Advertisement
उद्योगवार्ता

सोलापुरात सरकार देणार गारमेंट पार्कसाठी २५ एकर जागा

सोलापूर (महान्युज): गारमेंट पार्कसाठी सोलापुरात लवकरच २५ एकर जागा उपलब्ध करून देणार, असे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर केले. सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या युनिफॉर्म गारमेंट आणि होम टेक्स्टाईल्स मॅन्युफॅक्चरर्स प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले, त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, मफतलाल उद्योग समुहाचे अध्यक्ष ऋषीकेश मफतलाल, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर अजयकुमार साहू, रामवल्लभ जाजू, एन.बी. रघुनाथ, निलेश शहा, राजू शहा, सतीश पवार आदी उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सोलापुरातील विडी उद्योगाला फारसे भवितव्य नाही. सध्या या उद्योगातील कामगारांना रोजगार देण्यासाठी वस्त्रोद्योगाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सोलापुरात गारमेंट पार्क, टेक्स्टाईल क्लस्टर, रेशीम पार्क अशा विविध योजना राबवण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून गारमेंट पार्कसाठी लवकरात लवकर २५ एकर जागा देण्याचा निर्णय घेतला जाईल.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

नरसिंग गिरजी गिरणीच्या जागेत टेक्स्टाईल पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी दूर करून लवकरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. सोलापूरचे ब्रँडिंग करण्यासाठी तीन दिवसाचे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापूरच्या रेडिमेड उद्योगाला भरभराट येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, सोलापूर एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होते. आता गारमेंट हब आणि टेक्स्टाईल हब म्हणून प्रसिद्ध व्हायला हवे. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मफतलाल यांनी सोलापुरातील उद्योजकांशी सहकार्य करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.


Smart Udyojak | e-Magazines | All Issues

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: