उद्योगोपयोगी

व्हिजन आणि व्हिजन स्टेटमेंट म्हणजे काय?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रत्येक उद्योजकाच्या मनात विचार असतात, एक स्वप्न असते. आपल्याला काय करायचे आहे किंवा जे साध्य करायचे आहे, ते ध्येय म्हणजे व्हिजन. व्हिजन जेव्हा आपण लिहून काढतो, तेव्हा ते व्हिजन स्टेटमेंट होते. काय करायचे आहे किंवा काय साध्य करायचे आहे, हे योग्य पद्धतीने लिहिले पाहिजे, कारण बिजनेसची ही पुढे जाण्याची सुरुवात असते. व्हिजन स्टेटमेंट महत्त्वाचे असते कारण सगळे बिजनेस त्याची मांडणी, कार्यपद्धती, स्ट्रेटजी यांचे ते गाईड असते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
“Good leaders create a vision, articulate the vision, passionately own the vision and relentlessly drive it to completion”: Jack Welch

जनरल इलेक्ट्रीकचे माजी चेअरमन आणि सीईओ, जॅक वेल्च यांनी किती सोप्या शब्दांत व्हिजनचे महत्त्व सांगितले आहे.

व्हिजन नसेल तर काय?

समोर व्हिजन नसेल आणि नुसते काम करत राहिले तर फोकस राहणार नाहीच, पण ते काम प्रॉडक्टिव्हसुद्धा होणार नाही.

व्हिजन स्टेटमेंटचा कार्यकाळ

ऑर्गनायझेशनच्या स्ट्रेटजी आणि ऑपरेशनल गोल्स दोन्ही बदलू शकतात, पण व्हिजन स्टेटमेंटमध्ये बदल फार कमी वेळा होतात. एकदा का व्हिजन स्टेटमेंट लिहिले, तर त्या ऑर्गनायझेशनसाठी ते कायमचे किंवा बराच काळ मार्गदर्शन करते.

व्हिजन स्टेटमेंट कसे असावे?

व्हिजन स्टेटमेंट आगामी काळासाठी असते. त्यामुळे ध्येय मिळते आणि सगळ्या कार्यपद्धती त्याप्रमाणे आखल्या जातात. म्हणूनच या व्हिजन स्टेटमेंटमध्ये संख्यात्मक (क्वांटिटेटीव्ह) आणि वैशिष्टयात्मक (क्वालिटीटेटीव्ह) एट्रिब्युट्स असावेत.

व्हिजन स्टेटमेंट लिहिण्यासाठी काही सूचना :

  • स्पष्टपणे लिहिले पाहिजे.
  • त्यात टार्गेट्स असावीत जी साध्य करू शकतो.
  • काय करायचे आहे याचे चित्र दिसायला पाहिजे.
  • काम करणाऱ्या सगळ्यांना योग्य ते मोटिवेशन मिळायला हवे.
  • केवढ्या वेळेत साध्य करायचे आहे, तेही लिहू शकाल.
  • सहज लक्षात राहायला हवे.

व्हिजन स्टेटमेंट कसे नसावे?

आपल्या स्पर्धकांची तुलना आणि स्पर्धा करू नये, कारण प्रत्येक व्यवसायाची कंडिशन हीवेगळी असते. उगीचच मोठमोठी स्वप्नं व्हिजन स्टेटमेंटमध्ये लिहू नयेत.

व्हिजन स्टेटमेंटची काही उदाहरणे :

  • Nike: “To bring inspiration and innovation to every athlete in the world.”
  • Starbucks: “To establish Starbucks as the premier purveyor of the finest coffee in the world while maintaining our uncompromising principles while we grow.”
  • Amazon.com: Our vision is to be earth’s most customer-centric company; to build a place where people can come to find and discover anything they might want to buy online.

आपल्या सूचना, प्रश्न, अभिप्राय यासाठी जरूर संपर्क साधू शकता.

– सीए जयदीप बर्वे
9820588298
Email: cajaideepbarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!