कॉलेजमध्ये असताना सुरू केला स्टार्टअप, आज पूर्ण केली सात वर्षांची यशस्वी घोडदौड


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


स्मार्ट उद्योजक®च्या कामाला सुरुवात झाली, तेव्हा विनयचा अचानक फोन आला. स्मार्ट उद्योजकबद्दल फेसबुकवर वाचून, मी एक नवं स्टार्टअप सुरू केलं आहे, तर एकत्र काही करू शकतो का?” असा प्रश्न त्याने मला विचारला. मी त्याला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं.

कॉलेजमध्ये शिकणारा, फोटोग्राफी-व्हिडिओग्राफीची आवड असलेला आणि ‘मैत्र एंटरटेनमेंट’ नावाने याच क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू केलेला हा तरुण माझ्या समोर बसला होता. नवी सुरुवात असल्यामुळे नव्या संधी शोधण्याची धडपड होती. त्यातच स्मार्ट उद्योजकबद्दल वाचून त्याने मला थेट फोन केला होता.

एकत्र काय काय करू शकतो, दोघांनाही नजीकच्या काळात आणि दीर्घकालीन फायदा कसा होऊ शकतो याबद्दल आमच्यात बरीच चर्चा झाली. आपण एकत्र काम करायलाच हवं, यासाठी त्याने मला convince केलंच. लवकरच आम्ही एका वेबसाइटच्या प्रोजेक्टवर एकत्र काम केलंही. यात फार पैसे सुटले नाहीत, पण अनुभव आणि नेटवर्किंगसाठी त्याने याकडे संधी म्हणून पाहिलं.

संपादक शैलेश राजपूत यांच्यासोबत एका कार्यक्रमात विनय

या प्रोजेक्टदरम्यान झालेल्या नेटवर्किंगमधून त्याने इतरही काही प्रोजेक्ट मिळवलेसुद्धा. त्याची ही धडपडी वृत्ती मला पहिल्या भेटीतच लक्षात आली होती.

आज, १० मे रोजी त्याच्या ‘मैत्र एंटरटेनमेंट’ला सात वर्षं पूर्ण होत आहेत. आता तो कॉलेज विद्यार्थी राहिला नसून पूर्णवेळ उद्योजक झाला आहे. सोबत तरुणांची थोडी टीमही गोळा केली आहे. महाराष्ट्र शासनासकट मोठमोठे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी आता तो धडपड करताना दिसतो.

गेल्या आर्थिक वर्षात विनयने काही लाखांत turnover केला आहे. आज त्याची तेरा लोकांची टीम आहे आणि भायखळ्याला ७५० स्वेअर फुटाचे ऑफिस आहे.

एक कॉलेज विद्यार्थी मी नोकरी करणार नाही, उद्योजकच होणार हे ठरवून त्यासाठी प्रयत्न सुरू करतो आणि आता सात वर्षांनंतर कुठे स्थिरस्थावर होतोय, हे पाहून खूप अभिमान वाटतो. मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेला विनय मुंबईत लालबाग भागात राहतो. तिथून सुरू झालेला त्याचा हा प्रवास लवकरच त्याला उत्तुंग उंचीवर घेऊन जाईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. यासाठी विनय शिंदेला खूप खूप शुभेच्छा!

शैलेश राजपूत
संपर्क : विनय शिंदे – 99692 63826


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?