Advertisement
उद्योगसंधी

विकास वाटेवर नेणारे ‘पर्यटन’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


‘पर्यटन’ हा आज प्रत्येकाच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भागच झाला आहे. देशाच्या आर्थिक विकासात पर्यटन या क्षेत्राचा खूप मोठा वाटा असतो. पर्यटनात त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टींचा विकास एकत्रित होत असतो. देशांतर्गत पर्यटनाच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा आहे. पर्यटन म्हणताच पारंपरिक पर्यटन आपल्या डोळ्यासमोर येते.

मात्र भारताचे जे जगातील वेगळेपण आहे, त्याचा पर्यटकीयदृष्ट्या विकास केला तर देशाच्या अर्थकारणात पर्यटनाचा वाटा आणखी कैक पटींनी वाढू शकतो. अनेक देशी-विदेशी पर्यटकांसाठी केवळ थंड हवेची ठिकाणे आणि समुद्रकिनारे यांचाच जर पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करत राहिलो तर या क्षेत्राचा म्हणावा तसा विकास कधीच होणे शक्य नाही. त्यामुळे पारंपरिक पर्यटन क्षेत्रासोबत विकासवाटेने जाणार्‍या नव्या पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची आज आपल्या देशाला गरज आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

Source: hachikotourism.in

याचे ‘कृषी पर्यटन’ हे उत्तम उदाहरण आहे. आपला देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आजही शेती हाच या देशात मुख्य व्यवसाय आहे. पारंपरिक शेतीला पर्यटनाची जोड देऊन कृषी पर्यटन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल घडवून आणण्यात यशस्वी ठरू शकतो. कृषी पर्यटन ही संकल्पना मूळची परदेशी असली तरी आज आपल्याकडे ती खूप चांगल्या प्रकारे आणि वेगाने जोर धरत आहे.

भविष्यात भारत हा कृषी पर्यटनासाठीचा देश म्हणून जागतिक क्रमवारीत अव्वल ठरू शकेल. भारतात ‘धार्मिक पर्यटना’ला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. भारतातील विविध धार्मिक स्थळे आणि त्यांचे माहात्म्य, त्यांचा इतिहास आणि लोकांची श्रद्धा याचा विचार करता, प्रत्येकाला या ऐतिहासिक स्थळांची माहिती करून घेण्याची इच्छा असतेच.

नियोजन आणि अभ्यास यांची सांगड करून या पर्यटनालाही आपण चालना देऊ शकतो. अशा पद्धतीचेच आहे, ‘सामाजिक पर्यटन’. देशभरात विविध ठिकाणी विविध पद्धतींच्या सामाजिक संस्था आणि उपक्रम कार्यरत असतात. अशा संस्थांची, ठिकाणांची माहिती करून घेण्याची मनीषा प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे दडलेली असतेच.

यासारख्या संकल्पनांना मुख्य प्रवाहासोबत रुजवून पर्यटन म्हणून विकसित केले गेले तर सामाजिक बांधीलकी आणि समाजऋण याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईलच, पण एक सक्षम व्यवसायनिर्मितीही होतेच. वैद्यकीय, साहसी, दुर्ग पर्यटन, दुर्गम पर्यटन अशा नवनवीन संकल्पना ही अधोरेखित होतात. हीसुद्धा एक प्रकारे प्रगतीची नांदीच आहे.

– शैलेश राजपूत

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!