Advertisement
उद्योग कथा

निवासी रहिवाशी संस्था आणि रहिवाशांसाठी वरदाई – अप होप पिपल सोल्युशन्स सेवा

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात होणार्‍या शहरीकरण व त्या अनुषंगाने शहरातील जागेच्या अडचणींमुळे गृहनिर्माण संस्था याच निवासाचे मुख्य स्थान बनल्या आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे साधारण ४०% लोकसंख्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास आहे. संस्था एका इमारतीची असो वा मोठा गृहनिर्माण प्रकल्प असो त्यातील प्रश्नी व समस्या या समानच असतात. शहरीकरणाच्या रेट्यामुळे महिलावर्गही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी व्यवसाय यांमध्ये अग्रेसर असल्यामुळे निवासी रहिवाशी संस्थेतील प्रश्न् व समस्या यांमुळे महिलांनाच सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या निवासी संस्तेतील समस्या हा सर्व महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या समस्यांचा अभ्यास व त्यावरील उपाय म्हणून ठाण्यातील दोन उच्चविद्याविभूषित महिला व मॅनेजमेंटच्या पदविकाधारक भाग्यश्री महाडिक व मनिषा पवार यांनी ’अप होप पिपल सोल्युशन्स’ प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली.

आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम केल्याचा अनुभव पणाला लावून निवासी रहिवाशी संस्थेतील रहिवाशांचे वास्तव्य निश्चिंत व्हावे या उद्देशाने या कंपनीतर्फे विविध बहुमोल सेवा पुरवल्या जातात. सध्या ठाणे परिसरातील अनेक सहकारी संकुलांत प्रायोगिक तत्त्वावर या कंपनीच्या सेवा पुरवल्या जातात. भविष्यात राज्यभर फ्रँचाईझीज देऊन मोठी झेप घेण्यासाठी या दोघी सुसज्ज झाल्या आहेत.

अशा तर्‍हेची सेवा पुरवणारी ही देशातील एकमेव कंपनी असावी. मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सकडे हिची नोंदणी करताना मंत्रालयाने अनेक विचारणा-शंका-कुशंका काढल्या. या सर्वांवर समाधानकारक रितीने मात करून कंपनीची नोंदणी केली गेली. महिला उद्योजिकांनी उद्योगात पुढाकार घ्यावा असे माननीय पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन या दोन उद्योजिकानी ही कंपनी स्टार्टअप अंतर्गत नोंदणीचा ध्यास घेतला आहे. या कंपनीला बायर इंडीयाचे निवृत्त चीफ अॅयडमिन अधिकारी राजेंद्र घाटे हे मदत करतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षेचे व संरक्षणाचे अनेक उपाय या कंपनीच्या कार्यप्रणालीत समाविष्ट केलेले आहेत. ज्योत्स्ना भोरकर आणि निवृत्त एसबीआय कर्मचारी ज्योती शहाणेही संचालकांना स्वयंस्फूर्तीने मदत करतात.

निवासी रहिवाशी संस्थेत सहकार्याचा अभाव असे गंमतीने म्हटले जाते. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे रहिवाशांमध्ये परस्पर संवाद-घनिष्ठता नाममात्र असते. त्यामुळेच बर्या च वेळा संघर्षाचे प्रसंग उद्भवतात. कोणत्याही को-ऑपरेटिव्ह सोसायटीत उद्वाहन पॅसेज लाईटस्, सुरक्षारक्षक, सोलार, पार्कींग, इत्यादी सामायिक सुविधा असतात. त्या सर्वांच्या नियोजनाचा जटील आणि क्लिलष्ट असा फार मोठा प्रश्नह असतो. मासिक देखभाल शुल्काची देयके वाटणे, त्यांची वसुली, ती मिळणे किंवा न मिळणे यांवरून वाद होतात. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, अपरिचित तसेच आगंतुकांकडून त्यांना संभवणारा धोका, पाण्याचे योग्य नियोजन, सीसीटीव्ही, इंटरकॉम, सोलार या सर्व प्रणालींचे व्यवस्थापन अप होप सोल्युशन्सतर्फे पुरवले जाते.

अप होप सोल्युशन्सतर्फे डिजिटलायझेशनचा आधार घेऊन तंत्रज्ञानावर आधारित सभासद रहिवाशांसाठी एक मोबाईल अॅप विकसित केले आहे. ते सर्व सभासद रहिवाशांच्या मोबाईलवर डाऊनलोड करता येते. सभासदांना मासिक देखभाल देयके व ती अदा करण्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन ही एक गहन समस्या होत असून यांवर प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्यात येतात. अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजना, उद्वाहनासंबंधी सुरक्षेच्या उपाययोजना अर्थात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे अनेक उपाय यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा कंपनीने अवलंब केल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने १००% खात्रीशीर व लाभदायक सुविधांचा सभासदांना नक्कीाच फायदा होईल असे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याची दिवसेंदिवस गंभीर होत जाणारी समस्या यांवर मात करण्यासाठी गाड्या धुण्यासाठी तसेच संस्थेच्या बगिच्यासाठी पाण्याचे नियोजन, रिसायकलिंग यांकडे कंपनी विशेष लक्ष देते. संस्थेचे पंजीकरण तसेच जमीन हस्तांतरण या सोयीसुविधा कंपनीतर्फे पुरवण्यात येतात. यांवर विकासक असहकार्य अंतर्गतसुद्धा योग्य प्रकारे तोडगा पुरवण्यात येतो.

अप होप पिपल सोल्युशन्सतर्फे अशा तर्‍हेच्या इतर असंख्य अत्यंत उपयुक्तत सुविधा एकाच छताखाली पुरवल्या जातात. नवीन शतकाला गवसणी घालताना अद्ययावत सोयीसुविधांनी युक्तं अशा निवासी रहिवाशी संस्था व रहिवाशांच्या सर्व उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही कंपनी तत्पर आहे. आपल्या सीआरएस फंडाद्वारे दीनदुबळ्या, गरजू समाजघटकांसाठी काम करण्याचाही त्यांचा मानस आहे.

सध्या ठाण्यातील हिरानंदानी, पवारनगर, सिद्धाचल, ब्रह्मांड, मुलुंड येथे या कंपनीची सेवा प्रायोगिक तत्त्वावर पुरवली जात आहे. राज्यभरात आपली फ्रँचाईझी देण्यास या दोन्ही धडाडीच्या महिला उद्योजिका उत्सुक आहेत.

संपर्क : अप होप पिपल सोल्यशन्स प्रा. लि.
9821399761, 8928154706, 9820083748
Email: solutions@uphopeople.com

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: