स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
Linkedin या बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने भारतातील स्टार्टअप्सचे सर्वेक्षण करून त्यातून २५ सर्वोत्तम स्टार्टअप्सची यादी घोषित केली आहे. या यादीत अनअकॅडमी, उडान, क्रेड, उपग्रॅड आणि रेझरपे या पाच कंपन्या पहिल्या पाचमध्ये आहेत. सात वर्षांहून नवीन, पन्नासहून अधिक कर्मचारी, पूर्णपणे खाजगी आणि मुख्य कार्यालय भारतात असणे या अटींवर स्टार्टअप्सची निवड केली गेली.
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाला अन्योन्यसाधारण महत्त्व आले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा करून घेऊन ‘अनअकॅडमी’ने अव्वल दर्जा मिळवला आहे. तसेच उपग्रॅड आणि लिडो या दोन ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या स्टार्टअप्सनेही यामध्ये स्थान मिळवले आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
महिलांमध्ये अतिशय प्रसिद्ध होत असलेले ‘मिशो’ हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. येथे महिलांना अनेक गोष्टी विकता आणि खरेदी करता येतात तसेच resale ही करता येतात. लॉकडाऊनमध्ये अनेक महिलांनी ‘मिशो’सोबत घरबसल्या आपला व्यवसाय सुरू केला.
महत्ताची गोष्ट म्हणजे टॉप-२५ स्टार्टअप्सपैकी १५ स्टार्टअप्सची मुख्य कार्यकाये ही बंगळुरूमध्ये आहेत. त्याखालोखाल मुंबईत चार, गुरुग्राममध्ये तीन, तर नवी दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये एका स्टार्टअपचे मुख कार्यालय आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातून मुंबईव्यतिरिक्त एकाही शहारातील स्टार्टअपला या यादीमध्ये स्थान मिळालेले नाही.
टॉप-२५ स्टार्टअप्सची यादी
१. अनअकॅडमी
२. उडान
३. क्रेड
४. उपग्रॅड
५. रेझरपे
६. मिशो
७. स्कायरूट एरोस्पेस
८. बोअट
९. अर्बन कंपनी
१०. अग्निकुल कॉसमॉस
११. शेअरचॅट
१२. प्रिस्टीन केअर
१३. डुंझो
१४. नेचरफार्म
१५. Schbang
१६. ब्लुस्मार्ट
१७. कॉग्नो एआइ
१८. नो ब्रोकर
१९. लिडो
२०. वरलूप.आयओ
२१. Groww
२२. निन्जाकार्ट
२३. ट्रेल
२४. फामपे
२५. MPL म्हणजे मोबाइल प्रीमियर लीग
स्टार्टअप्सविषयी अधिक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.