम्ही विकणार आहात, ते ठरवा. उदा. चहा, कॉफी, ग्रीन टी वगैरे.

▪️ आता तुमच्या उत्पादनांचा प्रति युनिट दर ठरवा.

▪️ कच्चा माल जसं चहापावडर, दूध यासाठी नियमित पुरवठादारांचा शोध घ्या व या खरेदीसाठी एक दुकान ठरवा. जेणेकरून गरज भासल्यास तुम्हाला उधारीवर माल, वस्तू मिळू शकतील.

३. गुणवत्तेची चाचणी :

व्यासायिक पातळीवर चहाची विक्री सुरू करण्यापूर्वी तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना तुमच्या चहाची चव द्या. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून आवश्यक वाटल्यास योग्य ते बदल करा.

तुमच्या दुकानातील चहामध्ये वेगळेपणा जसं ग्रीन टी, ब्लॅक टी वगैरे असू द्या. जेणेकरून दुकानाजवळच्या परिसरात एक वेगळी ओळख निर्माण होईल. या वेगळ्या प्रकारच्या चहामुळेच तुमची प्रसिद्धी वाढेल.

ग्रीन टी, ब्लॅक टी असे चहाचे बरेच प्रकार आहेत. दुधाच्या चहाशिवाय इतर चहाच्या प्रकारांमुळे तुम्हाला विविध प्रकारचे ग्राहक मिळवण्यास मदत होईल, जसं की आरोग्याबद्दल सतर्क असणारे ग्राहक ग्रीन टीला प्राधान्य देतात.

४. व्यवसायाचे नाव

आता गरज भासेल ती म्हणजे व्यवसायाचे नाव निवडण्याची आणि आवश्यक परवाने काढण्याची. या दोन्ही गोष्टी ऑनलाईन आणि ऑफलाईन यांपैकी कोणत्याही एका माध्यमातून करता येतील.

५. दुकानाची जागा

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

एकदा का वरील ४ ही गोष्टी व्यवस्थितपणे पूर्ण केल्या की, सुरुवातीला केलेल्या बाजाराच्या अभ्यासातून दुकानाची जागा ठरवा. गरजेच्या सर्व वस्तू तिथे पोचत राहतील, याची व्यवस्था करा. या सर्वांसोबतच दुकानातील स्वच्छताही महत्त्वाची आहे. जी तुम्हाला उत्तमोत्तम ग्राहक मिळवण्यात सहाय्यक ठरेल.

एकूणच भारतामध्ये वरील ५ गोष्टींची पूर्तता केल्यास कमीत कमी गुंतवणुकीमध्ये, कोणत्याही विशेष कौशल्याशिवाय, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा चहाच्या दुकानासारखा दुसरा व्यवसाय नाही, असं म्हणता येईल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!