डॉ. जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले ‘द पावर ऑफ युअर सबकॉन्शस माईंड’ हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसलेल्या आपल्या मनाच्या अमाप शक्तीची जाणीव करून देणारे पुस्तक आहे. केवळ आपले विचार व दृढ संकल्प हे आपले जीवन बदलू शकतात, हे या पुस्तकातून सप्रमाण लक्षात येते.
या पुस्तकातील अनेक प्रयोग स्वत: जीवनात अंगिकारून अनेकांनी यश संपादन केले आहे. शास्त्रशुद्धरीत्या मानसशास्त्रावर आधारीत या प्रयोगांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करून प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते.
आपल्या मनातील अचेतन शक्तीचा वापर केल्यास अनेक गोष्टी सहजसाध्य होऊ शकतात, असे डॉ. मर्फी यांनी या पुस्तकाद्वारे समजावून दिले आहे.
अचेतन मनाची शक्ती जागृत करणे, प्रार्थनेतील शक्ती, तिचे महत्त्व यात विशद केले आहे. आपल्या आतील शक्तीचा खजिना, त्यामुळे घडू शकणारे चमत्कार, मनाचे कार्य, प्राचीन व आधुनिक काळातील उपचार, अचेतन मन आणि निद्रा, वैवाहिक समस्या, सुसंवादी मानवी संबंध, मानसिक अडथळे दूर करण्यासाठी होणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले आहे.
उद्योजकाला स्वत:ची दिशा स्वत: ठरवून त्यावर मार्गक्रमण करून यश संपादन करायचे असते. अशावेळी प्रत्येक उद्योजकाला हे पुस्तक हे मार्गदर्शक ठरू शकेल.
‘द पावर ऑफ युअर सबकॉन्शस माईंड’ हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा : https://amzn.to/3pDLtMW
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.