उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?

उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?

नव्याने व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्यांना किंवा नव्यानेच व्यवसायात उतरलेल्या प्रत्येकाला आपलं व्यक्तिमत्व कशाप्रकारे घडवायला हवे याचा अभ्यास नक्कीच करायला हवा.

उद्योजकाचं प्रसन्न, शांत, त्याच्या व्यवसायाला शोभेसं, करारी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व समोरच्यावर योग्य ती छाप पाडणारं ठरतं.

प्रत्येक उद्योजकाला त्याचं व्यक्तिमत्व हे नेहमी Presentable ठेवायला हवं.

अनेक वेळा Diplomatic वागणं ही उद्योगाची गरज असते त्यामुळे उद्योजकाला चतूरपणे ते जमलं पाहिजे.

उद्योजकाचं चालणं, बोलणं, सार्वजनिक जीवनात वावरणं या सगळ्याच्या ताळमेळेतून लोकांवर त्याची छाप पडते.

उद्योजकाने एखाद्याशी संवाद साधताना त्याचं बोलणं हे मधूर, आश्वासक, आणि आपलेपणाचं असावं.

कठीण प्रसंगातही उद्योजकाला आपलं डोकं शांत ठेवता आलं पाहिजे.

या सर्व गुणांसह जेव्हा उद्योजक उद्योगविश्वात वावरतो त्यावेळी त्याच्यासमोर त्याचं ध्येय आणि उद्दिष्ट्य ठरलेलं असेल तर तो योग्य दिशेने वाटचाल करू शकतो.