प्रगतिशील उद्योग

भांडवल व भांडवलाचे प्रकार

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की पहिला प्रश्न उपस्थित होतो तो भांडवलाचा. किती भांडवल लागेल? कोण गुंतवणूक करील भांडवलाची? इ. एका अर्थाने भांडवल हा उद्योगाचा आत्मा असतो. भांडवलाविना कोणताही उद्योग चालू शकत नाही. व्यवसायाच्या प्रकारानुसार भांडवल कमी-अधिक असू शकेल, तो कोणत्याही उद्योगाचा अनिवार्य भाग आहे.

भांडवलाची योग्य तरतूद केल्यावरच व्यवसाय योग्य पद्धतीत चालू शकतो व प्रगती करू शकतो. पुरेसे भांडवल, कठोर मेहनत, कल्पक बुद्धिमत्ता आणि प्रामाणिक उद्देश यांच्या जोरावरच छोटेखानी उद्योगाचे मोठ्या एन्टरप्राइजमध्ये, बिझनेस हाऊसमध्ये रूपांतर होऊ शकते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

साधारणपणे आवश्यकतेनुसार भांडवलाचे चार प्रकार पडतात : १) सुरुवातीचे भांडवल (Promotional Capital) २) स्थावर भांडवल (Fixed Capital) ३) चालू भांडवल (Working Capital) ४) विकासासाठीचे भांडवल (Development Capital)

प्रारंभी भांडवल (Promotional Capital) : उद्योग सुरू करताना याची आवश्यकता भासते. कार्यक्षेत्राचे अध्ययन, बाजारपेठा व अन्य गोष्टींचा अभ्यास, प्रोजेक्ट प्लानींग, प्रचार साहित्याची निर्मीती, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन व आर्टिकल ऑफ असोसिएशन, बिझनेस प्लान इ. गोष्टी तयार करणे य सगळ्याचा खर्च यामध्ये अंतर्भूत आहे.

उद्योजकाला आपली बचत व अन्य वैयक्तिक मार्गाने या भांडवलाची तरतूद करावी लागते. तुलनेने ही भांडवल फार मोठी नसते आणि सुरुवातीपासूनच काटकसरीचे धोरण याला सहाय्यभूत होते.

स्थावर भांडवल (Fixed Capital) : आपल्या व्यवसायासाठी लागणा‍र्‍या स्थावर गोष्टी जसे, मशिनरी, प्रोडक्शनची जागा, कंपनीचे कार्यालय, फर्निचर इ. गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते व ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केलेली असते.

याच गुंतवणुकीला स्थावर भांडवली गुंतवणूक म्हणतात. भागभांडवलाच्या रूपाने मोठ्या प्रमाणात स्थावर भांडवलाची तरतूद केली जाऊ शकते. तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट व बिझनेस प्लाननुसार बॅंका, फायनान्स कंपन्या तसेच वैयक्तिक फायनान्सर्सलासुद्धा भांडवली गुंतवणुकीसाठी अर्ज करता येऊ शकतो.

चालू भांडवल (Working Capital) : नियमित होणार्‍या खर्चांची तरतूद ही चालू भांडवलीतून केली जाते. जसे, कर्मचार्‍यांचे पगार, कच्च्या मालाची खरेदी, विज बिल अथवा अन्य नियमितपणे होणारे मासिक खर्च यामध्ये मोडतात. ही भांडवली तरतूद ही तत्कालीन असते व विक्रीच्या पैशांतून तिची भरपाई केली जाते. कंपनी डिपॉजीट्स, छोटी कर्ज, ओव्हरड्राफ्टसारख्या सुविधांद्वारे या भांडवलाची तरतूद केली जाऊ शकते.

विकासासाठी भांडवल (Development Capital) : एखाद्या उद्योग मोठा व्हायचा असेल, तर त्याने सुरुवातीपासूनच आपल्या वाढीच्या म्हणजेच विकासाच्या दृष्टीने तरतूद करणे गरजेचे आहे. आगामी काळात खरेदी करावी लागणारी मशिनरी, जागा इत्यादीसाठीची तरतूद सुरुवातीपासूनच व्हायला हवी.

नियमितपणे नफ्यातील एक हिस्सा हा ही तरतूद म्हणून सुरुवातीपासूनच बाजूला काढून ठेवायला हवा. शिवाय विकासासाठी नव्याने शेअर्सही काढले जाऊ शकतात. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन सरकारी प्राधिकरणांनासुद्धा यासाठी अर्ज केला जाऊ शकतो.

– शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!