Advertisement
उद्योगोपयोगी

इंस्टाग्राम वापरून तरुणांमध्ये पॉप्युलर करा आपला ब्रॅण्ड

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी भारतीय तरुणांमध्ये आज इन्स्टाग्राम हे सर्वाधिक पसंतीचे सोशल नेटवर्क आहे. आजघडीला जगात ७ कोटी लोक इन्स्टाग्रामचे वापरकर्ते आहेत. तसेच त्यातील ४ कोटी लोक रोज इन्स्टाग्राम वापरतात. या ७ कोटी लोकांपैकी ऐंशी टक्के लोक म्हणजेच ५.६ कोटी लोक कोणते ना कोणते इन्स्टाग्रामवरील बिझनेस अकाऊंट फॉलो करतात. इन्स्टाग्रामला फेसबुकने विकत घेतल्यामुळे आता ते फेसबुकशी जोडलेले आहे.

‘इंस्टाग्राम’साठी प्रॉडक्ट फोटोग्राफी

‘इंस्टाग्राम’वर बिझनेस खाते उघडण्याची प्रक्रिया

इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट उघडण्यासाठी आपल्या फोनवरून इन्स्टाग्रामचे अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर ‘क्रिएट न्यू अकाऊंट’वर क्‍लिक करा. आपली माहिती त्यात भरून आपले अकाऊंट तयार करा. इतर सोशल मीडियाप्रमाणे इंस्टाग्रामसुद्धा आपल्याला आपल्या व्यवसायाचे अकाऊंट तयार करण्याचा पर्याय मोफत देते. यातून आपल्याला व्यवसायासाठी काही अधिक गोष्टींचा लाभ मिळतो. जसे की, आपल्या संपर्काची माहिती (ईमेल, संपर्क क्रमांक, पत्ता) लोकांना त्यांच्या मोबाइलवर लगेच दिसते. तसेच आपली पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचली हेही कळते.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आपले बिझनेस अकाऊंट तयार करण्यासाठी आपल्या प्रोफाइलच्या सेटिंग्जमध्ये जा. त्यात आपल्याला ‘स्विच टू बिझनेस अकाऊंट’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्‍लिक करून आपले अकाऊंट बिझनेस अकाऊंटमध्ये रूपांतरित करा. वेगवेगळ्या ई-मेल आयडीद्वारे आपण आपली वैयक्तिक व व्यावसायिक अशी दोन वेगवेगळी अकाऊंट्सही तयार करू शकतो. आपल्या बिझनेस अकाऊंटचा प्रोफाइल फोटो, आपला लोगो किंवा तत्सम कोणता तरी फोटो ठेवा ज्यामुळे लोकांना आपला उद्योग ओळखणे सोपे जाईल. आपले अकाऊंट उघडले की त्यावर नियमित पोस्टिंग करा. या पोस्टचा वापर प्रत्यक्ष विक्रीपेक्षा लोकांशी नातेसंबंध तयार होण्यास मदत करणारा होतो. त्यामुळे लोकांना उपयुक्त असतील अशा पोस्ट यावर जास्त कराव्यात.

आपल्या अकाऊंट्सवरून पोस्ट करण्याशिवाय आपण इन्स्टाग्रामवर पैसे भरून प्रमोशनसुद्धा करू शकता. वरून आपण आपली जाहिरात बनवून प्रसिद्ध करू शकता. आता आपल्याला असे वाटेल की, जर फेसबुक आहे तर इंस्टाग्राम कशाला? तर आता आपण त्याची काही वैशिष्ट्ये पाहूयात.

  • सर्वात जास्त तरुणांकडून वापरले जाणारे आजघडीचे हे अ‍ॅप आहे.
  • २.५ करोडहून अधिक लोक दर मिनिटाला इंस्टाग्रामवर काही ना काही पोस्ट करतात.
  • इंस्टाग्राम हा सध्या तरुणांमध्ये ट्रेंड असल्यामुळे भारतातील मोबाइल वापरणारे जवळजवळ सर्वच तरुण व्यक्ती या इंस्टाग्राम वापरतात.
  • इंस्टाग्रामवर लोक आपली वॉल पाहण्यापेक्षा सर्चमध्ये जाऊन इतरांच्या पोस्ट्स जास्त बघतात.

ज्यामुळे आपण आपल्या व्यवसायाचे प्रमोशन जर इन्स्टाग्रामवरून करायचे ठरवले तर त्याचा नक्कीच फायदा आहे; परंतु आपण त्यात सतत अपडेट राहून नियमित पोस्टिंग करणे गरजेचे आहे. दर वेळी काही तरी माहितीपरच हवे असे काही नाही, तर आपल्या व्यवसायातील कर्मचार्‍याचा काम करतानाचा फोटोसुद्धा इंस्टाग्रामवरती प्रसिद्ध होऊ शकतो. त्यामुळे योग्य नियोजन करून इंस्टाग्राम वापरले तर त्याचा आपल्याला आपल्या प्रसिद्धीसाठी नक्की फायदा होतो.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!