विक्री वाढवण्याचा चातुर्मास

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा हा संपूर्ण चातुर्मास अवघा महाराष्ट्र विविध सणांनी, उत्सवांनी साजरा करतो. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि सणांचा राजा म्हणजे दिवाळी हीसुद्धा याच काळात येते.

अन्य समुदायांचे प्रमुख सण म्हणजे मुस्लिमांची रमजान ईद, ख्रिस्ती लोकांचा नाताळ, व्यापारी वर्गाचे नववर्ष हेसुद्धा याच चार महिन्यांच्या आसपास येते. म्हणजेच देशभरात एकूणच हा सण-उत्सव-सोहळ्याचा काळ.

Bhartiya San Utsavमहाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतकरी समाज आणि शहरी भागात नोकरदार वर्ग राहतो. या सणांच्या चातुर्मासात आपण बर्‍याच मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. सण साजरा करायचा म्हटले की खरेदी म्हणजेच खर्च हा आलाच. म्हणजेच सणांच्या या चातुर्मासात आपण उत्तम ग्राहकवर्ग आहोत.

मराठी समाजाचे आर्थिक चित्र पालटायचे असेल तर ते बदलणे आवश्यक आहे. अन्य समुदायातील उद्योजकांप्रमाणे आपणही या काळात अधिकाधिक वेळ आपल्या धंद्याला देऊन अधिकाधिक उत्पादन आणि अधिकाधिक विक्री केली पाहिजे.

किती काळ आपण फक्त सणवार साजरे करण्यात मश्गूल राहणार आणि दुसर्‍यांचे ग्राहक होत राहणार? आता आपणही आक्रमक विक्रीवर भर दिला पाहिजे. मोठमोठ्याने ओरडून आपला माल विकला पाहिजे. फक्त मराठी समुदायापुरताच नाही तर जगभरात माल खपवला पाहिजे.

बर्‍याच अंशी मराठी उद्योजकांची ही पहिली पिढी धंद्यात आली आहे. आपण कोणत्याही मोठ्या उद्योगकुटुंबाचं उदाहरण घेतलंत तर लक्षात येईल की, पहिल्या पिढीला अपार मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही; मग ते टाटा असोत की धीरुभाई.

त्यामुळे तरुण मराठी उद्योजकाने आता निश्‍चय केला पाहिजे की, काहीही झालं तरी मी या सणांच्या काळात माझी विक्री किमान दुप्पट करेन आणि हा निश्‍चय पूर्ण करण्यासाठी स्वाभाविकच तेवढी मेहनत ही अपरिहार्य आहे.

Table of Contents

Author

  • शैलेश राजपूत

    हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.
    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts
Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top