कामात जागतिक पातळीचे परफेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करणारे ‘द डिझाईन वर्ल्ड डॉट कॉम’

the design world Brand Page

‘द डिझाईन वर्ल्ड डॉट कॉम’ हे नाव माझ्या डिझाईन स्टुडिओचे ठेवण्यामागील नियोजन..

१९९१ मी जेव्हा डिझाईनिंग कामाची सुरुवात केली ते २०१९ पर्यंत जितक्या कंपन्यांमध्ये मी काम केले त्या सर्व कंपन्या परदेशी होत्या त्यामुळे तेथे काम करताना कामाच्या बाबतीतील नीटनेटकेपणा आपण ज्याला परफेक्शन म्हणतो हे आपोआपच माझ्या डिझाईन कामामध्ये मध्ये जाणवू लागले व या कंपन्यांचे जे काही कस्टमर होते त्यांना पाहिजे असलेला डिझाईन रिझल्ट किंवा प्रोडक्शन रिझल्ट हासुद्धा तेवढाच परफेक्ट असावा लागत असे, त्यामुळे या कस्टमरकडे किंवा कंपनीमध्ये “चलता है रे” हा प्रश्नच नव्हता.

तेव्हाच मी ठरवले होते आपण ज्या वेळेला आपली स्वतःची डिझाईन फर्म ओपन करू त्यावेळेस आपणसुद्धा आपल्या कस्टमरला याचप्रकारची सेवा पुरवायची. मग तो कस्टमर भारतातला असो किंवा परदेशातला कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रमाईज.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

डॉट कॉम याचा अर्थ आम्ही जेव्हा डिझाईन क्षेत्रात काम करत होतो त्यावेळेला संगणकाची आमच्या क्षेत्रामध्ये ओळख नव्हती त्यामुळे सर्व डिझाईन काम आम्हाला हाताने करावे लागत असे. परंतु जसजसा काळ पुढे सरकत गेला व संगणकाचा वापर सगळीकडेच होऊ लागल्यामुळे डिझाईन क्षेत्र पण त्याला अपवाद नव्हते. मग आम्हीसुद्धा आम्हाला स्वतःला बदलून नवीन आलेल्या संगणकक्रांतीला आम्ही आमच्या डिझाईन क्षेत्रात सामावून घेतले व त्याप्रमाणे पुढील वाटचाल सुरुवात झाली.

यासाठी आज आपण प्रत्येक ठिकाणी बघतो ई-मेल मध्ये किंवा वेबसाईट मध्ये डॉट कॉम (.com) याचा वापर सर्वात शेवटी होतो. यासाठीच डिझाईन हा आरंभ व डॉट कॉम हे अंतिम चरण. आणि हेच समीकरण पूर्ण जगाला लागू असल्यामुळे वर्ल्ड (World)

“The Design World.com”

‘द डिझाईन वर्ल्ड डॉट कॉम’च्या सेवा

आमच्या डिझाईन हाऊसमध्ये कस्टमायझेशन कार्पेट (गालिचे), वॉल-टू-वॉल कार्पेट व रग डिझाइन बनवतो व ते उत्पादन करूनसुद्धा देतो. आमच्या या डिझाइन्स फर्मकडून आपल्याला सर्व प्रकारच्या डिझाइनिंगची सेवा मिळते. आर्टिफिशियल ग्रीन वॉल कार्पेट, कृत्रिम नैसर्गिक झाडांची प्रीमियम श्रेणी; जे तुम्ही आपल्या घराला, बाल्कनी, गार्डन टेरेस किंवा ऑफिसला अधिक सुंदर खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या आर्टिफिशियल ग्रीन वॉल/प्लांट्सने सुशोभित करू शकता.


तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा


यासोबत डिझाईन सल्लागार म्हणून काम पाहतो, आम्ही कमर्शियल डिझायनिंग, ब्रॅण्डिंग, एक्झिक्युशन, सुपरव्हिजन इत्यादी कामे करतो.

The Design World com portfolio

ब्रॅण्डचे नाव : द डिझाईन वर्ल्ड डॉट कॉम
ब्रॅण्डची स्थापना : १२ सप्टेंबर २०१९
ब्रॅण्ड कशाचा आहे? : कस्टमायझेशन – डिझाईन फर्म

संस्थापकांविषयी

मी संतोष हरिश्चंद्र पडेलकर एक मध्यमवर्गीय साधारण अशा कुटुंबामध्ये दादर पूर्वेला (दादासाहेब फाळके रोडवर) असलेल्या चाळीमध्ये माझे बालपण व तरुण पण गेले. माझे वडील मुंबई पोलीस खात्यात कार्यरत होते. माझे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दादर पश्चिम येथील छबिलदास शाळेत झाले.

पुढे कॉलेज शिक्षण मुंबईच्या सर जमशेदभाई जीजीभाई टाटा कला महाविद्यालय येथे झाले. २००३ पासून मी पुण्यामध्ये स्थायिक आहे. माझे ऑफिस कोथरूड वनाज मेट्रो स्टेशनच्या येथे आहे.

Reg. Office: Anand Complex Soc. office, Opp Hotel Kinara, Kothrud, Pune – 411038.

Contact: 8459130347 / 9970064907


तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा


Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?