स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
नेतृत्व विकास, व्यक्तिमत्व विकास हा विषय शिकवण्याचा हातखंडा असलेले संजीव परळकर यांनी प्रत्येक विक्रेत्याला / विक्री प्रतिनिधीला साहाय्यक व्हाव असं एक पुस्तक छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. केवळ एका बैठकीत वाचून पूर्ण होऊ शकेल आणि त्यातून विक्रेत्याचे उत्तम प्रशिक्षणही होईल असे हे पुस्तक आहे.
‘मेहता प्रकाशन’ने प्रकाशित केलेले ‘विक्रीकौशल्य शिका’ हे परळकरांचे पुस्तकाची किंमत अवघी ६० रुपये आहे. लेखकाने विक्रेत्यांना विक्री करण्यासाठी “पुढाकार घेण्याचा” असा संदेश देणार्या या पुस्तकाचे प्रमुख चार भाग केले आहेत. विक्रीची पूर्वतयारी, विक्रीची सुरुवात, आक्षेप हाताळा आणि विक्रीची सांगता असे ते चार भाग आहेत.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
विक्री प्रतिनिधी केसाच्या भांगापासून ते बुटाच्या पॉलिशपर्यंत कसा असावा, त्याची देहबोली कशी असावी याबद्दल लेखकाने मार्गदर्शन केले आहे. त्याचसह विक्रेत्याच्या मनातील नकारात्मक विचारांचे उच्चाटन करून त्याऐवजी सकारात्मक विचार भरण्यासाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे. सोपी मराठी भाषा आणि साधी आणि सामान्यांना कळू शकेल अशी मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.