Advertisement
उद्योगोपयोगी

‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणजे नक्की काय?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


दिखावे आणि हँडशेकच्या पुढे जाऊन स्वयंप्रेरित होणे म्हणजे बिझनेस नेटवर्किंग होय. बिझनेस नेटवर्किंग तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक संपर्कांद्वारे दैनंदिन कामात नवीन लाभ मिळवून देत असते. संकल्पना ऐकायला तर सोपी आहे, बरोबर ना? पण यात फसू नका, कारण यात नाती निर्माण करणं आलं जे खूप गुंतागुंतीचं असू शकतं.

याबद्दल विचार करा. तुम्ही किती लोकांना ओळखता? यांपैकी खरंच किती जणांना माहीत आहे तुम्ही काय करता ते? यांपैकी तुमचा संपर्क किती जण इतरांना देतात? आणि यांपैकी खरंच किती जणांकडून तुम्हाला बिझनेस मिळतो?

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

‘बिझनेस नेटवर्किंग’ हे लोकांना भेटणं, त्यांची कार्ड गोळा करणं आणि हँडशेक करणं यापेक्षा खूप पुढे आहे. उदाहरणार्थ, दोन व्यक्ती एका कार्यक्रमाला गेले आहेत. दोघांनी त्या कार्यक्रमाच्या जागेचे अर्धे अर्धे भाग केले आणि दोघंही आपापल्या भागात बिझनेस कार्ड गोळा करू लागले. कार्यक्रमाच्या शेवटी ते दोघं कुणी जास्त कार्ड गोळा केले हे पाहण्यासाठी एकत्र आले.

तुम्ही अशा लोकांना कधी भेटला आहात का? नक्कीच तुमचं उत्तर हो असणार. आपण सगळेच भेटलो असणार अशा व्यक्तींना. ते यातून काय मिळवतात? त्यांनी भरपूर कार्डं मिळवली जी पुढे कायम कपाटावर किंवा ड्रॉवरमध्ये पडून राहतील किंवा कचर्‍यात जातील.

त्याहून वाईट म्हणजे स्कॅन होऊन त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये राहतील ज्यांनी ते सर्व लोक ज्यांना ते भेटले ते स्पॅममध्ये जातील. कशासाठी? बिझनेस कार्ड कशासाठी असतं? ते एक साधा कागदाचा तुकडा असतं ज्यावर शाई आणि फोटोज असतात.

कोणतेच संबंध तयार झाले नाहीत. ही नेटवर्किंगची पद्धत म्हणजे नक्कीच वेळ, पैसे आणि शक्तीचा योग्य उपयोग नाही. काही लोक या सर्वांमुळे खचलेले दिसतात, कारण ते बर्फातल्या ट्रकच्या मागील चाकांप्रमाणे दोन पावले पुढे आणि दहा पावले मागे जात असतात. कुठेच वेगवान नाही आणि कुठेच पोहोचत नाही.

व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले नेटवर्किंग हे निश्‍चित आणि व्यवस्थित असले पाहिजे. तुम्हाला भेटलेला प्रत्येक व्यक्ती काही तुमचा व्यवसाय पुढे नेईलच असे नाही; पण तुम्ही घेतलेल्या प्रत्येक प्रयत्नाने तुमचा व्यवसाय वाढेल.

तुम्ही कुणाला भेटता, कुठे भेटता, कसे भेटता आणि त्याचा लाभ तुम्ही कसा करून घेता हे पूर्णत: तुमच्या हातात आहे. तुम्ही विशिष्ट २९% लोकांमध्ये मोडता आणि तिथे टिकून राहता का तिथे पोहोचतही नाही हेही तुमच्याच हातात आहे. (अधिक माहितीसाठी ‘29% Solution’ वाचा)

बिझनेस नेटवर्किंग म्हणजे स्वयंप्रेरित होणे. बिझनेस नेटवर्किंगचे मूळ हे दर आठवड्याला काही तरी ठाम करणे आहे ज्यांने तुमचा व्यवसाय वाढेल. योजना करा, ध्येयवादी बना आणि स्वत:मध्ये नियमितता आणा.

जेव्हा तुम्हाला बिझनेस नेटवर्किंग म्हणजे नक्की काय हे समजेल आणि तुम्ही ते करणे हाती घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, यात किती शक्ती आहे आणि हे नसते केले तर तुम्ही किती प्रगतीपासून वंचित राहिला असतात. हे समजल्यावर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एक अमूल्य गुंतवणूक करत असाल.

– Ivan Misner
(लेखक ‘बी.एन.आय.’चे संस्थापक आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!