देवासाठी कापसाची डिझायनर वस्त्रे तयार करणारी उद्योजिका

मी एक छंदिष्ट. सतत काहीतरी नवनवीन शिकणं हा मला छंदच जडला आहे. प्रत्येक गोष्ट बघितली की ती आपल्याला करता येईल का या विचारांची मनात नेहमी गर्दी होते. कलाकुसर, कुकिंग, गायन, पर्यटन, लेखन ग्रिटींग करणं या छंदांशी माझी गट्टी जमली आहे. मी जवळजवळ पूर्ण भारत फिरले.

दोन तीन फाॅरेन ट्रिपही झाल्या. कुकिंगच म्हणाल तर अतिथी देवो भवः या उक्तीनुसार प्रत्येक पाहुण्याला, घरातील मंडळींना, मित्रमैत्रिणींना खाऊ घालण्यात मी रमते. माझ्या अनेक डिशेस वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. मी लेख व कविता लिहीते. माझे काही लेख वृत्तपत्रातून छापून आले आहेत.

संगीत ऐकणे व ऐकवणे हा माझा सर्वात आवडता छंद. आता सोशल मीडियाच्या वापरामुळे ग्रिटींग करणे थोडेसे मागे पडले असले तरी ३०० ते ४०० ग्रिटींग्स दिवाळी, वाढदिवस, दसरा आणि अशा मंगल प्रसंगी आप्तस्वकियांना करून पाठवली आहेत. माझ्या मुलीच्या तिसऱ्या वाढदिवसाला ७० कार्टुनची ग्रिटींग्स तीच्या बाल मित्रमैत्रिणींना दिली. ती त्या मुलांनी आपल्याकडे अजून जपून ठेवली आहेत.

लहानपणापासून काहीतरी वेगळ करून दाखवण्याच वेड. असच एकदा मनात आल की आपण जे देवाला कापसाचे वस्त्र वाहतो ते जर डिझायनर स्वरूपात वाहिले तर! हळूहळू कल्पना मुळ धरू लागली. नवनवीन डिझाईन्स कल्पनेतून साकार होऊ लागली. अनेक रंग, टिकल्या, मणी मदतीला धावून आले आणि म्हणता म्हणता या छंदातून ३० ते ४० डिझाईन्स तयार झाली.

मनात विचार आला की या वस्त्रांचाच आपण व्यवसाय सुरू केला तर लोकांना कितपत आवडेल! या विचारातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या मदतीने मी लोकांपर्यंत पोहोचायला लागले. आता माझा हा छंद व्यवसायाच रूप घेऊ पाहत आहे.

संसारातून मिळालेल्या फावल्या वेळात मी हा माझा व्यवसाय करत असल्याने संसारावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. हा माझा छंद माझे करियर व संसार यांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळेच करियर व संसार या दोन चाकांवर माझी छंदरूपी व्यवसायाची गाडी चौफेर उधळत आहे.

वर्षा छत्रे

कंपनीचे नाव : Varsha Enterprises
उत्पादने / सेवा : कापसाच्या वस्त्रापासून व वातींपासून तयार केलेले हार
जन्म दिनांक : ७ एप्रिल, १९६७
जन्म ठिकाण : देवगड

विद्यमान जिल्हा : सिंधुदुर्ग
शिक्षण : B.Com.
भ्रमणध्वनी : ९७६९२५७२३०
ई-मेल : chhatrevarsha67@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?