आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षासाठी कोणती भेटवस्तू द्याल?

आज बऱ्याच ऑफिसांमध्ये नवीन वर्ष म्हणजेच न्यू यिअरचे गिफ्ट म्हणून एखादी डायरी, पेनं वगैरे दिले जाते. परंतु खरंच आपल्या कर्मचाऱ्यांना याची गरज असते का? वर वर पाहता आपल्याला वाटेल की यात के इतके, डायरी द्या नाहीतर आणखी काही, त्याने काय फरक पडतो. परंतु अशाच छोट्या-छोट्या गोष्टींतून कर्मचारी आणि आपले नाते निर्माण होऊन घट्ट होत असते. तर आज आपण पाहुयात की आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारची भेटवस्तू द्यावी.

आकार महत्वाचा नसतो : बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की काहीतरी छान भेट द्यायची असेल तर काहीतरी मोठे देऊया. पण कधी कधी ती मोठी वस्तू पण समोरच्याच्या उपयोगाची नसते. त्यामुळे आपण जी काही भेट ठरवाल ती आकारानुसार न घेता तिच्या उपयोगीतेनुसार घ्या. उदा. एखादा फुलांचा मोठा गुच्छ देण्या ऐवजी आपण एखादी सेंट किंवा अत्तराची बाटली देऊ शकता.

आपण जी भेट आपल्या कर्मचाऱ्यांना देणार आहात ती प्रत्येक वेळी ऑफिसच्याच कामासाठी त्यांनी वापरावी अशा हेतू ने देऊ नये. भेट ही समोरच्याची आवड पाहून द्यावी आणि शक्यतो त्यांच्या स्वतःच्या वापराठी योग्य अशी असावी. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल आणखी विश्वास निर्माण होईल. कारण, त्यांना हे लक्षात येईल की फक्त काम, नफा यांवर न थांबता आपण त्यांच्या वैयक्तिक भावनांचासुद्धा विचार करता.

शक्यतो विविधता आणण्याचा प्रयत्न करा : समजा आपण बाकी सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या कर्मचाऱ्यांना छान अत्तराच्या बाटल्या भेट द्यायचे ठरविलेत आणि सर्वांसाठी सरसकट एकाच वासाची अत्तराची बाटली आणलीत तर त्याचाही उलट अर्थ घेतला जाऊ शकतो. त्यामुळे अगदी त्यात अभ्यास करून, वेळ घालवून काही घेतले पाहिजे असे नाही पण आपल्या भेटींमधे थोडी भिन्नता आणली तर अधिक चांगले.

सादरीकरण : आपली भेट कितीही साधी असोत वा उत्तम, आपण तिचे सादरीकरण कसे करता याला सुद्धा फार महत्त्व असते. चुरगळलेल्या कागदात गुंडाळलेली, वर धड नाव पण न लिहिलेले, आतला पुठ्ठा वाकलेला अशी भेट जर कुणी आपल्याला दिली तर आपल्याला नक्कीच ते आवडणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांना भेट देताना याचाही आपण विचार करावा. साधे, सोपे परंतु टापटीप सादरीकरणसुद्धा खूप मोठे काम करून जाऊ शकते.

आपण आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट देणार आहात याबद्दल त्यांना आधी आजिबात कळू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीला अचानक मिळालेली भेट आवडते. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना सरप्राईज केलेत तर त्यांना नक्कीच आनंद होऊन आपलेपणासुद्धा वाटेल.

शक्य असेल तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठीसुद्धा काही भेट द्या. यामुळे त्यांना जाणवेल की आपल्याला फक्त आपल्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचीसुद्धा काळजी आहे. अगदी काही मोठे द्यायला हवे असे नाही, चॉकलेट्स, सुका मेवा किंवा एखादी वस्तू जसे कप-बश्यांचा सेट वगैरे आपण देऊ शकता. जवळपास सर्वच व्यक्ती आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे एक छोटीशी भेटसुद्धा त्यांच्या मनात आपल्या बद्दल विश्वास निर्माण करून जाऊ शकते.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?