डॉ. वर्गीज कुरियन हे भारतातील ‘श्वेत क्रांती’, ‘धवल क्रांती’ म्हणजेच दूग्धक्रांतीचे जनक. कृषीविकास कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम राबवून १९९८ मध्ये त्यांनी भारताला अमेरिकापेक्षाही जास्त प्रगतीपथावर आणले.
दूग्धोत्पादनात भारताला जगातील सर्वात मोठा देश म्हणून त्यांनी स्थान निर्माण करून दिले. वर्गीज कुरियन यांनी देशभरात जवळपास ३० विविध संस्थांची स्थापना केली. त्यापैकीच अमुल, GVMMF, IRMA, NDDB या काही आहेत.
डॉ. वर्गीज कुरियन ‘अमूल इंडिया’चे जनक आहेत. डॉ. कुरियन यांना भारताच्या खाद्य-कृषी क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केल्याने पद्मविभूषण, मॅगसेसे अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
१९२१ मध्ये जन्मलेले डॉ. कुरियन हे मूळचे कोझीकोड केरळचे. मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी मिळाल्यानंतर भारत सरकारची शिष्यवृत्ती घेऊन डॉ. कुरियन मास्टर्ससाठी मिशिगनला गेले.
१९४९ ला भारतात परतल्यावर त्यांची नियुक्ती क्रीमरी, आनंद गुजरात येथे केली. डॉ. कुरियन यांनी सहकार्याच्या माध्यमातून खेडा येथील सर्व शेतकर्यांना दूध एकत्रित करून विकण्यासाठी जोडून ठेवले होते. ही खूप मोठी गोष्ट होती.
पुढे लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची (NDDB) स्थापना केली व डॉ. कुरियन यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. देशाच्या कानाकोपर्यात हा कार्यक्रम राबवला गेला आणि श्वेतक्रांती झाली.
या कार्यक्रमांतर्गत स्किम मिल्क, कंडेस्ड मिल्क गायीच्या दूधाऐवजी म्हशीच्या दूधापासून बनवायला सुरूवात केली आणि दोन दशकातच डॉ. कुरियन आणि त्यांच्या टीमने भारताला दूध आयात करण्याच्या देशाच्या रांगेतून काढून दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची निर्यात करणार्या देशांच्या पंक्तीत नेवून ठेवले.
डॉ. वर्गीज कुरियन यांनी भारतातीलच नव्हे, तर जगातील अनेक लोकांना गरीबीतून बाहेर काढले.
– टीम स्मार्ट उद्योजक
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.