स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
वित्तीय साक्षर होणे म्हणजे तुम्ही अकाउंटंट अथवा MBA Finance अथवा कॉमर्स पदवीधर होणे नाही किंवा फक्त पैसे कसे आणि कुठे खर्च कराचे हेही नाही. वित्तीय साक्षर होणे म्हणजे उत्पन्न आणि खर्च ह्याचे योग्य व्यवस्थापन.
आपण सर्वजण पैसे खर्च करतो; पण किती लोक पैश्याच्या व्यवस्थापनेला प्राधान्य देतात. याच वित्तीय व्यवस्थापनेच्या कौशल्याला “वित्तीय साक्षरता” म्हणतात. आपण सर्व लोक पैसे कमवण्याकरता काम करत असतो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
फार कमी लोक स्वतःच्या पैश्याचा वापर अधिक पैसे मिळवण्याकरिता करतात माझ्या मते ह्यालाच ‘व्यावसायिकता’ म्हणतात. मी ज्यावेळी रॉबर्ट कियोसाकीचे ‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तक वाचले त्या वेळेला मला “वित्तीय साक्षरता” म्हणजे काय हे कळले.
वित्तीय साक्षर होणे म्हणजे तुम्ही अकाउंटंट अथवा MBA Finance अथवा कॉमर्स पदवीधर होणे नाही किंवा फक्त पैसे कसे आणि कुठे खर्च कराचे हेही नाही. वित्तीय साक्षर होणे म्हणजे उत्पन्न आणि खर्च ह्याचे योग्य व्यवस्थापन.
उत्पन्नाचे स्रोत ओळखा : तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ह्या उत्पन्नाचे वर्गीकरण करा – एक : सक्रिय उत्पन्न; जसे ठराविक , नियमित अथवा आवर्ती (जसे पगार) आणि दुसरे वर्गीकरण म्हणजे निष्क्रिय उत्पन्न; जसे अनपेक्षित आयात. हे सर्व तुमच्या खर्चाची मांडणी करण्यास उपयुक्त होईल.
खर्चाचे प्राधान्य ठरावा : खर्च आणि वित्त व्यवस्थापन सोडून आपण सर्वच गोष्टींचे प्राधान्य ठरवतो. पण तुमच्या गरजा आणि खर्च ह्याचे वर्गीकरण करावे लागेल. याची यादी तयार करणे हे प्राधान्य ठरवण्यास उपयुक्त ठरेल. वायफळ आणी राहणीमान ह्याकरिता केलेल्या खर्च व गरजांचे वर्गीकरण न करणे ह्यामुळे वित्तीय संकट येऊ शकते. म्हणून खर्चाचे प्राधान्य ठरवावेच लागेल.
कर्जबाजारी होऊ नका : “कर्ज घेणे” ही गरज नाही, तर ते एक व्यसन आहे असे मला वाटते. बरेच लोक गृहकर्ज, गाडीसाठी कर्ज, क्रेडिट कार्ड आणि बरेच काही अशा काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येयापासून दूर ठेवते. कर्जबाजारीपणा दूर ठेवण्याचा एकमेव उपाय म्हणजे कर्ज न घेणे.
भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक : प्रत्येक वेळी खर्च तुमच्या हातात असतोच असे नाही. कधी शॉपिंग, कधी वैद्यकीय गरज तुम्हाला अनपेक्षित खर्चात पाडू शकते. त्याकरता तयार असणे गरजेचेच.
खूप काही वाचवले नाही तरी थोडेफारसुद्धा संकटकाळी कामात येतं. सरकारी आणी बँकाँच्या बऱ्याच योजना आहेत. आपल्या गरजेप्रमाणे त्या काळजीपूर्वक निवडा. एकदा तुमचाकडे गुंतवणुकीचा प्लॅन असला कि तुमची निवृत्ती सुरक्षित समजा.
“वित्तीय साक्षरताच एखाद्याला श्रीमंत बनवेल”
– मयूर देशपांडे
संपर्क – ७७२१००५०५१
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.