डिजिटल मार्केटिंगचा लाभ घेऊन आपला व्यवसाय जागतिक पातळीवर न्या!

झिऑन मार्केट रीसर्च कंपनीची वाटचाल हेच एखादी कंपनी डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून कशी व किती प्रगती करू शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. झिऑन मार्केट रीसर्चचे अंदाजे तीन हजार ग्राहक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे शंभर टक्के ग्राहक परदेशातील आहेत.

एके काळी एक व्यावसायिक किंवा दुकानदार सकाळी आपल्या दुकानात, पेढीवर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बसत असे. दिवसभरात त्याच्या भौगोलिक परिसरातले व परिचित ग्राहक त्याच्या दुकानात येत व खरेदी करीत. त्या काळात कोणाचाही व्यापार हा त्याच्या मर्यादित व परिचित वर्तुळापुरताच सीमित असे. सध्याच्या काळात मात्र व्यवसायाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. व्यवसायाच्या भौगोलिक मर्यादा गळून पडल्या आहेत.

इंटरनेट व वेबसाइटद्वारे आपण जगभरातील आणि सर्वस्वी अपरिचित ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने नेऊ शकतो, सेवा पुरवू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून आपण आता जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यात आपल्या मालाची विक्री करू शकतो. यालाच डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात. व्यवस्थितरीत्या डिजिटल मार्केटिंग केले तर कोणताही व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता येतो.

नितीन सिरसाट

हे फक्‍त स्वप्नरंजन नव्हे! पुण्याच्या ‘झिऑन मार्केट रीसर्च’चे नितीन सिरसाट व त्यांचे सहकारी यांनी हे प्रत्यक्षात साध्य करून दाखविले आहे. तोच त्यांचा व्यवसाय आहे.

झिऑन मार्केट रीसर्चचे एक संचालक नितीन रामराव सिरसाट यांचा जन्म अमरावतीत झाला. लहानपणी त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय सामान्य होती. त्यांना कॉम्प्युटर लहानपणापासून आवड होती. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी मास्टर्स इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन हा कोर्स केला. नंतर डिजिटल मार्केटिंगसंबंधी सेवा पुरवणार्‍या कंपन्यांत त्यांनी काही काळ नोकरी केली. वैयक्‍तिक पातळीवर म्हणजे पगारवाढीच्या दृष्टीने त्यांची उत्तम प्रगती होत होती; पण त्यात ते संतुष्ट नव्हते.

त्यांच्या शेवटच्या नोकरीत, कंपनीसाठी ग्राहक शोधण्यापासून ते त्यांच्या गरजा जाणून सर्व सेवा पुरवण्यापर्यंत सर्व फंक्शन्सची माहिती त्यांना होती. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, हेच काम नोकरी म्हणून करण्यापेक्षा आपण स्वतंत्र व्यावसायिक म्हणून का करू नये? त्यांनी काही समविचारी मित्रांशी चर्चा केली. नंतर 2014 मध्ये दीपक रुपनर, नीलेश किंदरले, संदीप घटे आणि सानू थॉमस या मित्रांबरोबर त्यांनी झिऑन मार्केट रीसर्चची स्थापना केली.

त्यांची कंपनी एखादे प्रॉडक्ट इंटरनॅशनल पातळीवर मार्केट करायचे असेल तर त्यासाठी लागणार्‍या सर्व सेवा पुरवतात. तसेच स्पर्धक कंपन्यांची- त्यांच्या उत्पादनांची माहिती पुरवतात. ते मार्केटचा अभ्यास करून एखाद्या उत्पादनाला भविष्यात किती मागणी येऊ शकते यासंबंधीचा अहवाल देतात.

झिऑन मार्केट रीसर्च कंपनीची वाटचाल हेच एखादी कंपनी डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून कशी व किती प्रगती करू शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. झिऑन मार्केट रीसर्चचे अंदाजे तीन हजार ग्राहक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे शंभर टक्के ग्राहक परदेशातील आहेत. ते सर्व झिऑनला वेबसाइट मार्केटिंगद्वारेच मिळालेले आहेत.

अगदी गूगल, अ‍ॅपल, शेल, सॅमसंग इत्यादी त्यांचे ग्राहक आहेत. सॉफ्टवेअर इं़डस्ट्रीज, हेल्थ केअर, फार्मा, फूड ऑण्ड ब्रुवरीज, केमिकल्स, बायोटेक्नॉलॉजी इत्यादी विविध क्षेत्रांतील क्लायंट्सना ते डिजिटल मार्केट रीसर्चसंबंधी सेवा पुरवतात.

पुणे, पिंपळेगुरव येथे त्यांचे वीस हजार स्क्‍वेअर फुटांचे ऑफिस आहे. नुकतीच अमरावती येथेही त्यांनी शाखा स्थापन केली आहे. त्यांच्याकडे सध्या 160 कर्मचारी आहेत. अवघ्या पाच वर्षांत नितीन सिरसाट व त्यांच्या सहकार्‍यांनी ही प्रगती साधली आहे. ही सर्व डिजिटल मार्केटिंगचीच किमया आहे.

नितीन सिरसाट नवउद्योजकांना व मराठी तरुणांना आवाहन करतात की, मराठी तरुणांनी आवर्जून व्यवसायातच उतरावे. व्यवसायाच्या माध्यमातून आपण अनेकांना रोजगार पुरवू शकतो. सर्वांनी डिजिटल मार्केटिंगचा लाभ घ्यावा. सध्याच्या काळात आपण वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या मालाची व सेवांची जागतिक पातळीवर विक्री करू शकतो. आपला व्यवसाय जर जागतिक पातळीवर न्यायचा असेल तर डिजिटल मार्केटिंगला पर्याय नाही. त्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते सर्व तर्‍हेचे मार्गदर्शन व मदत करण्यासाठी झिऑन मार्केट रीसर्च सदैव तत्पर आहे.

संपर्क : नितिन सिरसाट
72761 73792


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?