उद्योजकांसाठी सोशल मीडिया मार्केटिंगच्या काही टिप्स
उद्योगोपयोगी

उद्योजकांसाठी सोशल मीडिया मार्केटिंगच्या काही टिप्स

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपण पाहतो की आज सोशल मीडियाद्वारे प्रमोशन केल्यास विक्रीचे प्रमाण बऱ्याच अंशी वाढते. अर्थात सध्याच्या स्पर्धात्मक युगात सोशल मीडियाद्वारेसुद्धा प्रमोशन करणे अनिवार्य आहे. बऱ्याच उद्योजकांना सोशल मीडियाचा वापर नवीन असल्याने त्यात त्यांचा बराच वेळ खर्च होतो व ज्या प्रमुख विषयांकडे त्यांनी लक्ष देण्याची, वेळ देण्याची गरज असते त्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होते. सोशल मीडिया प्रमोशनमध्ये आपल्याला आपला जास्तीत जास्त वेळ कसा वाचवता येईल हे आता पाहू.

१. सोशल मीडिया चॅनेल्सची निश्चिती

एका वेळी वेगवेगळ्या सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रकारचे प्रमोशन करणे उत्तम,परंतु आपण जर सुरुवात करत असू तर एखादा योग्य प्लॅटफॉर्म निवडून केवळ त्यावरच लक्ष केंद्रित केले तरी उत्तम लाभ होऊ शकतो. यात योग्य प्लॅटफॉर्म म्हणजे नेमका कोणता असा प्रश्न आता आपल्याला पडला असेल.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

योग्य प्लॅटफॉर्म म्हणजेच आपल्या उत्पादन वा सेवांचे वापरकर्ते जो प्लॅटफॉर्म सर्वाधिक वापरतात असा प्लॅटफॉर्म. उदा. आपला जर गिफ्टिंग आर्टिकल्स बनविण्याचा उद्योग आहे. तर आपण मुख्य प्लॅटफॉर्म म्हणून इन्स्टाग्राम वापरू शकता.

कारण आपण जी गिफ्टिंग आर्टिकल्स विकत आहात त्याचा तपशील फेसबुक वर वाचून कुणी ते खरेदी करेलच असे नाही, परंतु इन्स्टाग्रामवर जर आपण त्याचे आकर्षक फोटोज टाकून योग्य काळात त्यांचे प्रमोशन केलेत तर याचा नक्कीच फायदा होऊ शकेल.

२. ध्येय निश्चित करणे

बऱ्याचदा उद्योजक सोशल मीडियामार्फत प्रमोशन केले की नफा वाढतो हे ऐकून प्रमोशन सुरू करतात. त्या त्या वेळी जसे मनात येईल ते पोस्ट करतात आणि रिझल्टची अपेक्षा करतात. असे करण्याऐवजी सर्वप्रथम आपले ध्येय ठरवावे.

जसे एखाद्याला प्रत्यक्ष विक्री वाढविण्यासाठी सोशल मीडिया वापरायचे असेल तर दुसऱ्याला लोकांमध्ये आपला ब्रँड प्रसिद्ध करण्यासाठी सोशल मीडिया वापरायचे असेल. एखाद्याला आपल्या उत्पादनाच्या विक्रीतून नफा कमवायचा असेल तर दुसऱ्याला कंटेंटमधील गुगलच्या किंवा अन्य जाहिरातींमधून नफा कमवायचा असेल.

ही सर्व ध्येये गाठण्यासाठी सोशल मीडिया वापरता येऊ शकते, परंतु त्यासाठी यातील आपल्याला नेमके काय हवे आहे हे आधी ठरवणे गरजेचे आहे. त्यानंतरच्या सर्व पोस्ट्स या त्या ध्येयाला अनुसरून असायला हव्यात. रोज जर आज कोणती पोस्ट करायची हा विचार करत बसलो तर त्यात बराच वेळ फुकट जाईल.

३. पोस्ट्स शेड्युल करणे

सोशल मीडिया काही आपल्या दुकानासारखा नाही की सकाळी नऊ वाजता उघडला व संध्याकाळी सातला बंद केला. आपले ग्राहक चोवीस तासांपैकी कोणत्याही वेळी ऑनलाईन असू शकतात. याचा अर्थ असा नाही की आपण चोवीस तास ऍक्टिव्ह राहून दर थोड्या थोड्या वेळाने काही पोस्ट करावे, परंतु असेही करणे फायद्याचे नाही की आपल्याकडे उपलब्ध जो वेळ आहे त्या वेळेतच पोस्टिंग करत आहोत.

यावर तोडगा म्हणून आज बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी पोस्ट्स शेड्युल करण्याचे फिचर उपलब्ध केले आहे. याद्वारे पुढील बऱ्याच काळापर्यंत या वेळी ही पोस्ट करायची अशी कमांड आपण त्या सोशल मीडियाला आधीच देऊ शकतो. अर्थात सकाळी ऑफिसला जाण्याच्या प्रवासातसुद्धा आपण या पोस्ट्स शेड्युल करून ठेऊ शकतो.

फेसबुक-ट्विटर आपल्याला ही सुविधा मोफत देतात. इतर सोशल मीडियावरील पोस्ट्स शेड्युल करण्यासाठी आपण बफर, हॉटसूट, पोस्टक्रोनसारख्या काही खाजगी कंपन्यांची सेवा घेऊ शकतो.

४. आधीच्या पोस्ट्सचा अभ्यास करणे

नवनवीन पोस्ट्स करत राहणे उत्तम, परंतु जर आपल्या आधीच्या कोणत्या पोस्ट्स किती चालल्या आर्थत किती लोकांपर्यंत पोचल्या, त्यांवर किती रिऍक्शन्स मिळाल्या यावर जर आपण लक्ष ठेवले तर आपल्याला किती पोस्ट करायला हव्यात, कोणत्या प्रकारच्या पोस्ट्स करायला हव्यात याचा अंदाज येईल.

कोणत्या प्रकारच्या पोस्ट्स कधी करायच्या आहेत याचा आपण आराखडा तयार केला की या पोस्ट्स शेड्युल करण्यातसुद्धा फार वेळ जाणार नाही.

– शैवाली बर्वे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!