Advertisement
उद्योगवार्ता

UPI व्यवहारांनी गाठला ३०० मिलियनचा पल्ला

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page
नोटबंदीनंतरच एकूणच वाढलेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी ऑगस्ट महिन्यात ३०० मिलियनचा पल्ला पार केला आहे. भारत सरकारच्या National Payment Corporation of India (NPCI) ने प्रसिद्ध केलेल्या माहितीत हे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात UPI द्वारे ३१२.०२ मिलियन व्यवहार झाले. जुलै महिन्यातील २७३.७५ मिलियन व्यवहारांच्या तुलनेत ही १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्व प्रमुख सरकारी तसेच खाजगी बँका, payment बँका तसेच निवडक सहकारी व ग्रामीण बँका UPI मध्ये नोंदणीकृत आहेत. UPI द्वारे केवळ एका VPA द्वारे एका क्षणात व्यवहार करता येतो. शिवाय सरकार UPI व्यवहारांना चालना देण्यासाठी आकर्षक कॅशबॅकही देत आहे.

तुमच्या बँकेचे UPI app किंवा सरकारी भीम app किंवा फोनपे, गुगल पे (या आधीचे नाव तेझ) इत्यादींमध्ये तुमचा इंटरनेट बँकिंगला नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर नोंदवून तुमची बँक निवडून तुम्ही तुमचे VPA म्हणजे तुमचे नाव किंवा नंबर आणि पुढे @upi किंवा @sbi असे तयार करा. हा व्यवहार अतिशय सोपा, जलद व सुरक्षित आहे.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: