Advertisement
प्रासंगिक

झूम ऍप वापरत असाल; तर ही काळजी घ्या!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


सध्या लॉकडाऊनमुळे आपल्यातील बरेच जण झूम app चा वापर ऑफिस मिटींग्स, व्हिडिओ कॉल्स आदींसाठी करत आहेत. यावर अनेक खाजगी गोष्टींबद्दल बोलणं सुरू आहे, परंतु हे ऍप वापरणं पूर्णपणे सुरक्षित नाही, असं भारत सरकारच्या सायबर को-ऑर्डिनेशन सेंटरनी जाहीर केलं आहे. तरी, जे हे app वापरत असतील त्यांनी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही सायबर को-ऑर्डिनेशन सेंटरनी सांगितले आहे.

१. प्रत्येक नवीन मीटिंगसाठी नवीन युझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
२. ‘वेटिंग रुम’ या फीचरचा वापर करावा. याने प्रत्येक युझरला मीटिंगमध्ये येण्यासाठी होस्ट (मिटिंग घेणाऱ्याची) परवानगी घ्यावी लागेल.
३. ‘जॉईन बिफोर होस्ट’ हे फिचर बंद करावे.
४. ‘स्क्रीन शेअरिंग बाय होस्ट ओन्ली’ हे फिचर सुरू करावे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

५. ‘अलाउ रिमूव्हड पार्टिसिपन्ट्स टू रिजॉईन’ हे फिचर बंद करावे.
६. फाईल्स ट्रान्स्फर करणं गरजेचं नसल्यास फाईल ट्रान्स्फर हे फिचर बंद करावे.
७. सर्वांनी मीटिंग जॉईन केल्यावर मीटिंग लॉक करावी.
८. ‘रेकॉर्डिंग’ हे फिचर बंद ठेवावे.
९. जर तुम्ही मीटिंग सुरू केली असेल, तर सर्वात शेवटी ‘मीटिंग एन्ड’ करावी, केवळ ‘लिव्ह मीटिंग’ करू नये.

यामुळे शक्यतो गरज असल्याशिवाय अशा कोणत्याच app चा वापर करू नका. त्याचप्रमाणे कोणत्याही खाजगी गोष्टी अशा app मार्फत इतरांसोबत शेअर करणं टाळा.

सतर्क रहा, सुरक्षित रहा!

– शैवाली बर्वे

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!