व्यवसायात यश-अपयश कशावर अवलंबून असते?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण या लेखात जाणून घेऊया शंभरातील काहीच मोजके (५ ते १० टक्के) व्यवसायच का यशस्वी ठरतात आणि जास्त (९० टक्क्यांच्या वर) अपयशी का होतात?

यश मिळवण्याची एक सर्वसाधारण मानसिकता अशी असते की, आपल्याला यशस्वी लोकांची पुस्तके वाचायला आवडतात किंवा भाषणे ऐकायला आवडतात; पण क्वचितच आपल्या लक्षात येते की, माणसे अपयशी का होतात ह्याचाही विचार व्हायला पाहिजे. कारण अपयशी कसे व्हायचे नाही हे शिकणेसुद्धा एक यशाकडे जाणारे धोरण असू शकते.

आदिमानव काळातील संघटन

आदिमानव काळामध्ये जगण्यासाठी माणूस शिकार करत होता. कालांतराने त्याच्या लक्षात आले की एकट्याने शिकार करणे कठीण जाते. म्हणून दोघे एकत्र आले आणि शिकार करू लागले. दोघांनाही शिकार कठीण जायला लागली, तसे त्यांनी समूह बनवला आणि समूहात शिकार करू लागले.

समूह बनल्यानंतर समूहामध्ये वादविवाद सुरू झाले. मग त्यांनी समूहामध्ये नेता निवडला. नेत्याने समूहामध्ये गट/विभाग  बनवले. प्रत्येक विभागाला/गटाला त्याच्या कुवतीप्रमाणे शिकारीचे व इतर काम वाटण्यात आले.

एकविसाव्या शतकातील एकांडा उद्योजक (सूक्ष्म, लघू, मध्यम)

ह्या गोष्टीतून काय बोध होतो? आजचा उद्योजक अजूनही एकटाच शिकार करू इच्छितो. सकाळी कार्यालयाचा दरवाजा उघडणे, ते बंद करण्याचे काम एकांड्या शिलेदारासारखे करत असतो.

थोडक्यात उदाहरणच घ्यायचे झाले तर वडापाव विक्रेत्याचे घेऊ. वडापाववाल्यासारखे सकाळी बाजारात जाऊन बटाटे आणणे, ते उकडणे, वडे तळणे, वडापाव विकणे, पैसे घेणे, नंतर भांडी घासणे. प्रश्न असा पडतो, मग ह्याला उद्योजक म्हणायचे की स्वत:च्या उद्योगामध्ये काम करणारा कर्मचारी?

अपयशाची वजाबाकी

१. वेगवेगळ्या कारणांसाठी ह्या उद्योजकाला एकटे काम करणे क्रमप्राप्त होते. शिवाय त्याला खालील वेगवेगळ्या समस्या आणि आव्हानांचा सामना करावा लागतो.

२. उद्योग म्हणजे काय, मी नेमका कुठला उद्योग सुरू करायचा, तो कसा करायचा, त्याचा विस्तार कसा करायचा हे शिकवणारी प्रणाली कुठेच उपलब्ध नाही.

३. बरेच उद्योजक वस्तू /सेवेसाठी परावलंबी असतात. वस्तू /सेवेची गुणवत्ता कशी वाढवायची हे त्याला माहीत नसते?

४. उद्योगवाढीसाठी लागणारे भांडवल कसे मिळवायचे हे त्याला माहीत नसते. भांडवल मिळवण्यासाठी जमाखर्चाचा ताळेबंद नियमितपणे ठेवला जात नाही. तो ठेवून भांडवल जरी मिळाले, तरी त्याचे योग्य नियोजन कसे करायचे हे त्याला माहिती नसते.

५. एकट्याने उद्योग जमत नाही म्हणून भागीदारीमध्ये उद्योग सुरू केला जातो, परंतु भागीदारीत चालणार्‍या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी तुटण्याची संख्या जास्त असते. कारण एकमेकांची ताकद आणि कमजोरी समजून घेऊन भागीदार निवडला जात नाही. एकदा भागीदारी तुटली की परत भागीदार निवडायची भीती वाटते, माणसांवरचा विश्वास उडतो.

६. आपली शिक्षणप्रणाली उद्योजकीय कामासाठी लागणारे कुशल कर्मचारी वर्ग तयार करत नाही. जो अकुशल कर्मचारी वर्ग आहे, तो ठरावीक काळात नोकरी सोडत असतो. उपलब्ध कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण द्यायची भीती वाटते, कारण हे प्रशिक्षण घेऊन हा कर्मचारी स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. उद्योजकाच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, अकुशल कर्मचारी वर्ग नेमला तर त्याचा व्यवसायावर काय परिणाम होईल?

७. ग्राहक कोण आहे, तो कुठे आहे, ग्राहकाची वस्तू/सेवा विकत घ्यायची मानसिकता काय आहे, ह्याचा कधीच विचार केला जात नाही.

८. मार्केटिंगची धोरणे काय असतात, त्यासाठी कुठल्या प्रकारची साधने वापरायची असतात, त्यातील मजकुराची मानसिकता काय असते, हे उद्योजकाला माहीत नसते. हे सांगणारा व्यावसायिक सल्लागार बाजारात उपलब्ध नाही. उदा. वेबसाइट तांत्रिकरीत्या उत्तम प्रकारे बनवली जाते, परंतु ती बनवताना माझ्या वस्तू / सेवेप्रमाणे वेबसाइटचे उद्दिष्ट काय असले पाहिजे ह्याचा विचार होत नाही.

९. विक्रीची धोरणे काय असतात, त्यासाठी कुठल्या प्रकारची साधने वापरायची असतात, हे उद्योजकाला माहीत नसते. वस्तू / सेवेप्रमाणे विक्री कौशल्य कसे विकसित करायचे हे सांगणारा व्यावसायिक सल्लागार बाजारात उपलब्ध नाही.

वरील बाबी जर पुस्तके वाचून शिकायच्या असतील, तर कुठली पुस्तके वाचायची, पुस्तके नेमकी कशी वाचायची हे माहीत नसते? बरेच उद्योजक प्रेरणादायी पुस्तके वाचण्यावर भर देतात, ज्यातून कधीच वरील प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणादायी कार्यशाळांना उपस्थित राहतात, परंतु यातूनही हवे त्या प्रकारे उत्तरे मिळत नाहीत.

यशाचा गुणाकार

1970 नंतर जगात अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. ते यशस्वी का होत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे मेंदूमध्ये दडलेली आहेत. मेंदूचे चार लोब आहेत. प्रत्येक लोबचा संबंध एका बुद्धिमत्तेशी असतो. इथे बुद्धिमत्तेचा अर्थ असा आहे की, एखादी गोष्ट जगण्यासाठी (करीअरच्या संदर्भात) तुम्ही सहजपणे करू शकता. आपण चार प्रकारच्या बुद्धिमत्ता पाहिल्या आहेत.

वस्तू / सेवानिर्मितीमध्ये कल्पकता दाखवणे. 2. अशा वस्तू / सेवेचा व्यापार करणे 3. लोकांमध्ये सहजपणे मिसळणे. 4. उद्योगासाठी लागणारी प्रणाली निर्माण करणे. आपण जर सर्व मल्टिनॅशनल कंपन्यांचा विचार केला, तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल, या सर्व कंपन्यांमध्ये वरील बुद्धिमत्ता असलेल्या कर्मचारी वर्गाची भरती केली जाते, ही गोष्ट आपल्याला कधीच कळत नाही.

ह्या चार बुद्धिमत्तेप्रमाणे कर्मचारी वर्ग निवडला जातो. कर्मचारी निवडीसाठी एका विशिष्ट प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचणीचा वापर केला जातो. उदाहरणादाखल Apple, Google, Mercedes, Samsung, Disney किंवा Fortune 500 कंपनी वगैरे कंपन्यांचा जर विचार केला, तर वरील गोष्ट दिसून येईल.

पहिली बुद्धिमत्ता –  प्रथम म्हणजे वस्तू /सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी येथे कुशल कर्मचारी वर्ग नेमलेला असतो, जो सतत वस्तू / सेवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधन करत असतो, ग्राहकांशी संवाद साधत असतो.

दुसरी बुद्धिमत्ता – ह्या वस्तू / सेवा विकण्यासाठी कुशल मार्केटिंग टीम तयार असते अथवा कुशल व्यावसायिक मार्केटिंग तज्ज्ञाकडून धोरणे/ किंवा साधने तयार केली जातात. एक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर नेमला जातो.

तिसरी बुद्धिमत्ता – कंपनीमध्ये वेगवेगळ्या विभागांचा  कर्मचारी वर्ग हाताळण्यासाठी एक उत्कृष्ट नेता निवडला जातो. हा नेता सर्व कर्मचार्‍यांना कौशल्य देणे, संघटित ठेवणे, त्यांना प्रेरणा देणे वगैरे काम करत असतो.

चौथी  बुद्धिमत्ता –  कंपनीमधील जी इतर खाती आहेत, ती एका सूत्रबद्ध प्रणालीमध्ये बांधली जातात. जी कंपनीविस्ताराच्या वेळेला कामाला येतात.

(ह्याशिवाय अजूनही चार बुद्धिमत्ता आहेत, जी कंपनीच्या इतर खात्यातील कामासाठी उपयोगी पडतात.)

सूक्ष्म, लघू मध्यम उद्योजकांसाठी संधी

आज आपण जर मार्केटमध्ये पाहिले तर वरील चारही (आणि इतर चार) प्रकारचे व्यवसाय करणारे उद्योजक दिसून येतात; परंतु प्रत्येक जण एकएकटाच उद्योगासाठी लागणारी सर्व प्रकारची कामे करत आहे. जर माझ्या उद्योगासाठी वरील प्रकारचा कुठला कर्मचारी / भागीदार लागणार हे जर ओळखता आले आणि मिळवता आले. आणि त्याप्रमाणे उद्योग उभा राहिला तर काय होऊ शकते?

पुढील प्रश्नांच्या आधारे आपण हे शोधू शकता?

  • माझा उद्योग टिकून राहू शकतो का?
  • माझा उद्योगविस्तार होऊ शकतो का?
  • माझा कर्मचारी टिकून राहू शकतो का?
  • माझा ग्राहक समाधानी राहू शकतो का?
  • माझ्या उद्योगामधून नफा मिळू शकतो का?

– नितीन साळकर
(लेखक उद्योजकीय मानस क्षेत्रात काम करतात.)
9321897941

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?