‘फ्लिपकार्ट’मधून बाहेर पडून तीन तरुणांनी उभे केले १ बिलियनचे स्टार्टअप


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


सुजित कुमार, वैभव गुप्ता व अमोद मालवीय या तीन तरुणांनी फ्लिपकार्टमधून बाहेर पडून सुरू केलेल्या ‘उडान’ या बिझनेस-टू-बिझनेस मार्केटप्लेस असलेल्या स्टार्टअपला ‘डीएसटी ग्लोबल’ आणि ‘लाईटस्पीड व्हेंचर पार्टनर्स’ या कंपन्यांकडून २२५ मिलियन अमेरिकी डॉलरचे फंडिंग मिळाले आहे. या फंडिंगमुळे फक्त २६ महिन्यात ‘उडान’चे बाजारमूल्य हे १ बिलीयन झाले आहे.

या आधी तयार अन्न घरपोच देणारे ‘स्विगी’, मोबाईल मेसेजिंग app ‘हाईक’ आणि ऑनलाईन जाहिरात प्लॅटफॉर्म ‘इनमोबी’ या स्टार्टअप्सना १ बिलियन बाजारमूल्य करण्यासाठी ४ वर्षांचा तर पेटीएमने सुरू केलेल्या ‘पेटीएम मॉल’ या स्टार्टअपचा चौदा महिने लागले होते.

ऍमेझॉन बिझनेस, अलिबाबा आणि वॉलमार्ट प्रमाणे उडान हेही उत्पादक आणि विक्रेते यांना जोडते. ‘उडान’ने ‘हाइव्हलूप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने जून २०१६ मध्ये कंपनी नोंदवली होती व नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांचे प्रॉडक्ट प्रायोगिक तत्त्वावर बाजारात आले. जून २०१७ पासून ते पूर्णपणे बाजारात उतरले आहेत.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?