जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखपत्र म्‍हणून बिझनेस कार्डला पर्याय नाही. तुमचं बिझनेस कार्ड हे तुमच्या व्यवसायाची ओळख करून देतं.

जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखपत्र म्‍हणून बिझनेस कार्डला पर्याय नाही. तुमचं बिझनेस कार्ड हे तुमच्या व्यवसायाची ओळख करून देतं.

हे लक्षात ठेवून बिझनेस कार्डच्या डिझाइनचा विचार करावा.

"First Impression is a Last Impression",

स्‍वत:चं बिझनेस कार्ड तयार करण्यासाठी अनेक उद्योजक प्रोफेशनल डिझायनरची मदत घेतात, परंतु स्‍वत:चं बिझनेस कार्ड कसं असावं याची रूपरेषा आपण स्‍वत: ठरवावी.

तुमच्या व्यवसायाची एका वाक्यात ओळख करून देणारी टॅगलाइन जरूर असावी.

कंपनीचं नाव, संपर्क क्रमांक, पत्ता हे जेवढं महत्त्वाचं आहे; तेवढंच आजच्या काळात तुमची अथवा कंपनीच्या सोशल मीडिया हॅन्डल्सच्या लिंक बिझनेस कार्डवर असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

बिझनेस कार्डची रंगसंगती कोणती असावी याचा बारकाईने विचार करावा. तुमचं मार्केटिंग मटेरियल, वेबसाईट, बिझनेस कार्ड या सगळ्यांच्या रंगसंगतीमध्ये एकवाक्यता असावी.

बिझनेस कार्डचे नुसतेच डिझाइन चांगले केले आणि छपाई निकृष्ट दर्जाची असेल तर त्याची सर्व शोभा निघून जाऊ शकते.

त्यामुळे चांगल्या डिझाइनसोबत चांगल्या कार्ड पेपरवर उत्तम छपाई असावी.