आपली माहिती गोळा करून आपल्याला केले जाते ‘टार्गेट मार्केट’


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


“एक काळ होता जेव्हा फक्त आयटीचा ट्रेंड होतो; पण पुढील वीस वर्षे फक्त आणि फक्त डेटाचाच काळ असेल”, हे विधान आहे ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा यांचं.

हल्ली आपण ऐकतोय आधार डेटा लीक झाला, प्रायव्हसी हॅक, डेटा साठवणे, फेसबुक-केंब्रिज अ‍ॅनलॅटिक्स इत्यादी इत्यादी; पण नेमका डेटा म्हणजे काय? सरळ शब्दांत काय झालं तर माहिती. हो डेटा म्हणजे फक्त माहिती आणि ती गणिते स्वरूपात मांडणे म्हणजे अ‍ॅनलॅटिक्स.

बरं मग डेटा आणि आपला काय संबंध? अहो, तुमचीच माहिती म्हणजे डेटा. आमची वैयक्तिक माहिती कुणाच्या कामाची? आणि आमची माहिती घेऊन ते लोक काय लोणचं करणार आहे? हो तेही आंब्याचं!

२०१६ मध्ये एक प्रयोग ‘फेसबुक’ने चालू केला होता. आपले वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर आणि फेसबुक लिंक करण्याचा. जसे आता इंस्टाग्राम-फेसबुक आहेत तसेच, पण या प्रयोगाला भारतातून प्रचंड विरोध झाला. पुढे ‘फेसबुक’ने ही प्रक्रिया गुंडाळली. आपले वैयक्तिक मेसेज हवे तर कशाला त्यांना? या झुक्याला आपल्यामध्ये इतका इंटरेस्ट काय आहे?

खरे सांगायचे झालं तर हा त्यांचा खरा व्यवसाय आहे. आपल्याबद्दल माहिती मिळवायची, आपल्या सवयी, आवडी, सहली, मनोरंजन, खेळ इत्यादी गोष्टी आपण काय-काय, कधी-कधी करतो याची ते नोंद ठेवतात आणि एक मार्केटप्लेस तयार करून मार्केटिंगसाठी वापरतात. या प्रक्रियेमुळे आपला थोडा फायदाही झाला आहे.

नव्या फेसबुक बिजनेसमुळे फार लोकांना रोजगार तर मिळालाच आहे यासोबतच ‘टारगेट मार्केटिंग’ अशी एक नवी अद्ययावत व बहुपयोगी मार्केटिंग प्रणालीसुद्धा त्यांनी शोधली आहे. म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडी कशा तशाच प्रकारचे वस्तू त्यांना ‘मार्केट’ केले जाते.

आज या सोशल साइट म्हणजे एक मीडिया म्हणूनच उदयास आले आहेत. अशी मीडिया जी आपण पब्लिकने ऑपरेट केली जाते. २०११ मध्ये इजिप्तमध्ये झालेली क्रांती आपण विसरलाच असाल. फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्कनासुद्धा अशा प्रकारच्या निकालाची कल्पनाच नव्हती; पण या प्रकरणानंतर जागे झालेल्या या मंडळींनी स्वतःची ताकद ओळखली आणि त्याचा व्यवसायिक वापर तर केलाच. इथंपर्यंत सगळं ठीक आहे; परंतु या कंपन्यांना भस्म्या रोग जडला. लोकांचे आयुष्य ‘कंट्रोल’ करू पाहण्याचा.

यांनी आपली ही माहिती स्वत:साठी वापर करून झाली की ती दुसर्‍यांना विकली. याचा वापर करून मोठमोठ्या डेटा मायनिंग कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला जाणते-अजाणतेपणी थोडाफार का होईना एका विशिष्ट माणसाला आपण मत द्यावं म्हणून प्रयत्न केले गेले. अशातच अमेरिकेत ट्रम्प निवडून आले. आता हा प्रयोग त्यांनी केला की नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे, कारण त्यात बर्‍याच लोकांनी आपले हात धुऊन घेतले आहेत.

मागच्या जन्मी तुम्ही कोण होता? २०३० मध्ये तुमच्याकडे किती पैसे असतील? तुमचा खरा मित्र कोण आहे? अशा प्रकारचे लिंक आपण सर्रास वापरतो; पण आपल्याला कळत नाही की, हा डेटा संकलनाचा भाग आहे. आपलं वय, ई-मेल, फ्रेंडलिस्ट इत्यादी माहिती सहजपणे गोळा करून घेतात.

‘मल्लू अ‍ॅप्स’ एक थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन आहे. हे अशा प्रकारचे लिंक तयार करतात. आज-काल सगळ्यांच्या मोबाइलमध्ये ट्रू-कॉलर नावाचे अ‍ॅप्लिकेशन वापरताना दिसतात; पण खरं तर हे अ‍ॅप्लिकेशन आपलेच कॉन्टॅक्ट इतर वापरकर्त्यांच्या कॉन्टॅक्टबरोबर सिंक्रोनाइज करून आपल्याला रिझल्ट दाखवतात.

ही माहिती घेऊन खरंच त्यांना उपयोगी पडते का? ‘अ‍ॅमेझॉन’कडे त्यांचा स्वतःचा एक AI आहे. याचा वापर करून वस्तू खरेदी करणारा मनुष्य खरेदी करताना, अगोदर किंवा खरेदीपश्चात काय काय विचार करत होता ते अ‍ॅनालिसेस करत असतं. अमेझॉनवर ती सर्च केलेली एखादी वस्तू तुम्हाला तुमच्या फेसबुकला दिसते ती अशी.

इतकेच नाही तुमच्या मोबाइलमध्ये असलेला प्रत्येक अ‍ॅप्लिकेशन आपला डेटा विविध प्रकारे एक्सेस करत असतात. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल की, आपण बोललेल्या गोष्टी आपला मोबाइल ऐकतो. म्हणजे कोपर्‍यात पडलेला मोबाइल आपल्या घरातल्या ऑफिसमधल्या होणार्‍या चर्चा स्टोअर करत असतो. तुम्हाला खरे वाटणार नाही, पण हे सत्य आहे. आता मारा प्रायव्हसीच्या बोंबा.

डेटा संकलनाचे तोटे जेवढे दिसतात त्याचे फायदेही तेवढेच आहेत. युरोपीयन देशात यांच्यासाठी निर्बंध आहेत डेटा संकलन तर होणारच, पण ते योग्य त्या कामासाठीच वापरले गेले पाहिजे, असा ठाम पवित्रा त्यांचा आहे. असे कडक निर्बंध त्यांच्याकडे आहेत आणि जे काही सर्व्हर स्टोरेज आहे ते त्यांच्या सरकारअंतर्गत त्यांच्याच देशात सुरक्षित ठेवले पाहिजे. चीनमध्येही एक सरकारी हुकूमशाही आहे.

चिनी लोक स्वतःचाच फेसबुक, अमेझॉन, यूट्यूब तर वापरतात आणि तो सगळा डेटा फक्त त्यांच्यात देशाच्या सरकारी फायद्यासाठी वापरता येतो. अख्ख्या जगाला सॉफ्टवेअर निर्यात करणार्‍या भारतात गुगल, फेसबुक, ट्विटर, अमेझॉन अशा एकाही कंपनीचे सर्व्हर्स भारतात नाहीत, ही मोठी निष्क्रियताच आहे.

हेल्थ कॉन्शियस असणार्‍या बर्‍याच लोकांनी नवीन मनगटी ‘बँड्स’ घेतल्या असतील. तुम्ही रोज किती पावले चाललात? किती कॅलरीज घटवलीत? किती वेळ झोपलात? अशा विविध माहिती या बँड्स सांगत असतात. ‘एमआय’चा बँड तर सांगतो की, आपण किती वेळ झोपलो आणि त्यापैकी ‘गाढ’ झोप नेमकी किती वेळ होती,’ हा सगळा डेटा ते अ‍ॅनालिसिस करत असतात.

आता समजा, जर पुढे काही दिवसांत एखाद्या व्यक्तीला अनिद्रेचा त्रास होत असेल तर हा डेटा घेऊन झोपेच्या गोळ्या विकणार्‍या कंपन्या तुम्हाला टार्गेट करणार हे नक्की. याउलट एखाद्या व्यक्तीला हृदयविकार येणार असेल तर किंवा हार्ट बीट, ब्लड प्रेशर इ. अचानकपणे अति कमी किंवा अति जास्त होणार असेल तर हा बँड तुमच्या स्वकियांना तात्काळ मेसेज करेल (SOS). हा ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. (या गोष्टी सध्या तरी काल्पनिकच आहेत.)

एकूणच काय, तर आजच्या घडीला आपण अशा विविध मार्गांनी या डेटामध्ये गुंतून गेलो आहोत. त्यातून सुटका शक्यच नाही; पण आपली जागरूकता वाढवून या गोष्टी मानवाच्या कल्याणाकरिता वापरल्या जाव्यात जावा यावर भर असलाच पाहिजे. असे कायदे करणे गरजेचे आहे.

– नागेश बुद्धे
९९६०३७७००५

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?