व्हेंचर कॅपीटल

उद्योगविश्वातील आर्थिक गणित फार वेगळी असतात. प्रत्येक उद्योजकाला आपला व्यवसाय चालवण्यासाठी पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते आणि ते भांडवल उभं करणं आणि ते सतत वाढवत ठेवणं यात त्याची तारेवरची कसरत होतं असते. अशा प्रत्येक उद्योजकासाठी व्हेंचर कॅपीटल हे आशेचं किरण असतं. जाणून घेऊ थोडंफार या व्हेंचर कॅपीटलबद्दल.

छोट्या-छोट्या उद्योगांत खरंतर मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याची क्षमता असते. मात्र बॅंका, पतसंस्था, सरकारी वित्त संस्था अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याचा धोका पत्करण्यापासून दूरच राहतात. परंतु व्हेंचर कॅपीटलिस्ट याच गोष्टीकडे संधी म्हणून पाहतात. त्यांना यात आपण केलेल्या गुंतवणूकीत जास्तीच्या धोक्यासोबतच जास्तीचा नफाही दिसत असतो. छोटे उद्योजक, विशेषत: स्टार्ट अप अवस्थेतील उद्योगांमध्येच व्हेंचर कॅपीटलिस्ट प्रामुख्याने गुंतवणूक करतात.

व्हेंचर कॅपीटलिस्ट हा एखादा वैयक्तिक गुंतवणूकदार अथवा एखादी व्हेंचर कॅपीटलिस्ट फर्मही असू शकते. हे एका वेळी अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात, जेणेकरून एखाद्या प्रोजेक्टमध्ये नफा कमी मिळाला अथवा नुकसान झाले तर दुसर्‍या प्रोजेक्टमधून तरी ही तूट भरून निघू शकेल.

व्हेंचर कॅपीटलिस्ट हा उद्योगात विविध टप्प्यांवर गुंतवणूक करतो. जसे की उद्योग सुरू करताना बीजभांडवल रूपातील गुंतवणूक, वाढीच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक इ.

सामान्य उद्योजकाने आपल्या उद्योगवाढीसाठी व्हेंचर कॅपीटलिस्टकडे जरूर जावे, मात्र व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी, विशेषत: कागदपत्रे इत्यादी वकील, सीए अशा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?