Advertisement
संकीर्ण

स्टोरीटेलवर जयेश मेस्त्री, श्रीपाद जोशी आणि आस्ताद काळे या त्रिकूटाची आणखी एक रहस्य कथा

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


सुप्रसिद्ध ऑडिओ प्लॅटफॉर्म स्टोरीटेलने सध्या सर्वांनाच वेड लावलेलं आहे. आता पुस्तके कोण वाचतो? मराठी वाचक उरलाय कुठे असं म्हणणार्‍यांसमोर स्टोरीटेलने एक मोठं आणि महत्वाचं उदाहरण निर्माण केलेलं आहे. दिवसेंदिवस स्टोरीटेलवरील वाचक व श्रोते वाढतंच आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा कथा तुम्ही स्टोरीटेलवर ऐकू शकता.

‘मर्डर केस सीजन १’ आणि ‘चेकमेट’च्या घवघवीत यशानंतर आता स्टोरीटेलने जयेश मेस्त्री, श्रीपाद जोशी आणि आस्ताद काळे ह्या त्रिकूटाची आणखी एक रहस्यकथा प्रदर्शित केली आहे. जयेश मेस्त्री व श्रीपाद जोशी लिखित आणि आस्ताद काळेच्या आवाजात तुम्ही आता ‘वाड्याचे रहस्य’ ही कथा स्टोरीटेलवर ऐकू शकता.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

मुंबई पोलीसांचा हनहुन्नरी ऑफिसर इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान पुण्याला फिरायला गेलाय आणि मग तिथे असं काहीतरी घडतं, ज्यामुळे तो एका केसमध्ये इन्वॉल्व्ह होतो.

‘वाड्याचे रहस्य’ या कथेला लोक खूप पसंत करत आहेत. लवकरच या त्रिकूटाची मर्डर केस सीजन २ ही ऑडिओ सिरीज प्रदर्शित होणार आहे. सुमारे १ तासाचे १० एपिसोड्स असं या सिरीजचं स्वरुप असणार आहे.

याविषयी बोलताना जयेश मेस्त्री म्हणाले की, “मोठमोठ्या पात्रांनी आपल्याला वेड लावलेलं आहे. शेरलॉक होल्म्स असेल किंवा अजून कुणी, पण या सर्वांच्या पार्श्वभूमीवर इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान लोकांना आवडतोय, इतकंच काय तर हिंदीतही या पात्राला पसंती मिळत आहे. ही कोणत्याही लेखकासाठी आनंदाची बाब आहे,”

श्रीपाद जोशींनी याविषयावर आपलं मत मांडलं की, “तुम्हाला तुमच्या पात्राच्या नावाने ओळखलं जाणं ही अभिमानास्पद बाब असते. लोक आजकाल श्रीपाद जोशी किंवा जयेश मेस्त्री असं न म्हणता टीम अभिमन्यू प्रधान म्हणतात. एक लेखक म्हणून तुम्हाला अजून काय हवं असतं?

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!