‘लाकडी पेंटिंग’ला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कार्यरत वर्षाराणी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मी एटीडी व जीडी आर्ट झाल्यानंतर काहीतरी उद्योग करण्याच्या शोधात होते. मला लाकडावर पेंटिंग करण्याची कल्पना सुचली. इंटरनेटवर शोध घेतला त्यातून लाकडामध्ये डिझाईन करण्याचा उद्योग सुचला. सहा महिने त्या संबंधी माहिती घेत फिरले.

वेगवेगळे टूल्स व मशिनरी खरेदी करत गेले. त्यातील कारागीर शोधले आणि लाकडातील डिझाईनची उत्पादने सुरू झाली. उत्पादक असल्यामुळे मार्केटमध्ये चांगली मागणी सुरू झाली. ग्राहकांच्या प्रश्नांच्या उत्तरातून नवीन उत्पादने मिळत गेली.

प्रत्येक ऑर्डरमध्ये आम्ही शिकत गेलो. त्यातून ग्राहकांच्या मागणी व पसंतीनुसार उत्पादने बदलत गेली. मार्केटिंगचा प्रश्न सोडवत असताना अनेक अडचणी आल्या आणि इंडियामार्टची ऑनलाईन मार्केटिंगची संधी मिळाली. इंडिया मार्टमुळे भारतीय बाजारपेठ मिळाली.

ही अफलातून कल्पना सर्वांनाच आवडली त्यातून कौतुक होत गेले. प्रोत्साहन मिळत गेले. आज मी माझ्या पायावर उभी आहे अजूनही हा संघर्ष चालू आहे. मीच माझ्याशी स्पर्धा करते आहे. जगभरात ही उत्पादने निर्यात करणे, डिझाईनच्या उत्पादनांमध्ये चीनशी स्पर्धा करणे, भारतीय बाजारपेठेमध्ये आमचा ब्रँड तयार करणे हे माझे लक्ष्य आहे.

वर्षाराणी महादेव डोंगरे

जन्म दिनांक : १३ एप्रिल, १९८३
जन्म ठिकाण : पुणे
ई-मेल : dongare.md73@gmail.com
भ्रमणध्वनी : ९४२३१७४१३०

विद्यमान जिल्हा : पुणे
शिक्षण : BA, G D Art, ATD
फेसबुक अकाऊंटची लिंक : http://mdhz6630dzire@gmail.com
कंपनीचे नाव : D WOODPECKER & COMPANY Ambegaon kh Pune
उत्पादने/सेवा: Wooden decorative items

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top