जीवनाचा सुखद अनुभव हवा असेल, तर वेळेचं व्यवस्थापन हवंच!

या स्पर्धेच्या युगात “लोक काय म्हणतील?” हा विचार करण्यात खूप श्रम खर्च न करता शांतपणे विचार करून जीवनात पुष्टीकरण करून सुखद अनुभव घ्यायचा असेल; तर वेळेचं व्यवस्थापन हवं. नुसतेच कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष अंमलबजावणी व वागणूक, दृष्टिकोन, विचार करून त्या अनुषंगाने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.

अवघड आहे पण अशक्य नाही. कुठलेही चांगले कार्य सुरुवातीला अवघड वाटते, पण एकदा का ते करण्यासाठी प्रयत्न केले की सहज व सोपे वाटते. आपणही जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल आणि वागणुकीचा परिणाम यावर वातावरणातील बदल आणि मानसिक वागणुकीचा आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हा विचार केला असेल.

आपल्या उदंड आयुष्याची स्वप्न माणूस जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत पाहतो. त्यातली काही स्वप्नं पूर्ण होतात, काहींना वेळ लावतो तर काही स्वप्नं दीर्घ काळ पूर्ण होत नाहीत. अशा वेळेस हताश न होता आपल्या आयुष्यात किती व काय साध्य करायचे याचा मागोवा घेतला की जगातील स्पर्धेत आपल्या आयुष्यात किती गणितं सहज सोपे वाटते ते आधी साध्य करायचे व मग पूढील मार्गक्रमण करत रहायचे.

अडथळ्यांना वळसा देत, कुठल्याही परिस्थितीत मनस्थितीचा समतोल ठेवून जगता आलं पाहिजे. अनेकदा लोक कधी स्वभावाच्या, परिस्थितीचा किंवा वागणुकीचा फायदा उचलताना दिसतात.

आपल्या आयुष्यात असे का घडते? हा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. नुसतीच गद्देवागणूक नको, तर प्रत्यक्ष स्थितीवर मात करून पुढे पाऊले टाकली गेली पाहिजेत. यासाठी वेळेचं व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

वेळेचं व्यवस्थापन

‘वेळ’ ही जबाबदारीने, सावधानतेने, विशिष्ट महत्त्वापूर्ण हेतूने चांगलेे नवनवीन उत्पादीत करणारे अंतिम साध्य असावे. वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो. त्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही. वेळेचे नियोजन करताना पुढील बाबी लक्षात घेतल्यास ते करणे सोपे जाईल.

१. उद्दिष्टे ठरवा.
२. त्यातील दीर्घकालीन आणि लगेच साध्य होणारी उद्दिष्टे वेगळी करा.
३. आता तुमच्याकडे असणार्‍या प्रलंबित कृती आणि पुढे करावयाच्या कृती यांची सूची करा.

४. या सूचीचे तातडीची आणि महत्त्वाची कामे, तातडीची पण कमी महत्त्वाची कामे, महत्त्वाची पण कमी तातडीची कामे आणि इतर असे वर्गीकरण करा.
५. त्यातील तातडीची आणि महत्त्वाची कामे करण्यासाठी प्राधान्य द्या. त्यानंतर पुढच्या क्रमाची कामे हाती घेतल्यास नियोजन सोपे जाईल.
६. प्रत्येक वेळी उपलब्ध वेळेचा सदुपयोग कसा करू, याचा विचार करा. प्रतीक्षा वेळ ही देणगी समजा.

७. हाती घेतलेले काम अधिकाधिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
८. प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, उदा. एखादा निरोप घेतांना, तो आपल्याला नीट समजला आहे ना, याची खातरजमा करून घ्या.
९. एखाद्या व्यक्तीला निरोप देतांना त्याला तो नीट समजला आहे ना, याची खातरजमा करून घ्या.

– प्रीती जेम्स

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?