उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवताना…


'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe


स्टार्टअप उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी सर्वप्रथम स्वत:ला जाणून घ्यावे. आपल्या अंगात कुठले कौशल्य आहे, भांडवल किती आहे, कर्ज किती मिळू शकेल, उद्योगाला मोक्याची जागा आहे का, तयार केलेल्या उत्पादनाला बाजारात किती प्रतिसाद मिळेल, कच्च्या मालाचा पुरवठा योग्यरित्या होईल का, तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच मार्केटिंगचे तंत्रही आत्मसात करायला लागेल याचाही विचार करावा.

एकदा या क्षेत्रात यायचे निश्चित झाले की सर्वप्रथम नकारात्मक भूमिकेला लाथ मारावी. सकारात्मक विचाराची कास धरून पुढे जावे. त्यानंतर आपले ध्येय निश्चित करावे. ध्येय निश्चित झाल्यावर ते गाठण्यासाठी प्रयत्नांची जोड द्यावी. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावरच उद्योजकतेत यशस्वी होता येते.

नोकरीसारखे केवळ पाट्या टाकून चालत नाही. सतत काहीतरी करण्याचा, नाविन्याचा ध्यास घ्यावा लागतो. मेहनतीची तयारी ठेवावी लागते. कितीही संकटे आली तरी खच्ची न होता आल्या संकटाचा सामना करावा. तसेच मन कायम प्रसन्न ठेवावे. केवळ कामगारांशीच नव्हे तर कच्चा माल पुरवणारे पुरवठादार, व्यापारी, वितरक यांच्याशीही सलोख्याचे संबंध ठेवावेत.

उद्योगात वेळ पाळणे महत्त्वाचे ठरते.Always on time त्यामुळे वेळेचे काम वेळेवर करावे लागते. तरच विश्वासार्हता टिकते व उद्योग वाढीस त्याचा उपयोग होतो. बाजारात चांगले नाव कमविण्यासाठी तुम्ही वेळ पाळणे महत्त्वाचे ठरते.

उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवताना अपयश आले म्हणून खचून जाऊ नये. उद्योगाच्या क्षेत्रात आज जी मोठी नावे दिसत आहेत, त्यांनाही अपयश आले होते; परंतु ते खचले नाहीत. त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले, म्हणून ते आज उद्योजकतेच्या क्षेत्रात उंची गाठू शकले. हे कायम ध्यानात ठेवून वागावे.

उद्योजकतेच्या क्षेत्रात सतत बदल होत असतात. समाजाची आवडनिवड सतत बदलत असते. त्याचा विचार करून आपल्या उत्पादनात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करीत रहावा तसेच आपण निर्माण केलेल्या वस्तूचे, उत्पादनाचे मार्केटिंग करायला शिकले पाहिजे.

ज्याचे मार्केटिंग अधिक चांगले त्याचा माल अधिक खपतो, हे लक्षात ठेवून कृती करायला हवी. उत्पादनातील सातत्य, नावीन्यता, ग्राहकांच्या गरजा, कामगारांना प्रोत्साहन, प्रशिक्षण या बाबींवरही लक्ष देणे आवश्यक ठरते.

उद्योजकता म्हणजे केवळ वस्तू निर्माण करणे असे नव्हे, तर सेवा उद्योग हेदेखील उद्योजकतेचे एक प्रमुख वेगळे अंग आहे. New Product e1621590439624जागतिकीकरणाच्या लाटेने सेवा उद्योगाला फारच चांगले दिवस आले आहेत. या क्षेत्रात प्रचंड अशी संधी निर्माण झाली आहे.

लोकांच्या गरजा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ही संधी समजून सेवा उद्योगात पाऊल टाकणे गरजेजे बनले आहे. सेवा उद्योगाचे क्षेत्र ‘स्काय इज द लिमिट’ असेच आहे. या क्षेत्रात हजारो संधी आहेत. सतत विस्तारणारे असे हे क्षेत्र आहे. त्यामुळे याचा लाभ उठवण्यासाठी तरूण-तरूणांनी पुढे यायला हवे.

व्यवसायात होणारे काळानुरूप बदल स्विकारण्यासाठी तुमच्याकडे लवचीकता हवी. त्याचबरोबर कल्पनाशक्तीही हवी. भांडवल, यंत्रसामग्री, मोक्याची जागा, कुशल कामगारवर्ग, नियोजन, मार्केटिंग याबरोबरच प्रसन्न व्यक्तिमत्त्व, जोखीम स्विकारण्याची प्रवृत्ती, सकारात्मक विचार, पारदर्शक व्यवहार या गोष्टीही उद्योजकतेच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ठरतात.

Author

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top