केस स्टडी मांडणे : एक प्रभावी मार्केटिंग तंत्र

डॉक्टरी पेशामध्ये आपण ‘केस स्टडी’ हा शब्द ऐकला असेल वा कोणत्याही मोठ्या कंपनीच्या वेबसाइटवर आपल्यास केस स्टडी हा कॉलम दिसतो. तो नेमका कशासाठी असतो? त्यात काय माहिती असते? आणि महत्त्वाचे म्हणजे हे कशासाठी दिलेले असते? ह्याची कल्पना बऱ्याच उद्योजकांना नाही.

केस स्टडी कशासाठी असते? त्याचे महत्त्व काय?  कसे तयार करावे? कोणकोणते मुद्दे त्यात असावेत? केस स्टडी हे अत्यंत प्रभावी मार्केटिंग तंत्र आहे जे आपली सेवा आणि समाधानावर केंद्रित आहे. हे तंत्र आपल्याला आपले उत्पादन प्रदर्शित करण्यास अनुमती देते. केस स्टडी आपल्या सोल्यूशनच्या तपशीलवार विश्‍लेषणावर जोर देते.

केस स्टडी म्हणजे केवळ एक कथा सांगणे असे नाही. ते स्पष्ट करते की, आपल्या कंपनीचे उत्पादन किंवा सेवा विशिष्ट समस्यांकरिता आणि गरजांकरिता कसे लाभदायक होऊ शकते. आपल्या स्वत: आणि कंपनीबद्दल बोलण्याऐवजी हे आपण प्रदान केलेल्या सेवा आणि समाधानावर केंद्रित आहे.

ह्या केस स्टडीचा आपल्याला किती फायदा आहे. व्यावसायिक क्षेत्रात आपण दररोज काही ना काही बदल करतो; पण हा बदल कधी आणि कसा करावा हे आपणास ह्या अभ्यासातून शिकता येईल. एखाद्या विशिष्ट समस्यांना आपण कसे हाताळले हे आपणास कळेल. त्यानुसार व्यावसायिक जीवनात कसे बदल करावेत, नवीन गृहीतके कशी मांडावीत हे कळेल.

आपण ग्राहकांना सेवा देण्यास किती सज्ज आहोत ह्याची कल्पना आपणास येईल. ग्राहकांच्या वास्तविक समस्यांबद्दल आपण जागरूक असाल आणि हे प्रश्न आपण आधी कसे सोडवले आणि आता कसे करावे ह्यात गफलत होणार नाही.

केस स्टडीचे घटक

समस्या विधान : हा अभ्यासासारख्या समस्या असणाऱ्या ग्राहकांसाठी उपदेशात्मक उदाहरण म्हणून कार्य करतात. यात ग्राहकाची पार्श्वभूमी, ग्राहकाची गरज आणि गरजांची तपशीलवार माहिती समाविष्ट असते. सारख्या समस्यांमुळे ग्राहकांशी वैचारिक जवळीक साधली जाते आणि  ग्राहकांचा  विश्वास जिंकण्यास सुरुवात होते.

दृष्टिकोन आणि  प्रक्रिया : हा अभ्यास केवळ ग्राहकांवर केंद्रित करत नाही, तर ग्राहक समस्यांचे निराकरण कसे केले जाते याचे वर्णनदेखील करते. ग्राहकांची गरज पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारचे तंत्र आणि प्रक्रिया वापरली जात आहे हे स्पष्ट केले जाते.

दृष्टिकोन आणि प्रक्रिया आपल्या सेवा आणि सामर्थ्याचा पाया स्पष्ट करते. तंत्र आणि प्रक्रिया ह्या दोन्ही गोष्टी जाणून घेण्यास ग्राहक नेहमी उत्सुक असतात. त्यामुळे ग्राहक आपल्याकडे आकर्षित होण्यास मदत होते.

यशोगाथा : वास्तविक उदाहरण आणि प्रत्यक्ष सराव ह्याच्या आधारावर आपण यश प्रदर्शित करू शकतो. अधिक विश्वासार्हता आणि विश्वसनीयता अभ्यास करणारे असल्यास केसची प्रत्यक्ष आकडेवारी दिली जाऊ शकते. हे वाचल्यानंतर ग्राहक आपल्याकडे येणारच ह्याचे कारण म्हणजे त्याच्या गरजांची माहिती आणि समाधानाची गणिते आपण अचूक मांडली.

म्हणजेच एखाद्या विशिष्ट ग्राहकाला त्याच्या गरजांसाठी एक विशिष्ट सेवा हवी असेल तर ती आपण कशा प्रकारे द्याल ह्याचे रिअल टाइम उदाहरण आपण देत असतो. माझी कंपनी काय करते ह्यापेक्षा माझ्या कंपनीने आतापर्यंत काय केले ह्याची तपशीलवार माहिती दिलेली असते.

केस स्टडीचे वेगवेगळे प्रकार

आपण आपले केस स्टडी विविध आणि सर्जनशील पद्धतीने प्रकाशित करू शकता.

ब्लॉग पोस्ट : केस स्टडी प्रकाशित करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. फक्त तुमचा केस स्टडीज एखाद्या चॅट फोरम किंवा सोशल मीडियावर पोस्ट करा आणि  विविध ग्राहकांसोबत त्याबद्दल विचारविनिमय करणे सुरू करा.

पीडीएफ : केस स्टडीसाठी हा सर्वात लोकप्रिय आणि जास्त वापरला जाणारा मार्ग आहे. आजपर्यंत हा प्राधान्याने निवडला गेलेला मार्ग आहे. आपण ग्राफिकल प्रस्तुती तयार करू शकता. व्यावसायिक आणि अधिक माहितीपूर्ण पीडीएफ हे मेलद्वारे किंवा वृत्तपत्र म्हणून प्रकाशित करणे खूप सोपे आहे.

इन्फोग्राफिक्स : चित्र मजकुरापेक्षा स्पष्ट बोलते. हे इन्फोग्राफिक्स आपला अभ्यास प्रकशित करण्यासाठी चांगले आहे; परंतु योजनेसाठी आणि डिझाइनसाठी थोडा वेळ लागतो.

व्हिडीओ : केस स्टडी लिहिण्याच्या सुसंगतेमुळे आकर्षक आणि  माहितीपूर्ण  व्हिडीओ  तयार होऊ शकतो आणि तो सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून आपण  पोस्ट करू शकतो. हा व्हिडीओ ग्राहकांची मुलाखत घेऊन केला जाऊ शकतो. सर्वेक्षणे, अभिप्राय, कंपनीची प्रक्रिया आणि बरेच काही आपण त्यात सामील करू शकता.

अशा प्रकारे एक उत्कृष्ट केस स्टडी आपल्याला फायदा देणारच. आजच आपल्या व्यवसायाची केस स्टडी तयार करा आणि पोस्ट करा. नव्याने ग्राहक जोडले जातील हे नक्की.

– मयूर देशपांडे
77210 05051
(लेखक व्यवसाय विश्‍लेषक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?