डोंबिवलीमध्ये २१ एप्रिल रोजी उद्योजक मेळावा

‘डोंबिवली ब्राह्मण उद्योजक’ व पुण्यातील ‘दे आसरा’ या दोन संस्थांनी एकत्र येत शुक्रवार, २१ एप्रिल रोजी डोंबिवली (जिल्हा : ठाणे) येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्यामध्ये भारत सरकारतर्फे लघु व मध्यम उद्योजक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दे आसरा संस्थेचे प्रकाश आगाशे हे उपस्थितांना ही माहिती देतील. त्याचसोबत डीएनएस बँकेच्याही विविध व्यावसायिक कर्ज योजनांविषयी माहिती करून देण्यात येणार आहे.

फक्त १५ सेकंदात अनोळखी व्यक्तीला आपला व्यवसाय कसा सांगावा यावर राहुल लिमये हे उद्योजकांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर उपस्थित उद्योजकांमध्ये बिझनेस नेटवर्किंग होईल.

हा उद्योजक मेळावा माधवाश्रम सभागृह, रोटरी शाळेजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे घेण्यात येणार आहे. तसेच मेळाव्याचे ₹१०० सहभाग शुल्क आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी केदार पाध्ये यांना 9769121077 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?