उद्योगोपयोगी

समजून घ्या ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ नेमकी काय आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

‘मुद्रा बँके’च्या (मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) स्थापनेबाबत २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सूतोवाच करण्यात आले होते. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सारिपाटावरील डावांची समीकरणे बदलण्याचे सामर्थ्य या संकल्पनेत आहे. ‘मुद्रा’ची संरचना म्हणजे भारतीय वैशिष्ट्यपूर्ण नॉन-फॉर्मल क्षेत्राला अर्थपुरवठा करण्याच्या दृष्टीने उभारलेली स्वदेशी रचना आहे.

‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’अंतर्गत सूक्ष्म, लघू व मध्यमक्षेत्रातील उद्योजकांना प्रत्यक्ष लाभ घेणे आता शक्य आहे. सर्व प्रमुख सरकारी बँकांमधून शिशू, किशोर, तरुण यापैकी आपल्या गटानुसार कर्ज उपलब्ध आहे. छोटे वाहनचालक, रिक्षाचालक, सलून, ब्युटीपार्लर, जिम्नॅशियम, टेलरिंग, लाँड्री, मोटार सायकल दुरुस्ती, डीटीपी व झेरॉक्स, पापड, लोणची, जॅम बनवणारे, हातमाग, यंत्रमाग, जरी कारागिरी, एम्ब्रॉयडरी, कापडी बॅग्ज बनवणारे असे विविध व्यवसाय करणारे लाखो सूक्ष्म आणि लघू उद्योजक मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतात.


‘स्मार्ट उद्योजक’चे आजीव वर्गणीदार होऊन आमच्याशी एक दीर्घकालीन नाते जोडा व UNLIMITED लाभ मिळवा.

आजीव वर्गणीदार होण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’अंतर्गत उद्योगाच्या वाढीच्या टप्प्यांनुसार तीन प्रारंभिक योजना सादर केल्या आहेत.

योजना व कर्जमर्यादा

शिशू : हजार रुपयांपर्यंत
किशोर : ५० हजार ते ५ लाख
तरुण : ५ लाख ते १० लाख

‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’अंतर्गत वितरित होणार्‍या एकंदर कर्जाच्या किमान ६० टक्के शिशू घटकाला देण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. या योजनेत शिशू, किशोर आणि तरुण या तिन्ही घटकांची एक साखळी तयार केली आहे, ज्यात आज शिशूअंतर्गत ५० हजार रुपये कर्ज घेणारा उद्योजक उद्या व्यवसायातील वाढीनंतर किशोर आणि तरुण याही योजनांचा लाभ घेऊ शकतो.

‘मुद्रा’अंतर्गत खालील योजनांचा समावेश करण्यात येणार आहे व त्यानुसार कर्जपुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

निवडक क्षेत्रांसाठी विशिष्ट योजना :

काही ठराविक निवडक क्षेत्राची गरज लक्षात घेता ही योजना तयार केली आहे.

१) वाहतुकीसंदर्भात सेवा पुरवणारे उद्योजक : यामध्ये रिक्षाचालक, सामान वाहतूक करणारे छोटे वाहनचालक, प्रवासी वाहतुक करणारे छोटे व्यावसायिक यांना वाहनखरेदीकरता या योजनेनुसार कर्ज दिले जाईल.

२) सामाजिक आणि वैयक्तिक सेवा पुरवणारे उद्योजक : यामध्ये सलून, ब्युटीपार्लर, जिम्नॅशियम, टेलरिंग, लाँड्री, मोटार सायकल दुरुस्ती, डीटीपी व झेरॉक्स, औषधांची दुकाने, कुरिअर एजंट इत्यादींचा समावेश होतो.

३) अन्नप्रक्रिया उद्योग : पापड, लोणची, जॅम बनवणारे, ग्रामीण भागातील खाद्य शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग, मिठाईची दुकाने, कॅटरिंग सेवा, आईस्क्रीम पार्लर, बेकरी उद्योग, इ. अन्नप्रक्रिया करणारे उद्योजक या योजनेत मोडतात.

४) कापड उद्योग : याअंतर्गत हातमाग, यंत्रमाग, जरी कारागिरी, एम्ब्रॉयडरी, कापडी बॅग्ज बनवणारे आदी.वरील चार घटकांमध्ये काळानुरूप अनेक उद्योग-व्यवसाय हे वाढत जातील आणि कोट्यवधी लघू उद्योजकांना याचा लाभ घेता येईल.

सूक्ष्म कर्जपुरवठा योजना : या योजनेअंतर्गत देशात कार्यरत विविध सूक्ष्म कर्जपुरवठा करणार्‍या संस्थांना वित्तपुरवठा करून त्यांना आर्थिक सहकार्य केले जाईल. याद्वारे बचत गट, सहकारी संस्था, छोटे उद्योजक, प्रोप्रायटर आदींना कच्चा माल आणि यंत्रसामग्री आदी खरेदी करण्यासाठी वित्तसाहाय्य मिळू शकेल.

बिगरशेती उद्योगांना वित्तपुरवठा करणार्‍या वित्तसंस्थांना आर्थिक साहाय्य (कर्जमर्यादा ५० हजार ते १० लाख)

ग्रामीण आणि सहकारी बँकांना वित्तसाहाय्य : ग्रामीण व सहकारी बँकांच्या माध्यमातून अनेक लघू उद्योजकांना वित्तपुरवठा केला जात असतो, त्यामुळे या बँकांना या योजनेअंतर्गत वित्तसाहाय्य केले जाईल.

महिला उद्यमी योजना : महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेनुसार महिला उद्योजकांना कर्जपुरवठा केला जाणार आहे.

व्यापारी आणि दुकानदार : व्यापारी आणि दुकानदार यांना १० लाखांपर्यंत वित्तसाहाय्य केले जाईल.

छोटी उपकरणे घेण्यासाठी कर्ज : लघुउद्योजकांना उत्पादन वा सेवा पुरवण्यासाठी जी उपकरणे खरेदी करावी लागतात त्यासाठी या योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य मिळू शकते.

मुद्रा कार्ड

मुद्रा कार्ड

मुद्रा योजनेअंतर्गत ‘मुद्रा कार्ड’ हे छोट्या उद्योजकांसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. तुमच्या खेळत्या भांडवलाची निकड भागवण्यासाठी यामध्ये तुम्हाला कोणत्याही बँकेच्या एटीएममधून १० हजारांपर्यंत रक्कम काढता येऊ शकेल. हे कार्ड ‘रुपे’कडून प्रसारित झालेले असेल.एखाद्या बँकेकडे कर्जाचा अर्ज सादर करताना प्रथम प्रश्‍न विचारला जातो तो तुम्ही तारण म्हणून काय द्याल? शिवाय तारण म्हणून साधारणपणे स्थावर मालमत्तेचीच मागणी केली जाते. म्हणजे जितकी तुमची स्थावर मालमत्ता तितकेच तुम्हाला कर्ज, म्हणजे तितकीच तुमच्या व्यवसायात वाढ. ‘मुद्रा’मध्ये तुमच्या स्थावर मालमत्तेनुसार तुमची पत न ठरवता तुमच्या प्रोजेक्टमध्ये प्रगतीची किती खात्री आहे त्यानुसार तुम्हाला कर्ज मिळू शकेल.

बुडीत कर्जाच्या भीतीने बँका होतकरू उद्योजकाला कर्ज देण्यात नेहमी हात आखडता घेतात. यावर उपाय म्हणून ‘मुद्रा’अंतर्गत अशा कर्जांची हमी घेतली जाणार आहे, जेणेकरून वित्तसंस्था ते पुरवायला कचरणार नाहीत.

ज्याप्रमाणे ‘मुद्रा’ उद्योजकांना लागणारे वित्तसाहाय्याच्या उपलब्धतेकडे लक्ष पुरवते आहे, त्याच्याच दुसर्‍या बाजूला उद्योजकाला स्वत:च्या पायावर उभे करण्याचाही तिचा प्रयत्न आहे. या अनुशंगाने उद्योजकाला लागणारी कौशल्ये, ज्ञान व माहितीचा पुरवठा, वित्तीय साक्षरता तसेच त्यालाविकासाभिमुख करणे हेही ‘मुद्रा’च्या कार्यकक्षेत येते.

‘मुद्रा’विविध क्रेडिट रेटिंग कंपन्यांच्या सहयोगाने लघू उद्योजकांचे क्रेडिट रेटिंगही करणार आहे.शेकडो-हजारो अनौपचारिक वित्तपुरवठा संस्थांना एका औपचारिक आधुनिक अर्थपुरवठा व्यवस्थेत सामावून घेण्याची ही मुद्रा बँकेची अभिनव संरचना आहे.

थोडक्यात सांगायचे तर, मुद्रा योजना म्हणजे एक अभिनव आधुनिक आर्थिक संरचनेचे इंजिन आहे, जे अनौपचारिक अर्थपुरवठा करणार्‍या संस्था व इन्फॉर्मल मायक्रो उद्योग यांना एका स्तरावर आणून त्यांना औपचारिक स्वरूप बहाल करणार आहे.

– अमित नाचणे
(लेखक सरकारी बँकेत अधिकारी आहेत.)

जास्तीत जास्त उद्योजकांमध्ये मुद्रा योजनेविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा लेख जरूर share करा.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: