स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
या आठवड्याच्या शेवटी १६ व १७ नोव्हेंबर रोजी ठाण्यात टीप टॉप प्लाझा येथे उद्योग जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग प्रशिक्षक अतुल राजोळी यांच्या ‘लक्ष्यवेध’ या संस्थेतर्फे हे आयोजित करण्यात आले आहे.
‘उद्योग जत्रे’मध्ये विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, मोठ्या कंपन्यांचे अधिकारी, बँक तसेच वित्त क्षेत्रातले अधिकारी, उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ, स्टार्टअप्स, मेंटर्स सहभागी होणार आहेत. विविध संस्था-संघटनांनीही ‘उद्योग जत्रे’च्या आयोजनात सहभाग घेतलेला असून ‘स्मार्ट उद्योजक’ याचे मॅगझीन पार्टनर असणार आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
‘उद्योग जत्रा’ची वैशिष्ट्ये
- ‘उद्योग जत्रे’त शंभरहून अधिक व्यवसायांचे व त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन होणार आहे.
- उद्योजक आणि बँका यांच्यात वित्तसहाय्याविषयी थेट मार्गदर्शन होणार आहे.
- उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी व तज्ज्ञाशी उद्योजक थेट संवाद साधू शकतात.
- या ‘उद्योग जत्रे’मध्ये उद्योजक आपल्या उत्पादनांचे मान्यवरांच्या हस्ते थेट अनावरण करू शकतात.
‘उद्योग जत्रे’त प्रवेश मोफत आहे. अधिक माहितीसाठी ९९६९२०४५८५ वर संपर्क साधू शकता किंवा lakshyavedh.com/udyogjatra ला भेट देऊ शकता.
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.