आव्हानात्मक परिस्थितीमधील सुवर्णसंधी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


हीच ती वेळ, स्वतः ला घडवण्याची।
हीच ती वेळ, तयारी करण्याची।
हीच ती वेळ विदेश व्यापार शिकण्याची।

सध्या कोरोना नावाच्या साध्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म राक्षसामुळे जवळजवळ सर्वांचेच आयुष्य एकार्थी जणू स्तब्ध केलं आहे. स्तब्ध झालंय म्हणजे थांबलंय असं कदापि नाही. लाक्षणिक अर्थाने पाहता हा अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. हा अल्पविराम मानवाच्याच दुर्दम्य, परंतु अघोरी महत्त्वाकांक्षेला आळा घालण्यासाठी आहे; असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

आपण या अल्पविरामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून एक उत्तम संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि या मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल याचा विचार केला पाहिजे. जेव्हा हे कोरोनारूपी ग्रहण संपेल तेव्हा आपण पूर्ण आत्मविश्वासाने ‘ अनंतहस्ते कमलाकरांनी’ या उक्तीप्रमाणे हे सकल विश्व कवेत घेण्यास समर्थ झाले पाहिजे. जर सकारात्मकतेने पाहिले तर येणारे सबंध वर्ष हे भारतीय निर्यातदारांसाठी सुवर्णकाळ असणार आहे; हे निर्विवाद!

सरकारी सूचनेचे तंतोतंत पालन म्हणून, स्वहितार्थ, समाजहितार्थ घरी बसणे तर अपरिहार्यच आहे, पण या अपरिहार्यतेचे भांडवल करून घरी बसून टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, वेब सिरीज बघून वेळ दवडण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून काहीतरी दर्जेदार शिकणे व निर्धाराने नवनवीन प्रगतीची शिखरे सर करण्यास सज्ज होणे केव्हाही अधिक श्रेयस्कर आहे

आता तुम्ही म्हणाल यशस्वी व्हायची तयारी करायची म्हणजे नक्की करायचं तरी काय?

👉 आपल्या सध्याच्या क्षेत्राव्यतिरिक्त नवीन एखाद्या विषयाचे ज्ञान संपादन करणे.

👉 व्यावसायिकांनी स्वतःचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा वाढवता येईल याचा विचार करायचा.

👉 जागतिक घडामोडींचा व्यावसायिक दृष्टिकोनातून आढावा घ्यायचा.

👉 ऑनलाईन / ऑफलाईन जमेल तसे आणि मिळेल ते व्यावसायोपयोगी वाचन करायचे.

👉 आपली सर्वोच्च पातळीवरील व्यावसायिक ध्येय ठरवायची.

👉 घरी बसून आपल्याला अधिक अर्थार्जनाच्या दृष्टीने नवीन काय करता येईल हे शिकायचे.

👉 व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आणखी कोणती कौशल्ये आत्मसात करता येतील का याचा विचार करायचा.

👉 सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुसता विचारच करत न बसता प्रत्यक्षात गोष्टी घडवून आणायच्या.

आता आपल्या स्वप्नपूर्तीसाठी झटा. आपल्या आर्थिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा! यशस्वी निर्यातदार व्यावसायिक व्हा! तत्पूर्वी सुयोग्य प्रशिक्षण घ्या. योग्य प्रशिक्षण घेऊन केलेला कोणताही व्यवसाय अत्यंत फलदायी ठरतो.

नवीन गोष्टी शिका, स्वतःला अद्ययावत ठेवा आणि यशस्वी निर्यातदार व्यावसायिक व्हा! सर्व जग आपलीच वाट बघत आहे. गरज आहे ती फक्त आपण पुढाकार घेण्याची.

– सौरभ दर्शने
(लेखक निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार आहेत.)
संपर्क : ८१०४०५५४८९

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?