आत्मनिर्भर होण्यासाठी ‘उद्योजकता’ हीच खरी संधी मानणारा विश्वनाथ


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


स्वामी विवेकानंदांचा तरुणांसाठी संदेश आहे- उठा, जागे व्हा आणि ध्येय निश्चित होईपर्यंत थांबू नका. सोलापूरच्या विश्वनाथ पाटील या तरुण उद्योजकाला विवेकानंदांचा हा संदेश नेहमीच प्रोत्साहित करतो. ओमकार कन्स्ट्रक्शन या नावाने कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे साहित्य पुरवण्याची सेवा ते देतात.

पदवीधर झाल्यावर पुण्यात काही वर्षे नोकरी केली. नोकरीच्या ठिकाणी मेहनत जास्त आणि मोबदला कमी मिळत होता. शिवाय गरजेला सुट्टी मिळत नव्हती. शिवाय स्वत:च्या क्षमतांवर ठाम विश्वास होता. त्यामुळे सतत वाटे, आपण आपला व्यवसाय सुरू करावा, जेणेकरून जास्त पैसा, कामात स्वातंत्र्य, मानसन्मान, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येईल.

यातूनच मग ‘ओमकार कन्स्ट्रक्शन’चा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाला असला तरी कुटुंबातील सदस्य शिक्षित आहेत, त्यामुळे विरोध कुणाचा झाला नाही. उलट साथ आणि विश्वासच मिळाला. त्यांना भविष्यात याच क्षेत्रात नव्या संधी शोधून त्याचा उद्योगात समावेश करायचा आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिथे जिथे बांधकाम चालते त्यावर काम करताना लागणारी सर्व प्रकारची साधनसामग्री पुरवतो. आमची खासियत म्हणजे आम्ही साइट डिलिव्हरी देतो. कन्स्ट्रक्शनसाठी वापरली जाणारी ट्यूबमोर सेफ्टी इक्‍विपमेंटमध्ये हेल्मेट, जॅकेट, हॅन्डग्लोव्हज्, vibrator, needle इत्यादी या टेस्टिंगसाठी लागणार्‍या गोष्टी अशी विविध सामग्री site डिलिव्हरी करतात.

विश्वनाथ पाटील हे Construction Equipment मध्ये Floater Machine, Full Bag Mixer, Half Bag Mixer, Earth Compactor, Electric Vibrator आणि Testing Equipment मध्ये Compression Testing Machine, Cube Mould, Slum Test Apparatus, Core Cutter, Safety Helmet, Jacket Safety Belt, Safety Net, Shoes याचा पुरवठा करतात.

सुरुवातीला विविध बांधकाम व्यावसायिकांच्या ऑफिस, साइटवर जाऊन तिथे आमचे माहितीपत्रक दाखवून काम मिळवले. सध्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनही काम मिळते. याचा फायदाच झालाय. लॉकडाऊनच्या कठीण काळात हे एक वैश्विक संकट असल्याने आमच्या उद्योगावरसुद्धा परिणाम झाला, पण त्याचा बाऊ न करता कामाला लागलो. धंद्यात मंदी आलीय, पण काम पुन्हा जोमाने सुरू केलंय, असे विश्वनाथ सांगतात.

ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योगात जास्तीत जास्त उतरावे, असे ते आवाहन करतात. ते म्हणतात, आज ग्रामीण भागात आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. वीज, पाणी, प्रत्येकाच्या हातात आज फोन आहे. त्यामुळे जगाशी माणूस जोडला गेलाय. तुमच्याकडे काहीही स्किल असेल तर त्याचा उद्योगात जरूर विचार करा. उत्तम संभाषण कला, माणसं जोडण्याची कला अवगत असेल तर नक्कीच उद्योगात उतरा.

लोकांच्या गरजा ओळखा आणि त्यातल्या संधी हेरा. उद्योग आपल्यासोबत येणार्‍या पुढील पिढीसाठीसुद्धा फायद्याचा ठरतो. आजच्या काळात एकाच मार्गाने पैसे कमावण्यापेक्षा जास्तीत जास्त पर्याय आपण शोधावेत, जेणेकरून पैसा उभा राहील. ते स्वतः इन्शुरन्स सेवासुद्धा देतात.

पुस्तके विकत घेणे आणि ती वाचणे ही माझी आवड आहे. समाजसेवेचीसुद्धा आवड आहे. या सगळ्याचा उद्योगात फायदाच होतो. तरुणांमध्ये उद्योजकतेचा प्रसार व्हावा यासाठी विश्वनाथ हे ‘स्मार्ट उद्योजक’चे प्रतिनिधी म्हणूनही काम करतात.

तरुणांना संदेश : उद्योजक बना, स्वावलंबी व्हा, पंतप्रधान मोदीच्या संकल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत होण्यासाठी योगदान द्या.

संपर्क : विश्‍वनाथ पाटील – ७६२०६९४५४५

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?