काळामागे पडत चाललेलं हस्तलेखन आणि त्यासोबत लोप पावत चाललेलं फाउंटन पेन यांना पुन्हा एकदा आपल्या रोजच्या वापरात आणण्यासाठी आम्ही ७ व ८ मार्च रोजी ‘द इंडिया पेन शो’ आयोजित होत आहे.
- ठिकाण : नेहरू सेंटर, वरळी, मुंबई
- तारीख : ७ व ८ मार्च, २०२०
- वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ७
- एन्ट्री फी : मोफत
आजच्या काळात फाउंटन पेन शो इतका महत्त्वाचा का?
आज स्मार्टफोन आणि संगणक आपल्या संभाषणाची जागा घेऊ लागले आहेत. हे असेच चालू राहिल्यास लवकरच लिहिण्याची कला अस्तंगत होईल आणि आपल्या पुढच्या पिढीला अनेक कौशल्यांपासून आणि मेंदूच्या विकासापासून वंचित राहावे लागेल. अनेक शोध व अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की इतर गोष्टींच्या बरोबरीने लिहिणे हे विकासासाठी परिणामकारक व फायद्याचे असते.
एवढेच नाही तर Environment Protection Agency (EPA) च्या म्हणण्यानुसार दरवर्षी अमेरिकेत १.६ अब्ज युज अँड थ्रो (वापरा व टाका) अशी पेनं वापरतात. यात जगातील इतर वापरा व टाका अशी पेनं मिळवल्यास आणि त्याला ५० वर्षांनी गुणल्यास किती मोठ्या प्रमाणात धातू व प्लास्टिक जमिनीत मिसळले जाते, हे आपल्या लक्षात येईल. लवकरच समुद्रात माशांपेक्षा जास्त टाकाऊ प्लास्टिक आणि जमिनीत खतापेक्षा जास्त प्लास्टिक दिसून येईल.
बाकी सर्वासाठी नाही पण किमान पेनांच्या बाबतीत आपण एक पाऊल नक्कीच उचलू शकतो…
ते म्हणजे फाउंटन पेन वापरणे.
फाउंटन पेनचा वापर हा पूर्णपणे पर्यावरणपूरक असणार नाही, पण कमी प्रतीच्या बॉल पॉईंट पेनशी तुलना केल्यास फाउंटन पेन खूप जास्त पर्यावरणपूरक आहेत. जर तुम्ही सुंदर प्रतीच्या फाउंटन पेन व शाईच्या दौतीत पैसे घातलेत तर ते शंभर बॉल पॉईंट पेनापेक्षा जास्त वसूल होतील आणि फेकाफेकी होणार नाही.
फाउंटन पेन जास्त टिकतात आणि त्यांचा संग्रह करणारे लोकं ही पेनं अगदी २०-३० वर्षसुद्धा चांगल्या स्थितीत वापरत आहेत. प्लास्टिक टाकाऊ पेनं इतकी वर्षे नक्कीच टिकली नसती. अनेक शाळा बॉल पॉईंट पेन आणि जेल पेनाचा आग्रह धरत आहेत, ज्यामुळे प्लास्टिक कचरा वाढत आहे.
आम्हाला असे वाटते की भारतीय स्त्रिया आपल्या मुलांना चारित्र्यवान आणि सदाचारी बनवण्यात सहभागी असतात. त्या बॉल पेनऐवजी फाऊंटन पेन वापरण्याची सवय लावून घेऊन अशा प्रकारे प्लास्टिक कचरा कमी करण्यामधे सहभागी होऊ शकतात. आपले शिक्षक आणि माता अशी प्रतिज्ञा घेऊन पर्यावरण रक्षण करू शकतात. असे वाटते की विशेष करून तरुण मुले आणि विद्यार्थी यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग लिहिणे हा असावा. जेणेकरून त्यांच्या असंख्य कलागुणांचा विकास होईल, जो बोर्डवर किंवा आयपॅडवर लिहून होणार नाही.
शास्त्रीय वस्तुस्थितीसुद्धा पुन्हा हेच अधोरेखित करते की हाताने लिहिणे हे परिणामकारक व उपयोगी साधन आहे-
- UCLA आणि प्रिंस्टन येथील संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जे टाइप करतात त्यांच्यापेक्षा जे हाताने नोट्स उतरवून घेतात त्यांच्या लक्षात महत्त्वाची माहिती जास्त राहते. जे टाइप करतात ते ऐकलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात जी महत्त्वाची असतेच असे नाही. त्यामुळे जे टाइप करतात ते पूर्णपणे समजून घेत नाहीत. त्याउलट जे हाताने लिहितात ते त्यांच्या मेंदूतील Reticular Activating System चा वापर करतात आणि त्यामुळे जास्त महत्त्वाच्या गोष्टींवर भर देतात.
- सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ने २०१२ साली टायपिंग आणि समरण-साठवण यावर अभ्यास केला. या अभ्यासानुसार संगणकावर नोट्स लिहिणारे विद्यार्थी महत्त्वाची माहिती २४ तासांनंतर विसरू लागले. या उलट हाताने लिहीणाऱ्या विद्यार्थ्यांनी एका आठवड्यानंतरही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवली होती आणि शिकवलेल्या माहितीचे विवरण त्यांनी चांगले केले होते.
- करण जेम्स या इंडियाना विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापिकेने एक अभ्यास केला, ज्यात तिने मुलांना पत्र टाइप करण्यास, ट्रेस करण्यास व बनवण्यास सांगितले. ज्या मुलांना लिहिता वाचता येत नव्हते, त्यांचा MRI केली असता त्यांनी अक्षरांकडे पुन्हा पाहिल्याचे लक्षात आले. प्रा. जेम्स च्या लक्षात आले की ज्यांनी हाताने लिहिले, त्यांनी तीन ठिकाणी लिहिले. त्यांच्या मेंदूने मज्जासंस्थीय मार्गाचा वापर (vital neural pathway) केला होता.
- २००९ मधे वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी हे शोधून काढले की पेनाने लिहीणाऱ्या प्राथमिक वयाच्या विद्यार्थ्यांनी चांगली तोलामोलाची कामगिरी केली. त्यांचे लिखाण टाइप करणाऱ्यांपेक्षा कमी वेळात पूर्ण झालेच आणि त्यांनी मोठ्या रचनांची पूर्ण वाक्ये लिहिली. कदाचित म्हणूनच अनेक पुस्तककर्ते त्यांचे पहिले लिखाण हाताने लिहितात. म्हणजे संगणक अथवा टाइप रायटरवर न लिहिता कागद पेन घेऊन लिहितात.
- अनेक अभ्यासातून हे लक्षात येते की हस्तलिखाण कौशल्य आणि श्रेणी यात साधर्म्य आहे. या बाबतचा अभ्यास शोध नुकताच Journal of Early Childhood Education and Development यात प्रसिद्ध झाला आहे. त्याप्रमाणे १,००० मुलांपैकी ज्यांनी सतत हाताने लिहिण्याची सवय केली त्यांनी सवय न केलेल्यांपेक्षा आणि digital platform वर शिकलेल्यांपेक्षा जास्त चांगले काम केले.
संगणकावर गोष्ट लिहिणं, पत्र, निबंध किंवा लेख लिहिणं सोपं वाटू शकतं, पण ते खरं असत का?
- आपण टाइप करताना delete बटण दाबून विचार पुसतो. हाताने लिहिताना वाक्यावर काट मारावी लागते. तर यातील फरक काय आणि तो का महत्त्वाचा असतो? आपण जरी काट मारली तरी लिहिलेलं वाक्य कागदावर आणि आपल्या मेंदूत राहत. आपल्या अंतर्मनात ते दिशा देत आणि ते चांगल्या कामासाठी गरजेचं असत.
- चित्रांच्या माळेतून शब्द तयार होतात. आपण अक्षरांतून शब्द तयार करतो तेव्हा उजवा मेंदू कार्यरत होतो. मेंदूची कलात्मक बाजू, जी चित्र बघते, ती कार्यान्वित होते. संगणकावर लिहिताना असे होत नाही.
- २०१० मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञाने केलेल्या अभ्यासातून लक्षात आले की, ‘हात व बोटांनी लिहिताना रचना केली जाते आणि सुसंगतीत बोटांच्या हालचालीमुळे मेंदूतील अनेक भाग कार्यान्वित होतात. तसेच प्रक्रिया होते व माहिती लक्षात राहते.’
- जरी हाताने लिहिणे सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी असले तरी जास्त करून डिस्लेक्सिया असलेल्यांना करसिव्ह लिपी लिहिताना उपयोगी पडते. अकॅडेमिक थेरपिस्ट देबोर स्पिअर यांच्या म्हणण्यानुसार याचे कारण म्हणजे, ‘करसिव्ह लिहिताना अक्षर एका लाईनीतून सुरू होतात आणि पेन डावीकडून उजवीकडे सातत्याने सरकते, त्यामुळे डिस्लेक्सिक विद्यार्थ्यांना, ज्यांना शब्द रचना जड जाते त्यांना सोपे पडते.
- हस्तलिखित wish list तयार केल्याने त्या गोष्टी करण्यासाठी मासिक बाळ मिळते.
- हस्ताक्षर तज्ज्ञ डॉ. मार्क सिफर यांनुसार हाताने लिहिणे हा ग्रॅफो थेरपीचा एक प्रकार आहे. ज्यांना ध्येय आहे व ते गाठायचे आहे त्यांनी ध्येय वीस वेळा दररोज लिहावे. डॉ. सिफर म्हणतात की असे केल्याने “माणूस शांत होतो व त्याचा मेंदू तशाप्रकारे तयार होतो.”
तुम्हाला असे वाटेल की तुम्ही शाळेत गेला आहात पण खरेतर याचा उपयोग तुमचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी होतो.
काळामागे पडत चाललेलं हस्तलेखन आणि त्यासोबत लोप पावत चाललेलं फाउंटन पेन यांना पुन्हा एकदा आपल्या रोजच्या वापरात आणण्यासाठी आम्ही ७ व ८ मार्च २०२० रोजी ‘द इंडिया पेन शो’ आयोजित करत आहोत. हे वर्ष या उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष आहे. या वर्षी आम्ही अशा महिलांचा गौरव करत आहोत ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात काहीतरी मोठी कामगिरी केली आहे. आमचा असा विश्वास आहे की जसे फाउंटन पेन मोठमोठ्या बदलांची व घटनांची सुरुवात करते त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक स्त्री माहिती, हुशारी व चारित्र्य घडवते ज्यामुळे जगाला आकार येतो.
यातील काही महिला ज्यांचा आम्ही गौरव करत आहोत अशांची नावे :
१. नंदिता ओम पुरी (लेखिका)
२. करिष्मा शेट्टी (टॅरोट वाचक)
३. बिंदू हिंगवाला (एनजीओ चालविणाऱ्या दिव्यांग जेष्ठ नागरीक)
४. सारिका जैन (पोलिओग्रस्त असूनही आय.आर.एस. डायरेक्टर लेव्हल ऑफिसर झालेल्या)
५. नेहा पार्टी (सिनेमॅटोग्राफर)
६. नुपूर काजबजे (प्रोडक्शन हाऊस मध्ये ई. पी.)
७. उपासना मकटी (अंध व्यक्तींसाठी मासिक सुरू करणारी पहिली व्यक्ती)
८. कविता सेठ (गायिका)
९. तृप्ती रस्तोगी (युट्युबर)
१०. मधुरिता (टाइम्स ग्रुप)
११. प्रीती गुप्ता (लेखिका)
१२. शिल्पा (Beleive Digital)
१३. डॉ. उषा मुकुंदन (अनुभवी शिक्षिका व मुख्याध्यापिका)
१४. माटुंगा रेल्वे स्टेशनवरील काही महिला स्टेशन मास्तर
७ व ८ मार्चला होऊ घातलेला ‘द इंडिया पेन शो’ हा भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर होणारा पेन शो ठरणार आहे. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या व वेगवेगळ्या किमतींच्या पेनांशिवाय इतर बरेच काही या पेन शो मध्ये होणार आहे.
यात पुढील गोष्टींचा समावेश असणार आहे :
– अगदी शंभर रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंतची फाउंटन पेन्स
– जगभरातील विविध ब्रँड्स
– फाउंटन पेन्सचा इतिहास, रचना व विकास दाखविणारी टूर
– पन्नासहून अधिक रंगांच्या शाईने लिहून बघण्याची सोय
– वेगवेगळ्या निब्स पडताळून बघण्यासाठी निब टेबलची सुविधा
– फाउंटन पेन कसे वापरावे व इतर जुजबी माहिती देणाऱ्या कार्यशाळा
– कॅलिग्राफी वर्कशॉप्स
– करसिव्ह आणि हस्तलेखन कार्यशाळा
– डुडल आणि झेन आर्ट वर्कशॉप
– निब ट्युनिंग व ग्राइंडिंग कार्यशाळा
– पत्र लेखनासाठी बूथ
फाउंटन पेनच्या चाहत्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
कारण वेगवेगळ्या ब्रँडची पेन्स एकाच ठिकाणी मिळण्यासोबत वेगवेगळ्या कार्यशाळांचा आनंदसुद्धा येथे मिळणार आहे. तसेच केवळ फाउंटन पेन्स नाहीत तर त्यांना लागणारी सर्व साधनेसुद्धा इथे मिळतील.
दुसऱ्या महायुद्धाचा अंत करण्यासाठी जर्मन लोकांनी वापरलेले पारकर ५१ तर बऱ्याच जणांना माहीत आहे. पण याशिवाय सैनिकांनी आपल्या घरी पाठविलेली पत्रे ज्या पेनांनी लिहिली, ज्या पेंनांचा वापर करून युद्धाच्या वेळी षडयंत्रे रचली गेली, ज्या पेनांनी अनेक करारांवर सह्या केल्या गेल्या अशी अनेक पेनं मात्र फार कुणाला ठाऊक नाहीत.
अशाच प्रकारे ज्या महिलांनी उत्कृष्ट कार्य करून स्पॉटलाईट मिळविला त्यांबद्दल आपल्याला माहिती आहे. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्या पडद्यामागे असूनही उत्कृष्ट काम करत आहेत परंतु ते काम आपल्या लक्षात आलेले नाही.
‘द इंडिया पेन शो’ अशा महिलांचा सन्मान करते ज्यांसाठी आयुष्य हेच एक मोठे युद्ध आहे. ‘टिप्स’ला अशा सर्वच महिलांप्रती आदर आहे. याचे प्रतीक म्हणून आम्ही यातील काही महिलांचा गौरव ७ मार्च २०२० ला करणार आहोत.
‘द इंडिया पेन शो’
ठिकाण : नेहरू सेंटर, वरळी, मुंबई
तारीख : ७ व ८ मार्च, २०२०
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ७
एन्ट्री फी : मोफत
एक ₹२५०ची गुडी बॅग उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्याद्वारे तुम्हाला कोणत्याही कार्यशाळेचा लाभ घेता येईल व सोबत एक मोफत फाउंटन पेनसुद्धा दिले जाईल.
‘द इंडिया पेन शो’ आपणा सर्वांचे अशा समूहात स्वागत करते जिथे लिखाण ही आवड आहे आणि शाईने भरलेले बोट हा अभिमान आहे!
संयोजक : विशाल सिंघी
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.