कल्पनाशक्तीचा वापर करून व्यवसाय मोठा कसा कराल?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तुम्हाला कळो वा न कळो, आवडो वा न आवडो, कल्पनाशक्तीचे काम चालूच असते. कल्पनाशक्ती हे मनाचे असे तरल कार्य आहे की, अगदी मिनिटाला ५० एवढ्या कल्पना मनातून उत्पन्न होतात व विरूनही जातात; पण लक्षात घ्या, यातूनच सर्व नवनिर्मिती होत असते. शास्त्रज्ञ, कवी, लेखक, कलाकार, संगीतकार, शिक्षक, तंत्रज्ञ, अधिकारी हे सर्व जण या तरल शक्तीचा नियंत्रित वापर करत असतात.

अगदी एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्यापासून ते कोणतीही समस्या सोडवण्यापर्यंत एवढ्या व्यापक क्षेत्रात कल्पनाशक्तीचा वापर होत असतो. उद्योजक म्हणूनही आपण कल्पनाशक्तीचा नियंत्रित व सर्जनशील वापर करण्याची गरज असते. कसे तेच पाहू.

वास्तविक कोणतीही गोष्ट आधी मनात म्हणजे कल्पनेच्या स्वरूपातच तयार होते. अगदी घरी जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ तयार करता, तेव्हा त्याच्या साहित्य व कृतीपासून तो पदार्थ तुम्हाला मनात दिसू लागतो व तुम्ही एक-एक कृती करत त्यापर्यंत पोहोचता.

तसेच, एखादी इमारत किंवा पूल बांधताना स्थापत्यतज्ज्ञ आधी मनात ती इमारत पाहतो, कागदावर अनेक आराखडे, चित्रे काढतो, परत-परत ती दुरुस्त करतो, सुधारतो. मग एकदा ते नक्की झाल्यावर त्याप्रमाणे बांधकाम केले जाते व ती वस्तू प्रत्यक्ष समोर उभी राहते.

एखादा शोध लावणारा शास्त्रज्ञही त्याला अपेक्षित असणाऱ्या तंत्राचा वा परिणामाचा विचार करतो, त्याचे एक मानसिक चित्र बनवितो, तेच उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अनेक कल्पना विकसित करतो, त्यातील उचित कल्पना पुढे नेऊन आपल्या इच्छित गोष्टीची निर्मिती करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही कल्पनाशक्ती असलेले मन सर्वांकडे आहे, त्याचा वापर करणे आपल्या हातात आहे.

उद्योजकाला सुरुवातीला कोणता उद्योग करावा यासाठी कल्पनाशक्तीचाच वापर करावा लागतो. आपली आवड, ज्ञान, अनुभव लक्षात घेऊन ग्राहकाची कोणती गरज आपण भागवू, याचा विचार करून उद्योग सुरू करायचा असतो, कारण समाजाला काही उपयोगी वस्तू वा सेवा दिल्याशिवाय तुम्हाला मोबदला मिळत नाही. तर ग्राहकाचा वेळ, मेहनत व पैसा वाचेल असे आपण काय देऊ शकू, याचा विचार करताना कल्पनाशक्तीचा वापर आपण करतो.

त्याचबरोबर, कोणत्या तऱ्हेने ग्राहकासाठी सुख, समाधान किंवा समस्या निवारण करता येईल, याचा विचार उद्योगाची कल्पना उभारताना करता येतो. त्यानुसार येणाऱ्या कल्पना लिहून, त्यांचा तौलनिक अभ्यास करावा व त्यातील जास्त प्रभावी व फायद्याची असेल तिचा वापर करून उद्योग सुरू करावा.

व्यवसायाची कल्पना नक्की झाल्यावर business plan म्हणजे व्यवसायाचा आराखडा बनविण्यासाठी परत कल्पनाशक्तीचाच वापर करायचा असतो. म्हणजे उत्पादनाचे स्वरूप, लागणारा कच्चा माल, पैसा, माणसे, जागा याचे प्रमाण व गरज याबाबत (गणिती) कल्पना नक्की करून, कागदावर अनेक वेळा आकडेमोड करून, त्यातून एक आराखडा नक्की करावा व तो वारंवार बदलू नये. या आराखड्यात किती व कोणती साधने लागतील याचे अंदाज असतात, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कल्पनेतील ध्येय गाठू शकता.

पुढे उत्पादनाची रचना, उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग, वापर, विक्री याच्या पद्धती निश्चित करताना कल्पनाशक्तीचा वापर होतो. आपला उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या योजणे, दर्जा सांभाळणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी बाबतीत विचार करून निर्णय घ्यावे लागतात. पैसा कसा उभा करावा, त्यासाठी प्रकल्प अहवाल कसा लिहावा, उत्पादनाची वैशिष्ट्ये काय आहेत,

कमीत कमी खर्चात-वेळेत उत्पादन करून फायदा कसा वाढवावा, उत्पादन जास्त टिकण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, नवीन उत्पादनाची रचना, कच्च्या मालाचा योग्य वापर, नुकसानावर नियंत्रण अशा सर्व बाबतीत उद्योजक स्वत:च्या किंवा कर्मचाऱ्याच्या मनातील कल्पनाशक्तीचाच वापर करत असतो.

प्रसाराच्या वा प्रचाराच्या कल्पना राबवताना जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ कल्पनाशक्तीचाच वापर करतात. अगदी रस्त्यावरील विक्रेताही आपल्या उत्पादनाची वा सेवेची जाहिरात कल्पकतेने करताना दिसतो, तसे करून तो आपले लक्ष वेधून घेतो व विक्री वाढवतो.

वर्तमानपत्र, मासिके, टीव्ही, रेडिओ, वेबसाइट, मोबाइल अॅप्स् वगैरे माध्यमांतून प्रचाराची स्पर्धाच होत असताना आपल्याला दिसते. विविध माध्यमे, रंग, शब्द, संगीत, धून, चित्र, व्यक्तिमत्त्व याची सरमिसळ करून ग्राहकाच्या कोणत्या मानसिक भावास संबोधित करता येईल, हेही कल्पनाशक्ती वापरून ठरवावे लागते.

समस्यांची उकल करतानाही कल्पनाशक्तीचा वापर होतो. आरोग्याच्या, ऊर्जानिर्मितीच्या, व्यवस्थापनाच्या, वस्त्र रचनेच्या, राजकीय निर्णयाच्या, मालवाहतुकीच्या, वाहनाच्या, संरक्षणाच्या, मनोरंजनाच्या यापासून वैयक्तिक घरगुती बाबींपर्यंत सर्वच ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी एक वा अनेक व्यक्ती लक्ष केंद्रित करतात, त्यातील घटकांचा बारकाईने अभ्यास करून कल्पनानिर्मिती करतात. त्यांचा ऊहापोह व विश्लेषण करून योग्य कल्पनेचा त्या समस्येवर उपाय म्हणून स्वीकार करतात, त्याची अंमलबजावणी करतात.

वास्तविक उद्योजक म्हणून आपणही हेच करायला हवे. व्यक्तीची, संस्थेची, समाजाची, देशाची वा मानव जातीची कोणती गरज वा समस्या आपण सोडवत आहोत ते महत्त्वाचे. जेवढी मोठी समस्या तुम्ही सोडवाल तेवढे मोठे तुमचे ध्येय व तेवढे मोठे तुमचे यश असणार आहे. कल्पनाशक्ती २४ तास उपलब्ध आहे.

कोणत्याही बाबतीत कल्पनानिर्मिती करण्यासाठी कागद व पेन्सिल घ्या. त्यावर कोणत्या विषयावर कल्पनानिर्मिती करायची आहे ते १०-१५ शब्दांत स्पष्ट लिहा. त्यावर लक्ष केंद्रित करा. लवकरच त्यावर तुम्हाला कल्पना सुचतील व उत्तर मिळेल, असा विश्वास बाळगा. तोच विचार सतत करत राहा. आता, मनात येणारे सर्व पर्याय व कल्पना भराभर लिहून घ्या. नंतर त्याची योग्य, अयोग्य वगैरे छाननी करा. उत्तर त्यातच सापडते. असा प्रयोग तुम्ही सर्व सहकाऱ्यांबरोबर बसूनही करू शकता.

ही गोष्ट एका तासात होईल किंवा त्याला दहा वर्षेही लागतील. तुमच्या आवश्यक कल्पनेची व्याप्ती व तुमच्या ध्येयाची तीव्रता यावर लागणारा वेळ अवलंबून आहे. उदा. तुम्हाला दहा हजार रुपयांची किंवा दहा कोटी रुपयांची व्यवस्था करायला वेगवेगळा वेळ लागेल किंवा एखादा नवीन पदार्थ लवकर बनेल, पण मधुमेहावर औषध निर्माण करायला जास्त वेळ लागू शकेल.

मानव प्रगतीचा सर्व इतिहास हेच दाखवतो की, अशक्य वाटणार्‍या सर्व वस्तू व पद्धती हळूहळू मानवाने प्रत्यक्षात आणल्या आणि हे असेच पुढे चालू राहणार आणि हीच शक्ती आपल्याला वैयक्तिक व व्यावसाायिक ध्येयासाठीही तंतोतंत वापरता येते आणि ही कल्पनाशक्ती आपल्या मनात दडून बसली आहे, जिचा मोफत वापर करून आपण आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडवू शकतो.

तर कल्पनाशक्तीचे हे पूर्ण विश्व तुमच्यासाठी खुले आहे. कोणतीही गोष्ट जिचा तुम्ही विचार/कल्पना करू शकता व जिच्यावर तुमचा विश्वास आहे, ती करणे तुम्हाला शक्य आहे. आता वैयक्तिक आयुष्यात व उद्योगात यश मिळविणे तुमच्या हातात आहे, कारण कल्पनाशक्तीचा वापर करून, योग्य कल्पना व आराखडा तयार करून त्याचा पाठपुरावा करणे तुमच्याच हातात आहे आणि सर्व काही करणे शक्य आहे. मग करा आता तुमच्या आवडीच्या कल्पनेचा विस्तार व मिळवा उत्तुंग यश!बरोबर बसूनही करू शकता.

ही गोष्ट एका तासात होईल किंवा त्याला दहा वर्षेही लागतील. तुमच्या आवश्यक कल्पनेची व्याप्ती व तुमच्या ध्येयाची तीव्रता यावर लागणारा वेळ अवलंबून आहे. उदा. तुम्हाला दहा हजार रुपयांची किंवा दहा कोटी रुपयांची व्यवस्था करायला वेगवेगळा वेळ लागेल किंवा एखादा नवीन पदार्थ लवकर बनेल, पण मधुमेहावर औषध निर्माण करायला जास्त वेळ लागू शकेल.

मानव प्रगतीचा सर्व इतिहास हेच दाखवतो की, अशक्य वाटणाऱ्या सर्व वस्तू व पद्धती हळूहळू मानवाने प्रत्यक्षात आणल्या आणि हे असेच पुढे चालू राहणार आणि हीच शक्ती आपल्याला वैयक्तिक व व्यावसाायिक ध्येयासाठीही तंतोतंत वापरता येते आणि ही कल्पनाशक्ती आपल्या मनात दडून बसली आहे, जिचा मोफत वापर करून आपण आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडवू शकतो.

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?